शहरं
Join us  
Trending Stories
1
Pune Rave Party : प्रांजल खेवलकरांसह सातही आरोपींना 2 दिवसांची पोलीस कोठडी
2
Pune Rave Party : पुण्यातील 'त्या' हॉटेलचे बुकिंग कुणाचा नावावर झाले होते ? पोलिसांनी दिली महत्वाची माहिती
3
Pune Rave Party: रेव्ह पार्टीतील त्या दोन तरुणी कोण? पोलिसांना फ्लॅटमध्ये काय काय सापडलं?
4
बिजापूरमध्ये सुरक्षा दलांची मोठी कारवाई, १७ लाख रुपयांचे बक्षीस असलेले ४ नक्षलवादी ठार
5
Raigad Boat Capsized: रायगडमध्ये मासेमारीसाठी गेलेली बोट समुद्रात बुडाली, ५ जणांनी नऊ तास पोहून समुद्रकिनारा गाठला, ३ जण बेपत्ता!
6
'मी दोन वेळा मरता मरता राहिलोय'; धनंजय मुंडेंनी मन केलं मोकळं; मंत्रि‍पदाबद्दलही बोलले
7
Crime : आईवडिलांनी लेकीच्या नावावर केली जमीन, चिडलेल्या मुलाने तिघांचीही कुऱ्हाडीने केली हत्या
8
VIDEO: राज ठाकरे तब्बल ६ वर्षांनंतर 'मातोश्री'मधील स्व. बाळासाहेब ठाकरेंच्या खोलीत गेले अन्...
9
IND vs PAK : भारतीय सेनेचा अभिमान वाटतो, ही फक्त नौटंकी होती का? सोशल मीडियावर BCCI विरोधात संतप्त प्रतिक्रिया
10
Pune Rave Party Crime : रेव्ह पार्टीपूर्वी पुण्यातील या दोन ठिकाणी झाल्या पार्ट्या; नेमकं काय घडलं ?
11
सलमानच्या Ex गर्लफ्रेंडचे आदित्य पांचोली यांच्यावर गंभीर आरोप, म्हणाली- "तुम्ही महिलांना फसवता, त्यांना मारहाण करता..."
12
शेअर बाजारात टाटा-अंबानींना मोठा धक्का! टॉप १० पैकी ६ कंपन्यांचे २.२२ लाख कोटींचे नुकनान; मग कमावले कोणी?
13
पैशाच्या कारणावरून वाद, म्हाडा अधिकाऱ्याच्या पत्नीनं आयुष्यच संपवलं, अंधेरीतील घटना!
14
Video: हिमाचल प्रदेशातील पर्यटनस्थळी भारतीयांनी केला कचरा; परदेशी नागरिकाने केली सफाई
15
"उद्धव ठाकरेंच्या वाढदिवशी असं गिफ्ट..."; पुणे रेव्ह पार्टीवरून भाजपाचा 'मविआ'ला खोचक टोला
16
IND vs ENG: इंग्लंडच्या गोलंदाजावर 'बॉल टॅम्परिंग'चा आरोप, 'त्या' कृतीमुळे चर्चा, VIDEO व्हायरल
17
कोट्यवधींचा व्यवसाय सोडून जपानी अब्जाधीश बनला शिवभक्त! एका रात्री स्वप्नात... आणि संपूर्ण आयुष्य बदललं
18
Mansa Devi Stampede: गुदमरून टाकणारी गर्दी, एक अफवा अन्...; चेंगराचेंगरीपूर्वीचा व्हिडीओ आला समोर 
19
अनुष्का शर्माचा 'चकदा एक्सप्रेस' झाला डबाबंद? सिनेमातील अभिनेत्यानेच दिली प्रतिक्रिया, म्हणाला...

आधी रशियाकडून अलास्का मिळवले, आता अमेरिकेला हवाय 'हा' भाग; दिली मोठी ऑफर...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 20:00 IST

अमेरिकेला या भागाची इतकी गरज का आहे? जाणून घ्या...

Donald Trump America : अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी पुन्हा एकदा डेन्मार्कचा ताबा असलेल्या ग्रीनलँडला (Graan Land) विकत घेण्याची इच्छा व्यक्त केली आहे. 2019 मध्येही त्यांनी आपल्या पहिल्या कार्यकाळात हे प्रयत्न केले होते, पण पुढे कोणतीही ठोस पाऊले उचलली गेली नाही.

विशेष म्हणजे, अमेरिकेने एखाते क्षेत्र विकत घेण्याची ही पहिलीच वेळ नाही. यापूर्वी अमेरिकेने 1867 मध्ये रशियाकडून अलास्का विकत घेतले होते. आज अलास्का अमेरिकेतील सर्वात मोठे राज्य आहे. अलास्का आणि ग्रीनलँड, या दोन्ही ठिकाणी थंड हवामान, कमी लोकसंख्या, मोक्याची ठिकाणे आणि तेलाचे साठे आहेत. 586,412 चौरस मैल असलेल्या अलास्काची किंमत तेव्हा $7.2 मिलियन होती, जी आज अंदाजे $153.5 मिलियन बनते. मीडिया रिपोर्ट्सनुसार, 836,000 चौरस मैलांमध्ये पसरलेल्या ग्रीनलँडची किंमत $230.25 मिलियन एवढी आहे.

1946 मध्येही ग्रीनलँड विकत घ्यायचा होताअमेरिकेने यापूर्वीही ग्रीनलँड खरेदी करण्याचा प्रयत्न केला होता. 1946 च्या यूएस प्रस्तावात $100 मिलियन सोन्याच्या बदल्यात ग्रीनलँड खरेदी करण्याचा विचार करण्यात आला, जे आजच्या $1.6 बिलियनपेक्षा जास्त आहे. अमेरिकेने 1917 मध्ये डेन्मार्ककडून यूएस व्हर्जिन बेटे $25 मिलियन किमतीत खरेदी केले होते. तर, 1803 मध्ये फ्रान्सकडून लुईझियाना 15 मिलियन डॉलर्समध्ये खरेदी करण्यात आले होते.

अमेरिकेला ग्रीनलँडमध्ये का हवाय?ग्रीनलँडमध्ये अमेरिकेच्या स्वारस्याची अनेक कारणे आहेत. हे बेट उत्तर अमेरिका ते युरोप या सर्वात लहान मार्गावर आहे. यात दुर्मिळ खनिजांचा सर्वात मोठा साठा आहे. हे बॅटरी आणि उच्च-तंत्रज्ञान उपकरणांच्या निर्मितीमध्ये महत्त्वपूर्ण आहेत. ग्रीनलँडमध्ये अमेरिकेचा मोठा लष्करी तळ आहे. याच कारणांमुळे अमेरिकेला ग्रीनलँडचा ताबा हवाय.

महत्वाची बाब म्हणझे, 20 जानेवारी रोजी पदभार स्वीकारलेल्या ट्रम्प यांनी मंगळवारी ग्रीनलँडला युनायटेड स्टेट्सला जोडण्यासाठी डेन्मार्कविरूद्ध लष्करी किंवा आर्थिक उपाययोजना वापरण्याची शक्यता व्यक्त केली. ट्रम्प यांच्या म्हणण्यानुसार, आजकाल सर्वत्र दिसणाऱ्या चिनी आणि रशियन जहाजांवर लक्ष ठेवण्यासाठी ही बेटे महत्त्वाची आहेत. आर्थिक सुरक्षेसाठी आम्हाला ग्रीनलँडची गरज आहे.

ग्रीनलँड खरेदी करणे सोपे आहे?एक मोठा प्रश्न पडतो की, ग्रीनलँड खरेदी करणे खरोखर इतके सोपे आहे का? 2019 मध्ये ट्रम्प यांनी डेन्मार्कचा दौरा रद्द केला. पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांनी ग्रीनलँड खरेदी करण्याचा अमेरिकेचा विचार नाकारला होता. 57,000 लोकसंख्या असलेला ग्रीनलँड 600 वर्षांपासून डेन्मार्कचा भाग आहे. डॅनिश पंतप्रधान मेटे फ्रेडरिकसन यांनी डॅनिश टीव्हीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले होते की, ग्रीनलँड तेथील स्थानिक लोकांचा आहे आणि केवळ तेच त्याचे भविष्य ठरवू शकतात. 

टॅग्स :AmericaअमेरिकाrussiaरशियाInternationalआंतरराष्ट्रीय