ऐश्वर्याला यशस्वी विश्वसुंदरीचा किताब

By Admin | Updated: December 16, 2014 04:44 IST2014-12-16T04:44:15+5:302014-12-16T04:44:15+5:30

बॉलीवूड अभिनेत्री व माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चनचा जगातील सर्वाधिक यशस्वी विश्वसुंदरी म्हणून रविवारी झालेल्या सौंदर्य स्पर्धेदरम्यान सत्कार करण्यात आला.

Aishwarya's most successful book | ऐश्वर्याला यशस्वी विश्वसुंदरीचा किताब

ऐश्वर्याला यशस्वी विश्वसुंदरीचा किताब

लंडन : बॉलीवूड अभिनेत्री व माजी विश्वसुंदरी ऐश्वर्या राय-बच्चनचा जगातील सर्वाधिक यशस्वी विश्वसुंदरी म्हणून रविवारी झालेल्या सौंदर्य स्पर्धेदरम्यान सत्कार करण्यात आला.
इटलीचे फॅशन डिझायनर रॉबर्ट कैवाली यांनी तयार केलेला इव्हिनिंग गाऊन घातलेली ऐश्वर्या याप्रसंगी अत्यंत सुंदर दिसत होती. विश्वसुंदरी स्पर्धेच्या संयोजिका ज्युलिया मोली यांनी ऐश्वर्याचा सन्मान केला. याप्रसंगी स्टेजवर ऐश्वर्याची आई वृंदा राय, पती अभिषेक बच्चन व कन्या आराध्या हे उपस्थित होते. ऐश्वर्याने सन्मान स्वीकारल्यानंतर केलेल्या भाषणात विश्वसुंदरी संघटनेचे आभार मानले. (वृत्तसंस्था)

 

 

Web Title: Aishwarya's most successful book