Air on Sale! आता पाण्या प्रमाणेच विकलीजातेय बाटलीबंद 'हवा'!, किंमत वाचून व्हाल अवाक

By श्रीकृष्ण अंकुश | Published: December 25, 2020 08:11 PM2020-12-25T20:11:01+5:302020-12-25T20:15:05+5:30

विशेष म्हणजे, कंपनीने दावा केला आहे, की या बाटलीबंद हवेचा सुगंध घेऊन लोक काही वेळातच शेकडो मैल दूर आपल्या घरी पोहोचू शकतील. त्यांना असे वाटेल, की ते दूर असूनही मानसिक दृष्ट्या आपल्या घरातच आहेत.

Air on sale bottled air being sold in this country know the price | Air on Sale! आता पाण्या प्रमाणेच विकलीजातेय बाटलीबंद 'हवा'!, किंमत वाचून व्हाल अवाक

Air on Sale! आता पाण्या प्रमाणेच विकलीजातेय बाटलीबंद 'हवा'!, किंमत वाचून व्हाल अवाक

googlenewsNext
ठळक मुद्देजगात बाटलीबंद हवा हजारो रुपयांना विकणाऱ्या अनेक कंपन्या आहेत.ही कंपनी ब्रिटनच्या अनेक ठिकाणांवरील शुद्ध हवा बाटलीत बंद करून विकत आहे.बाटलीबंद हवेचा हा फॉर्म्युला केवळ ज्या शहरांतील हवा श्वास घेण्या योग्य आहे, त्याच शहरांत लागू होईल.

लंडण - पाण्या प्रमाणेच आता 'हवा'देखील बाटलीत कैद होऊ लागली आहे. जगात बाटलीबंद हवा हजारो रुपयांना विकणाऱ्या अनेक कंपन्या आहेत. ब्रिटनमध्ये कोरोना व्हायरसचा एक नवा आणि घातक स्ट्रेन आढळून आल्यानंतर मोठ्या प्रमाणावर काळजी घेतली जात आहे. येथील अनेक लोक आपल्या घरांपासून दूर अडकले आहेत. अशातच ख्रिसमसनिमित्त अशा लोकांसाठी येथील एका कंपनीने विशेष ऑफर आणली आहे.

ही कंपनी ब्रिटनच्या अनेक ठिकाणांवरील शुद्ध हवा बाटलीत बंद करून विकत आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे 500MLच्या बाटलीबंद हवेची किंमत किंमत जवळपास 2400 रुपये एवढी आहे. विशेष म्हणजे, कंपनीने दावा केला आहे, की या बाटलीबंद हवेचा सुगंध घेऊन लोक काही वेळातच शेकडो मैल दूर आपल्या घरी पोहोचू शकतील. त्यांना असे वाटेल, की ते दूर असूनही मानसिक दृष्ट्या आपल्या घरातच आहेत.

हवेचा वास घेतल्याने काय फरक पडेल?
आपण विचार करत असाल, की एखाद्या ठिकाणावरच्या हवेचा सुगंध घेतल्याने काय फरक पडेल? असे मानले जाते, की मानवाचे नाक 10 हजार प्रकारचे वेगवेगळे सुगंध घेऊ शकते. मानसशास्त्रज्ञ सांगतात, की आपला मेंदू, एखाद्या विशिष्ट ठिकाणच्या सुगंधाला तेथील आठवणींशी जोडतो. मेंदूतील सुगंध आणि आठवणी रेकॉर्ड करणारा भाग एक दुसऱ्यासोबत एकत्रितपणे कार्य करतात. यामुळेच आपल्या 75 टक्के भावना या कुठल्या तरी सुगंधावर आधारलेल्या असतात.

या शहरांत लागू होईल फॉर्म्युला -
बाटलीबंद हवेचा हा फॉर्म्युला केवळ ज्या शहरांतील हवा श्वास घेण्या योग्य आहे, त्याच शहरांत लागू होईल. अर्थात दिल्लीतील एखादी व्यक्ती ब्रिटनमध्ये अडकली असेल आणि त्याला दिल्लीतील हवेचा गंध घ्यावा वाटला तर ते योग्य होणार नाही. कारण काल दिल्लीचा AQI शुद्ध हवेच्या स्केलपेक्षाही 5 पट अधिक खराब होती.

Web Title: Air on sale bottled air being sold in this country know the price

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.