एअरफोर्स वन: का आली डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्या देशातून जुनी विमाने मागविण्याची वेळ? या पर्यायांचा करतायत विचार...
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2025 13:20 IST2025-02-20T13:20:05+5:302025-02-20T13:20:24+5:30
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासाठी दोन बोईंग 747-200 विमाने आहेत. मी जुनी विमाने कोणत्यातरी दुसऱ्या देशातून मागवू शकतो किंवा खरेदी करू शकतो, असेही ते म्हणाले.

एअरफोर्स वन: का आली डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर दुसऱ्या देशातून जुनी विमाने मागविण्याची वेळ? या पर्यायांचा करतायत विचार...
जगातील सर्वात सुरक्षित, प्रेस्टिजिअस असलेल्या एअरफोर्स वन या विमानातून प्रवास करणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर आता प्रवासासाठी दुसऱ्या देशातून जुने विमान मागविण्याची वेळ आली आहे. राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्यासाठी असलेली एअरफोर्स वनची दोन विमाने आता 35 वर्षे जुनी झाली आहेत. आणि दुसरीकडे बोईंग कंपनी 2018 मध्ये करार करून देखील अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांसाठी नवीन विमाने पुरवू शकलेली नाहीय. यामुळे ट्रम्प यांनी पर्यायांची चाचपणी करण्यास सुरुवात केली आहे.
अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षासाठी दोन बोईंग 747-200 विमाने आहेत. परंतू ही आता खूप जुनी झाली आहेत. यावर पत्रकारांनी ट्रम्प यांना प्रश्न विचारला होता. यावर ट्रम्प यांनी बोईंग कंपनीला आम्हाला विमाने देण्यास खूप वेळ लागत आहे. यामुळे आम्ही पर्यायांचा विचार करत आहोत. आम्ही विमान खरेदी करू शकतो आणि नंतर त्यात बदल करू शकतो. युरोपियन कंपनी एअरबसकडून विमान खरेदी करण्याचा विचार नाहीय. परंतू, जुनी बोईंग विमाने खरेदी करू शकतो, असे ट्रम्प यांनी म्हटले आहे. मी ही विमाने कोणत्यातरी दुसऱ्या देशातून मागवू शकतो किंवा खरेदी करू शकतो, असेही ते म्हणाले.
बोईंगकडून विमाने येण्यास २०२९ किंवा त्यानंतरही विलंब होऊ शकतो, असे व्हाईट हाऊसने म्हटले आहे. धक्कादायक बाब म्हणजे २०१८ मध्ये तेव्हाच्या दराने विमाने देण्याची डील अमेरिकन सरकार आणि बोईंग यांच्यात झाली होती. या विमानांना विलंब होत असल्याने सध्याच्या घडीला बोईंग या डीलमध्ये दोन अब्ज डॉलर नुकसानीत आहे. ही विमाने चार अब्ज डॉलर्सपर्यंतच देण्याची डील झाली होती. आता याविमानांचा खर्च सहा अब्ज डॉलरच्या वर जात आहे.
का होतोय विलंब...
एअर फोर्स वनमध्ये सामान्य विमानांप्रमाणे सामुग्री वापरलेली नसते. त्यांची बांधणी आणि आतील गोष्टी या वेगळ्या पद्धतीने बनवाव्या लागतात. या गोष्टी बनविणाऱ्या काही कंपन्या बंद पडल्या आहेत. तसेच सप्लाय चेनही समस्यांची आहे. यामुळे नवीन एअरफोर्स वन बनण्यास विलंब होत आहे. एलन मस्क यांच्या पहिल्या कार्यकाळात ही डील झाली होती. आता दुसरा कार्यकाळ सुरु झाला तरी विमाने न मिळाल्याने बोईंगसाठी डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे.