एआयमुळे विचार करण्याची क्षमता थांबली

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2025 06:32 IST2025-01-20T06:31:17+5:302025-01-20T06:32:14+5:30

Science News: तंत्रज्ञानाच्या जगात बऱ्याच गोष्टी वेगाने वाढत आहेत. यात एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही समावेश आहे. जगभरात एआयचा वापर झपाट्याने वाढत आहे आणि त्याचप्रमाणे त्यावर आपले अवलंबित्वही वाढत आहे.

AI has stopped the ability to think | एआयमुळे विचार करण्याची क्षमता थांबली

एआयमुळे विचार करण्याची क्षमता थांबली

न्यूयॉर्क : तंत्रज्ञानाच्या जगात बऱ्याच गोष्टी वेगाने वाढत आहेत. यात एआय अर्थात आर्टिफिशियल इंटेलिजन्सचाही समावेश आहे. जगभरात एआयचा वापर झपाट्याने वाढत आहे आणि त्याचप्रमाणे त्यावर आपले अवलंबित्वही वाढत आहे. अनेक क्षेत्रांत त्याचा खूप फायदा होत असला, तरी एआयवर पूर्णपणे अवलंबून राहिल्यामुळे आपल्या विचार करण्याच्या क्षमतेवर परिणाम होत असल्याचे समोर आले आहे.

एआयच्या वाढत्या वापरामुळे विद्यार्थ्यांची विचार करण्याची क्षमता कमी होत असल्याचे समोर आले आहे. ब्रिटनमधील १७ वर्षांपेक्षा जास्त वयाच्या ६५० हून अधिक विद्यार्थ्यांचे सर्वेक्षण करण्यात आले. (वृत्तसंस्था) 

संशोधनात काय आढळले?
हे तरुण संज्ञानात्मक अपलोडिंग करत असतात. याचा अर्थ, गोष्टी लक्षात ठेवण्यासाठी आणि त्यांच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी ते एआयवर खूप अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांची विश्लेषण करण्याची, तर्क करण्याची आणि समस्यांचे निराकरण करण्याची क्षमता कमी होत आहे. 

जितके जास्त अवलंबून तितके...
तरुण एआय टूल्सवर जितके जास्त अवलंबून आहेत तितकी त्यांची विचार करण्याची आणि चर्चा करण्याची क्षमता कमी होत आहे असल्याचे आढळून आले आहे. संशोधनात तरुणांच्या तुलनेत वृद्ध लोक एआयवर कमी अवलंबून असल्याचे आढळून आले.  सोसायटीज जर्नलमध्ये हे संशोधन प्रकाशित झाले आहे. 

काय प्रश्न विचारले?
सर्वेक्षणातील सहभागींना तीन वयोगटांमध्ये (१७-२५, २६-४५, ४६ आणि त्याहून अधिक) विभागण्यात आले होते. त्यांच्यातील शिक्षणाची पातळीही वेगळी होती.
यानंतर त्यांना २३ प्रश्न विचारण्यात आले. यामध्ये ते एआय टूल्सचा किती वापर करतात आणि त्यावर किती अवलंबून आहेत हे समोर आले.
याशिवाय त्यांची विचार करण्याची क्षमता आणि आकलन क्षमताही मोजली गेली. काही सहभागींनी मान्य केले की निर्णय घेण्यासाठी एआयवर अवलंबून राहिल्याने त्यांची विचार करण्याची क्षमता कमी झाली आहे. 

 

Web Title: AI has stopped the ability to think

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.