शहरं
Join us  
Trending Stories
1
“भाजपाला पराभव दिसू लागलाय, प्रचंड मताधिक्यांनी १०० टक्के विजयी होणार”: विशाल पाटील
2
‘मुलीला वडिलांच्या संपत्तीत ५० टक्के अधिकार, हा सरकारचा कायदा’, सुप्रिया सुळेंचा जानकरांना टोला 
3
'कसाब नाही, हेमंत करकरेंवर पोलिसांनी गोळ्या घाडल्या', विजय वडेट्टीवारांचा खळबळजनक दावा
4
अजितदादांचे पुत्र जय पवारांनी घेतली मनोज जरांगेंची भेट; कारण गुलदस्त्यात, चर्चांना उधाण
5
चोरीच्या आरोपाखाली महिलेला दिली थर्ड डिग्री, पोलिसांवर गुन्हा दाखल 
6
'राणेंचा प्रचार करायला लागतोय यातच राज ठाकरेंचा विजय'; काँग्रेस नेत्याची बोचरी टीका
7
मौनी खासदाराचं कौतुक करणं मनसे प्रमुखांची मजबुरी, संजय राऊतांचा राज ठाकरेंवर निशाणा
8
४ जूननंतर अजित पवार मिशी काढून फिरतील; आव्हानावर श्रीनिवास पवारांचे जोरदार प्रत्त्यूत्तर
9
PHOTOS: अभिनेत्रींना मात देणारी 'अधिकारी'! राजकारणात आवड, चित्रपटांची ऑफर पण...
10
धक्कादायक! कोविड सारख्या 'या' गंभीर आजारामुळे हजारो 'श्वान' मरणाच्या दारात!
11
बजरंग पूनियावर NADAची मोठी कारवाई, पॅरिस ऑलिम्पिकमध्ये खेळण्याचं स्वप्न भंगणार?
12
“छत्रपती शिवरायांचा अनादर करणारा नेता नको”; पीयूष गोयल यांची राहुल गांधींवर टीका
13
ऑस्ट्रेलियातील महिला खासदाराचा लैंगिक छळ; पोस्ट करत मांडली व्यथा, म्हणाल्या...
14
राहुल गांधी, सिद्धरामय्या यांच्या ॲनिमेटेड व्हिडिओवरून वाद; जेपी नड्डा, अमित मालवीय यांच्याविरोधात काँग्रेसची तक्रार
15
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना लाभ, व्यापाऱ्यांवर लक्ष्मीकृपा; बचत वाढेल, इच्छा पूर्ण होतील
16
'राजकारणातील कुठलीही ताकद...'; अमेठीतून तिकीट न मिळाल्याने रॉबर्ट वाड्रांची भावनिक पोस्ट
17
निज्जर हत्येप्रकरणी ३ भारतीयांना झालेल्या अटकेबाबत भारताची पहिली प्रतिक्रिया, जयशंकर म्हणाले...
18
"मुलांशी बोलू नकोस", भावाचा सल्ला अन् बहीण संतापली; १४ वर्षीय तरूणीने केली हत्या
19
नुपूर शर्मा, टी राजा यांच्यासह हिंदू नेत्यांच्या हत्येचा कट रचणाऱ्या मौलवीला अटक; १ कोटींची सुपारी अन् पाककडून शस्त्रे 
20
राहुल आणि सिद्धरामय्या यांचा कार्टून व्हिडिओ; काँग्रेसची जेपी नड्डांसह तीन BJP नेत्यांविरुद्ध तक्रार

इंडोनेशियामध्ये त्सुनामी, भूकंपानंतर आता ज्वालामुखीचा कहर

By ऑनलाइन लोकमत | Published: October 03, 2018 1:52 PM

इंडोनेशियामधील  नैसर्गित आपत्तींची मालिका अद्याप कायम असून, त्सुनामी आणि भूकंपामध्ये झालेल्या विनाशानंतर आता देशाला ज्वालामुखीच्या उद्रेकाचा सामना करावा लागला आहे.

जाकार्ता - इंडोनेशियामधील  नैसर्गित आपत्तींची मालिका अद्याप कायम असून, त्सुनामी आणि भूकंपामध्ये झालेल्या विनाशानंतर आता देशाला ज्वालामुखीच्या उद्रेकाचा सामना करावा लागला आहे. इंडोनेशियातील उत्तर सुलावेसीमधील माऊंट सोपुतन या ज्वालामुखीचा उद्रेक झाला असून, त्यामुळे स्थानिकांच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे. आठवडाभरामध्ये त्सुनामी आणि भूकंपामुळे इंडोनेशियात हजारो लोक मारले गेले आहेत. त्या आपत्तीमधून इंडोनेशिया अद्याप सावरला नसतानाच उत्तर सुलावेसीमधील माऊंट सोपुतन ज्वालामुखी जागृत झाला आहे. या ज्वालामुखीमध्ये होत असलेल्या स्फोटामुळे त्सुनामी आणि भूकंप पीडितांसाठी चालवण्यात येत असलेल्या मदतकार्यामध्ये अडथळे येत आहेत. बुधवारी या ज्वालामुखीचा उद्रेक झाला, अशी माहिती इंडोनेशियातील आपत्ती व्यवस्थापनाच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे. प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिद्ध होत असलेल्या छायाचित्रामधून ज्वालामुखीतील राखेचे लोट 4 हजार मीटर उंचीपर्यंत पोहोचल्याचे दिसत आहे.  इंडोनेशियातील माऊंट सोपुतनच्या उत्तर पश्चिम भागात ज्वालामुखीमधून उठलेली राख दूरच्या प्रदेशातही पोहोचण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. मात्र सध्यातरी ज्वालामुखीतून येणाऱ्या राखेमुळे देश आणि परदेशातील विमानसेवेवर परिणाम होण्याची शक्यता नाही, अशी माहिती बीएनपीडी या संस्थेने  दिली आहे.  

टॅग्स :IndonesiaइंडोनेशियाVolcanoज्वालामुखी