टोकियो ऑलिम्पिकवरुन परतल्यानंतर खेळाडूला बेदम मारहाण, चेहऱ्यावर पडले अनेक टाके

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2021 16:36 IST2021-08-22T16:32:50+5:302021-08-22T16:36:52+5:30

Tokyo Olympics: आयरलँडचा प्रसिद्ध तायक्‍वांडो खेळाडून जॅक वूलीवर डब्लिन शहरात अज्ञाताकडून हल्ला करण्यात आला आहे.

After returning from the Tokyo Olympics, jack woolley of ireland beaten, several stitches on face | टोकियो ऑलिम्पिकवरुन परतल्यानंतर खेळाडूला बेदम मारहाण, चेहऱ्यावर पडले अनेक टाके

टोकियो ऑलिम्पिकवरुन परतल्यानंतर खेळाडूला बेदम मारहाण, चेहऱ्यावर पडले अनेक टाके

नवी दिल्ली: जापानची राजधानी टोकियोमध्ये पार पडलेल्या ऑलिम्पिकमध्ये सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंचं मायदेशी परतल्यावर जंगी स्वागत करण्यात आलं. पण प्रत्येक खेळाडूचं नशीब इतकं चांगलं नसतं. आयर्लंडचा प्रसिद्ध तायक्वांदो खेळाडू जॅक वूलीला टोकियोहून परतणं चांगलंच महाग पडलं आहे. त्याच्यासोबत घडलेल्या घटनेबाबत त्याने कधी स्वप्नातही विचार केला नसेल.

टोकियो ऑलिम्पिकमधून परतल्यानंतर आयरिश खेळाडू जॅक वूलीला त्याच्या देशात 14 ऑगस्टच्या रात्री एका अज्ञाताकडून जबर मारहाण करण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. या जबर मारहाणीत रक्तबंबाळ झालेल्या वूलीला सेंट जेम्स रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून, डॉक्टरांना त्याच्या चेहऱ्यावर विशेषतः ओठांवर अनेक टाक लावावे लागले. सध्या पोलीस आरोपींचा शोध घेत आहेत. 

पदकाला हुकला जॅक

आयर्लंडकडून जॅक वूली तायक्वांदो या खेळामध्ये देशाचं नेतृत्व करत होता. पण, आयर्लंडसाठी टोकियो ऑलिम्पिकमध्ये त्याला पदक जिंकका आलं नाही. अर्जेंटिनाच्या लुकास गुझमनने त्याला 'राउंड ऑफ 16' मध्ये पराभूत केलं होतं.

 

Web Title: After returning from the Tokyo Olympics, jack woolley of ireland beaten, several stitches on face

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.