शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

पाकिस्तान, चीनपाठोपाठ रशियाचाही तालिबानला पाठिंबा, म्हणाले, आता काबुल अधिक सुरक्षित

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 17, 2021 09:19 IST

Taliban in Afghanistan: रविवारी तालिबानी दहशतवाद्यांनी काबुलमध्ये प्रवेश केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी देश सोडून पसार झाले. राष्ट्रपतींनी देश सोडल्यानंतर तालिबानने देशाची सत्तासूत्रे हातात घेतली आहेत.

मॉस्को - जवळपास २० वर्षे अफगाणिस्तानमध्ये तळ ठोकून असलेले अमेरिकन सैन्य माघारी परतल्यानंतर अवघ्या काही दिवसांतच तालिबानने संपूर्ण अफगाणिस्तानवर कब्जा केला आहे. (Taliban in Afghanistan) रविवारी तालिबानी दहशतवाद्यांनी काबुलमध्ये प्रवेश केल्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अश्रफ घनी देश सोडून पसार झाले. राष्ट्रपतींनी देश सोडल्यानंतर तालिबानने देशाची सत्तासूत्रे हातात घेतली आहेत. दरम्यान, पाकिस्तान आणि चीनसारख्या देशांनी तालिबानला पाठिंबा दिला आहे. दरम्यान, रशियानेही तालिबानला पाठिंबा देण्याची भूमिका घेतल्याचे समोर येत आहे. (Russia's ambassador to Afghanistan Dmitry Zhirnov said Taliban had made Kabul safer in the first 24 hours than it had been under the previous authorities)

जगभरातील वेगवेगळ्या देशांकडून तालिबानवर टीका होत असताना रशिकाकडून तालिबानला उघडपणे पाठिंबा मिळताना दिसत आहे. रशियाचे अफगाणिस्तानमधील राजदूत दिमित्री जिरनोव्ह यांनी सांगितले की, अफगाणिस्तानमधील याआधीच्या सरकारच्या तुलनेत तालिबाबने पहिल्या २४ तासांमध्ये काबुल अधिक सुरक्षित बनवले आहे. 

दरम्यान, अफगाणिस्तानची राजधानी काबूलवर तालिबानींनी कब्जा केल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी रविवारीच देशाबाहेर पळून गेले असून, त्यामुळे अफगाण सैनिक आणि पोलिसांनीही आपली शस्त्रे टाकून दिली आहेत. ते तालिबानींना शरण जात आहेत. राष्ट्रपती निवासानंतर घनी यांचे कार्यालयही तालिबानी नेत्यांनी सोमवारी ताब्यात घेतले आणि तिथे आपला झेंडा लावला. ९० टक्के अफगाण तालिबानींनी ताब्यात घेतला आहे.तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. व्हिसा, पासपोर्ट नसूनही ते  विमानतळाच्या दिशेने पळत आहेत. त्या नागरिकांना मृत्यूपेक्षाही तालिबानचीच अधिक भीती वाटत आहे. विमानतळावर तालिबानला कब्जा करता आला नसून ते अमेरिकेच्या ताब्यात आहे. अमेरिकेने आपला दूतावासच  विमानतळावर हलविला आहे. तालिबानी तिथे हल्ले करतील या शक्यतेने तिथे मोठ्या प्रमाणात अमेरिकी सैनिक तैनात आहेत.

सततच्या संघर्षामुळे अफगाणिस्तानात २००१ ते नोव्हेंबर २०१९ या कालावधीत सर्वसामान्य नागरिक, सैनिक, बंडखोरांसह एकूण १ लाख ५७ हजार लोकांचा मृत्यू झाला आहे. उपलब्ध आकडेवारीनुसार, ४३ हजार नागरिक, ४४ हजार अफगाण सैनिक आणि ४२ हजार बंडखोरांचा मृत्यू झाला आहे. तर नोव्हेंबर २०१९नंतर १३ हजार नागरिकांचा मृत्यू झाल्याचे ही आकडेवारी सांगते.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानInternationalआंतरराष्ट्रीय