अण्वस्त्रांनंतर आता हे घातक शस्त्र बनवतोय किम जोंग उनचा उत्तर कोरिया! कशासाठी सुरू आहे हा अट्टहास?
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2025 20:59 IST2025-07-10T20:58:49+5:302025-07-10T20:59:15+5:30
महत्वाचे म्हणजे, उत्तर कोरियामध्ये रासायनिक शस्त्रे वाहून नेणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी आधीच घेण्यात आली आहे. किम जोंग उन, रासायनिक शस्त्रांना एक धोरणात्मक प्रतिबंधात्मक मानतात. म्हणूनच त्याच्या संशोधन, विकास आणि निर्मितीच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे.

अण्वस्त्रांनंतर आता हे घातक शस्त्र बनवतोय किम जोंग उनचा उत्तर कोरिया! कशासाठी सुरू आहे हा अट्टहास?
उत्तर कोरियाने अणुबॉम्बनंतर आणखी एका घातक शस्त्र तयार करण्याचे काम सुरू केले आहे. हे असे शस्त्र आहे जे विकसित होताच, कोणत्याही युद्धात उत्तर कोरियाचा विजय सुनिश्चित करेल. महत्वाचे म्हमजे, खुद्द किम जोंग उन यांनी स्वतःच हे शस्त्र तयार करण्याचे आदेश दिले आहेत. स्थानिक मीडिया आउटलेट डेली एनके के नुसार, हे धोकादायक शस्त्र रासायनिक शस्त्र असेल. उत्तर कोरियाने त्याच्या निर्मितीची प्रक्रियाही सुरू केली आहे.
महत्वाचे म्हणजे, उत्तर कोरियामध्ये रासायनिक शस्त्रे वाहून नेणाऱ्या बॅलिस्टिक क्षेपणास्त्रांची चाचणी आधीच घेण्यात आली आहे. किम जोंग उन, रासायनिक शस्त्रांना एक धोरणात्मक प्रतिबंधात्मक मानतात. म्हणूनच त्याच्या संशोधन, विकास आणि निर्मितीच्या प्रक्रियेला वेग देण्यात आला आहे.
सर्वात घातक असेतं रासायनिक शस्त्र -
युद्धाच्या तयारीसाठी रासायनिक शस्त्रे ही सर्वात शक्तिशाली शस्त्रांपैकी एक मानली जातात. युद्ध आणि संघर्षाच्या परिस्थितीनुसार, त्यांचा वापर अण्वस्त्रांसोबतही केला जाऊ शकतो. डेली एनकेमध्ये प्रकाशित एका वृत्तानुसार, अणुबॉम्बसोबत रासायनिक शस्त्रांचा वापर शत्रूला पूर्णपणे कमकुवत करू शकतो.
१.२५ लाख लोकांचा बळी घेऊ शकते एक हजार किलो ग्रॅम सरीन -
अमेरिकेतील रँड कॉर्पोरेशनने २०२२ मध्ये एक अहवाल प्रकाशित केला होता. यात उत्तर कोरियाच्या रासायनिक शस्त्र कार्यक्रमासंदर्भातही चिंता व्यक्त करण्यात आली होती. यात, "एक हजार किलो ग्रॅम सरीन सुमारे १ लाख २५ हजार लोकांचा बळी घेऊ शकते," असा दावाही करण्यात आला होता. महत्वाचे म्हणजे, उत्तर कोरियाने रासायनिक शस्त्रांचे व्यवस्थापन करण्यासाठी न्यूक्लियर केमिकल डिफेन्स ब्युरो देखील तयार केला आहे.