शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी घडामोड, रशियाकडून युद्धविरामाची घोषणा; २ दिवस युक्रेन हल्ले नाही, अचानक नेमके काय घडले?
2
आजचे राशीभविष्य, १० एप्रिल २०२६: कोणताही महत्त्वाचा निर्णय घेणे टाळा; प्रवास संभवतो
3
“हे सगळे लगेचच थांबवा, आमचा करार...”; होर्मुझवर टोल आकारणीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
4
अग्रलेख: कुंभमेळा श्रद्धेचा, संघर्षाचा नव्हे! ‘नवे नाशिक’ उभे राहताना ‘आपले नाशिक’ हरवतंय..?
5
फोन ४०% महागले, किंमत आणखी वाढणार? विक्रीत १० टक्क्यांपर्यंत घट होण्याची शक्यता
6
न्यू इंडिया बँक १२२ कोटींचा घाेटाळा: माजी महाव्यवस्थापक हितेश मेहता यांना जामीन नाकारला
7
भारतात मुलांच्या मृत्यूचे १० वे कारण ठरतोय ‘कॅन्सर’; वर्षभरात १७ हजार बालकांचा मृत्यू
8
पुढील ४ आठवडे उन्हाच्या झळा; पूर्वेकडील वाऱ्यांचा प्रभाव, पारा चाळिशी पार जाण्याचा अंदाज
9
केवळ घर नव्हे, उद्योगही चालवणार! महिलांकडील कर्ज ७६ लाख कोटींवर, २०१७पेक्षा पाचपट वाढ
10
सुरुंग पेरलेला होर्मुझचा नकाशा जारी; इराणने पुन्हा भरवली जगाला धडकी; अमेरिकेवर दबाव
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
पंथ, संप्रदायांच्या आधारे मंदिरांमध्ये प्रवेश दिल्यास हिंदू धर्मावर नकारात्मक परिणाम: सुप्रीम कोर्ट
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
केरळ, आसाम व पुद्दुचेरीत विक्रमी मतदान! कुठे बोटीचा प्रवास, तर कुठे पावसातही हजेरी
15
हॅकर्स म्हणतात, युद्धविरामाशी आमचा संबंध नाही; ‘हंदाला’कडून हल्ल्याची अमेरिका-इस्रायलला भीती
16
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
17
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
18
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
19
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
20
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
Daily Top 2Weekly Top 5

IMFनंतर आता पाकला ADBची आर्थिक मदत, भारताच्या विरोधाला न जुमानता दिले $800 मिलियन

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 4, 2025 17:15 IST

Pakistan News: दहशतवादाला खतपाणी घालण्याचा इतिहास असल्याने पाकिस्तानला कोणत्याही प्रकारच्या मदतीवर भारताने तीव्र आक्षेप घेतला होता.

India-Pakistan: पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारतानेऑपरेशन सिंदूरद्वारे पाकिस्तानवर जोरदार प्रहार केला. याशिवाय, सिंधू पाणी करार स्थगित करणे आणि आंतरराष्ट्रीय व्यासपीठांवर पाकिस्तानचा दहशतवादी चेहरा जगसमोर आणण्याचे काम सुरू आहे. तसेच, पाकला मिळणारी आर्थिक मदत रोखण्याचा प्रयत्नही भारताकडून सुरू आहे. पण, यामध्ये अद्याप भारताला पूर्णपणे यश मिळाले नाही. पाकिस्तानला आयएमएफनंतर आता आशियाई विकास बँकेकडून (ADB) 800 मिलियन अमेरिकन डॉलर्सची मदत मिळाली आहे. भारताच्या विरोधाला न जुमानता ADB ने हे पाऊल उचलले आहे.

भारताचा तीव्र आक्षेपदहशतवादाला खतपाणी घालण्याचा इतिहास असल्याने पाकिस्तानला कोणत्याही प्रकारच्या मदतीवर भारताने तीव्र आक्षेप घेतला होता. यापूर्वी, आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने (IMF) पाकिस्तानला सुमारे 8,500 कोटी रुपयांचे बेलआउट पॅकेज जारी केले होते. भारताने कर्जाच्या रकमेच्या गैरवापराबद्दल गंभीर चिंता व्यक्त केली आहे.

'पाकिस्तानच्या कर प्रणालीत सुधारणा केली जाईल'पाकिस्तानच्या अर्थमंत्र्यांचे सल्लागार खुर्रम शहजाद म्हणाले की, सुधारणा कार्यक्रमांतर्गत एडीबीने पाकिस्तानसाठी 800 मिलियन अमेरिकन डॉलर्सचे बेलआउट पॅकेज मंजूर केले आहे. पाकिस्तानचे उद्दिष्ट देशांतर्गत संसाधने एकत्रित करणे आणि आर्थिक सुधारणांद्वारे अर्थव्यवस्था स्थिर करणे आहे. ही मदत कर प्रणाली सुधारेल आणि महसूल वाढवेल. आर्थिक स्वावलंबनाच्या दिशेने हे एक महत्त्वाचे पाऊल आहे.

'पाकिस्तान विकासाऐवजी दहशतवादावर खर्च करेल'भारत म्हणतो की, पाकिस्तान एडीबी आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांकडून मिळालेल्या कर्जाचा वापर आपल्या देशाच्या विकासाऐवजी दहशतवाद आणि लष्करी खर्चासाठी करतो. एडीबी आणि आयएमएफकडून अनेक कर्जे घेऊनही पाकिस्तान वारंवार आर्थिक सुधारणा लागू करण्यात अपयशी ठरला आहे. तेथील सरकारच्या प्रत्येक निर्णयात सैन्य हस्तक्षेप करते, असा आरोपही भारताने केला आहे.

टॅग्स :Pahalgam Terror Attackपहलगाम दहशतवादी हल्लाOperation Sindoorऑपरेशन सिंदूरTerrorismदहशतवादIndiaभारत