कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एक व्हायरस आढळला; उपचार न घेतल्यास ८० टक्के मृत्यूचा धोका

By ऑनलाइन लोकमत | Published: July 25, 2021 05:57 AM2021-07-25T05:57:50+5:302021-07-25T05:59:44+5:30

सुदैवाची बाब म्हणजे भारतातील माकडांमध्ये अद्याप या विषाणूची उपस्थिती आढळलेली नाही. 

After the corona virus, Monkey B virus; 80% risk of death if left untreated | कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एक व्हायरस आढळला; उपचार न घेतल्यास ८० टक्के मृत्यूचा धोका

कोरोनानंतर चीनमध्ये आणखी एक व्हायरस आढळला; उपचार न घेतल्यास ८० टक्के मृत्यूचा धोका

Next
ठळक मुद्देबीजिंगमध्ये मंकी बी व्हायरच्या संसर्गामुळे एका पशुवैद्यकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. संबंधित डॉक्टर ज्या संस्थेत काम करत होता त्या संस्थेने मार्च महिन्यात दोन मृत माकडांवर संशोधन केले होते. उपचार करूनही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेरीस त्याचा मृत्यू झाला. 

कोरोना विषाणूच्या मगरमिठीतून थोडी उसंत मिळण्याची चिन्हे असताना आता चीनमध्ये माकडापासून संक्रमित होणाऱ्या विषाणूचा उगम झाल्याचे वृत्त आहे. या विषाणूच्या संसर्गामुळे एकाचा मृत्यूही झाला. 

कोणत्या माकडांपासून संसर्ग होण्याची शक्यता?

 • म्हातारे मेकॉक माकडे
 • रीसस मेकॉक
 • डुकराच्या शेपटीच्या आकाराची शेपटी असलेले मेकॉक माकड
 • सिनोमोलगस माकड
 • लांब शेपटीची वानरे
 • सुदैवाची बाब म्हणजे भारतातील माकडांमध्ये अद्याप या विषाणूची उपस्थिती आढळलेली नाही. 

 

संसर्ग कसा होतो ?

 • माकडाच्या संपर्कात आल्यास
 • माकडाने चावल्यास
 • माकडाने बोचकारल्यास
 • माकडाच्या मल-मूत्राशी संपर्क आल्यास
 • मंकी बी व्हायरसची 
 • लागण झाल्यास मृत्यूदर 
 • ७० ते ८० टक्के असल्याचा तज्ज्ञांचा दावा आहे. 
 • संसर्ग झाल्याची लक्षणे महिनाभरात दिसू लागतात. 

 

विषाणूचे नाव काय?
मंकी बी व्हायरस

लक्षणे काय आहेत?

 • खाज सुटणे
 • ताप येणे, थंडी वाजणे
 • जखम झालेल्या भागात 
 • तीव्र वेदना होणे 
 • उलट्या किंवा मळमळ होणे
 • स्नायू आकुंचित पावणे
 • दिवसभर डोकेदुखी 

 

पहिल्या बळीची नोंद 
बीजिंगमध्ये मंकी बी व्हायरच्या संसर्गामुळे एका पशुवैद्यकाचा मृत्यू झाल्याची नोंद आहे. संबंधित डॉक्टर ज्या संस्थेत काम करत होता त्या संस्थेने मार्च महिन्यात दोन मृत माकडांवर संशोधन केले होते. त्यानंतर या डॉक्टरला उलट्या होण्याचा त्रास सुरू झाला. अनेक ठिकाणी उपचार करूनही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. अखेरीस त्याचा मृत्यू झाला. 

संसर्गाचा धोका कोणाला?

 • विषाणू प्रयोगशाळेत काम करणारे कर्मचारी.
 • प्राण्यांचे डॉक्टर.
 • माकडांवर संशोधन करणारे कर्मचारी.
 • मंकी बी व्हायरसची लागण झाल्याचे वेळीच लक्षात आल्यास उपचार घेतले जाऊ शकतात.

Web Title: After the corona virus, Monkey B virus; 80% risk of death if left untreated

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app