अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 21, 2025 11:05 IST2025-12-21T11:05:21+5:302025-12-21T11:05:45+5:30
जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये रविवारी सकाळी गोळीबाराची एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका टाउनशिप परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी ...

अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
जोहान्सबर्ग: दक्षिण आफ्रिकेतील जोहान्सबर्गमध्ये रविवारी सकाळी गोळीबाराची एक हादरवून टाकणारी घटना घडली आहे. येथील एका टाउनशिप परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी केलेल्या अंदाधुंद गोळीबारात १० निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला असून, १० जण गंभीर जखमी झाले आहेत. या घटनेमुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, जोहान्सबर्गजवळील एका टाउनशिपमध्ये लोक असताना अचानक हल्लेखोरांनी गोळीबार सुरू केला. हल्लेखोरांचा हेतू आणि त्यांची ओळख अद्याप पटलेली नाही. जखमींना तातडीने जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, मृतांचा आकडा वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
सुरक्षा व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह विशेष म्हणजे, या चालू महिन्यात दक्षिण आफ्रिकेतील ही मास शूटिंगची दुसरी मोठी घटना आहे. वारंवार होणाऱ्या अशा हल्ल्यांमुळे दक्षिण आफ्रिकेतील सुरक्षा व्यवस्थेवर गंभीर प्रश्नचिन्ह उभे राहिले आहे. स्थानिक पोलीस सध्या परिसरात नाकाबंदी करून आरोपींचा शोध घेत आहेत.