मोरोक्कोमध्ये ६० वर्षांनंतर एवढा भीषण भूकंप! ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 9, 2023 20:11 IST2023-09-09T20:06:40+5:302023-09-09T20:11:59+5:30

युनेस्कोच्या वारसास्थळाचेही नुकसान

After 60 years, such a terrible earthquake in Morocco! More than 800 people died | मोरोक्कोमध्ये ६० वर्षांनंतर एवढा भीषण भूकंप! ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू

मोरोक्कोमध्ये ६० वर्षांनंतर एवढा भीषण भूकंप! ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू

आफ्रिकन देश मोरोक्को येथे शुक्रवारी रात्री उशिरा आलेल्या विनाशकारी भूकंपामुळे आतापर्यंत ८०० हून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे, तर शेकडो लोक जखमी झाले आहेत. मोरोक्कोमध्ये गेल्या सहा दशकांतील सर्वात हा मोठा भूकंप आहे. 

ऋषी सुनक यांचे हेडफोन पाहून अमन गुप्ता खूश; इन्स्टावरून केलं 'ब्रँडेड' स्वागत

वृत्तांनुसार, भूकंपामुळे मोरोक्कोमधील शेकडो इमारती उद्ध्वस्त झाल्या असून मोरोक्कोच्या प्रमुख शहरांमध्ये राहणाऱ्या लोकांना घरे सोडण्यास भाग पाडले आहे. या विनाशकारी भूकंपामुळे युनेस्कोच्या वारसा स्थळांचेही नुकसान झाले आहे. भूकंपातील मृतांची संख्या ८२० वर पोहोचली आहे तर ६७२ इतर लोक जखमी झाले आहेत. बहुतेक मृत्यू डोंगराळ भागात झाले आहेत, येथे मदत पोहोचणे कठीण होते. शुक्रवारी रात्री उशिरा मोरोक्कोच्या हाय अॅटलस पर्वतरांगांमध्ये झालेल्या भूकंपाची तीव्रता ७.२ इतकी होती.

नागरीकांनी दिलेल्या माहितीनुसार, भूकंपामुळे अनेक जुन्या इमारती कोसळल्या.  लोक घाबरले आहेत आणि भूकंपाच्या भीतीने घराबाहेर पडले आहेत. शुक्रवारी रात्री उशिरा झालेल्या भूकंपाने हाहाकार माजवला.

स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार, "भूकंपामुळे बहुतेक घरांचे नुकसान झाले आहे. आमचे शेजारी ढिगाऱ्याखाली दबले आहेत. लोक उपलब्ध साधनांचा वापर करून त्यांना बाहेर काढण्याचा प्रयत्न करत आहेत." दरम्यान, भूकंपाचे धक्के जाणवताच आपण घरातून बाहेर धाव घेतल्याचे स्थानिक शिक्षक हमीद अफकार यांनी सांगितले.

यूएस जिओलॉजिकल सर्व्हेनुसार, १९६० नंतरचा हा मोरोक्कोचा सर्वात प्राणघातक भूकंप आहे. 

Web Title: After 60 years, such a terrible earthquake in Morocco! More than 800 people died

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Earthquakeभूकंप