शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐन पौर्णिमेलाच चंद्र झाकोळला; चंद्रग्रहणाला सुरुवात, रात्री ११ वाजता लाल रंगात दिसणार...
2
टोयोटाकडून मोठी घोषणा! फॉर्च्युनरची ३.४९ लाखांनी किंमत तुटली, क्रिस्टा तर मार्केट खाणार...
3
एकनाथ शिंदेंनी पाडले अजित पवारांच्या राष्ट्रवादीला खिंडार; महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षच फोडला, उद्या प्रवेश
4
Lalbaugcha Raja Visarjan Video: चंद्रग्रहणाला काही मिनिटे शिल्लक असताना...; रात्री ९ वाजता लालबागच्या राजाचे विसर्जन
5
नूतनीकरण ऑक्टोबरमध्ये...! इन्शुरन्स कंपन्या आतापासूनच १८ टक्के जीएसटीवाला हेल्थ प्रिमिअम पाठवू लागल्या
6
'पीएम मोदी देशाचे शत्रू ', ट्रम्प टॅरिफचा उल्लेख करत मल्लिकार्जुन खरगेंचे टीकास्त्र
7
ठाणे : जिल्हा न्यायाधीशांच्या शासकीय घरातील स्लॅब कोसळला; न्यायाधीशांची पीडब्ल्यूडीविरोधात पोलिसांत तक्रार
8
गुंडगिरीचा कळस! माजी सरपंचावर जीवघेणा हल्ला; लाेखंडी राॅड, स्टंपने २२ मिनिटे मारहाण
9
इस्रायलने अचानक एअरस्पेस बंद केली; नेमके काय घडतेय... गाझा पट्टी की आणखी काही...
10
लव्ह स्टोरीचे बिंग फुटण्याची भीती; पोलिस भरती अकॅडमीच्या संचालकांनेच केले विद्यार्थ्याचे अपहरण
11
लहान मुलांना सनरुफ उघडून देताय? महिंद्रा ३XO चा व्हिडीओ पहाल कर, थरकाप उडेल...
12
ओबीसी आणि मराठा आरक्षणावर राज्य सरकार ठाम; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंची स्पष्टोक्ती
13
“मनोज जरांगे पाटील मराठा समाजाचे नुकसान करतायत, स्वतःचे महत्त्व वाढावे...”; कुणी केली टीका?
14
धुळे हळहळले! रील स्टार शुभम सिंघवी याच्या दुचाकीला अपघात, जागेवरच मृत्यू
15
अवघ्या १५०० रुपयांत बनावट आधारकार्ड, दोन हजार लोकांना 'त्यानं' बनवलं मूर्ख! पोलिसांनी कसं पकडलं?
16
नऊवारी, फेटे अन् ढोल ताशे! जर्मनीच्या ड्युसलडॉर्फमध्ये उत्साहात साजरा झाला गणेशोत्सव!
17
भंडाऱ्याची उधळण अन पुष्पवृष्टी, श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीला दिमाखदार मिरवणुकीने निरोप!
18
दहशतवाद्यांना पाकिस्तानची साथ; भारताने पाडलेल्या लष्कर-ए-तैयबाच्या मुख्यालयाचे बांधकाम पुन्हा सुरू
19
ह्युंदाईचे जीएसटी कपातीचे दर आले! नियॉस ७३,८०८, ऑरा ७८...; पहा कितीने कमी झाली क्रेटा...
20
‘हा तर मणिपूरच्या लोकांचा अपमान आहे’, PM मोदींच्या दौऱ्यावर काँग्रेसची बोचरी टीका

एक हजार वर्षांनंतर चीनमध्ये पुराचं भयंकर थैमान; लोक म्हणतायत- जगात कोरोना पसरवला, त्याचाच परिणाम...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 22, 2021 14:40 IST

म्हटले जाते, की चीनमध्ये गेल्या एक हजार वर्षांनंतर एवढा प्रचंड पाऊस होत आहे (Heavy Rain In China). एवढ्या वर्षांत, असा पाऊस चीनवर कधीही कोसळला नव्हता.

जगातील आजच्या कोरोना परिस्थितीला चीनच जबाबदार असल्याचे मानले जाते. वुहानच्या मीट मार्केट (Wuhan Flesh Market)मध्ये विकल्या जाणाऱ्या वटवाघळांच्या मांसापासून कोरोना पसरला अथवा येथील लॅबमध्ये व्हायरस तयार करून पसरवला गेला. मात्र, याला जबाबदार चीनच आहे, असे म्हटले जाते. मात्र, चीनने कधीही याची जबाबदारी घेतलेली नाही. पण म्हणतातना, की देव सर्व पाहत असतो! चीनच्या कृत्याने त्रस्त होऊन भलेही जगातील इतर देशांना काही करता आले नसेल, पण या देशाला त्याच्या वाईट कृत्यांची शिक्षा देव देत आहे, असे म्हटले जात आहे. (After 1 thousand years the flood caused havoc in China people said its punishment)

म्हटले जाते, की चीनमध्ये गेल्या एक हजार वर्षांनंतर एवढा प्रचंड पाऊस होत आहे (Heavy Rain In China). एवढ्या वर्षांत, असा पाऊस चीनवर कधीही कोसळला नव्हता. या पावसामुळे चीनमधील बरेच भाग पाण्याखाली गेले आहेत. देशात पुरजन्य स्थिती निर्माण झाली आहे. ब्लूमबर्ग न्यूज एजन्सीच्या हवाल्याने माहिती मिळाली आहे, की आतापर्यंत या पावसामुळे तेथे 16 जणांचा मृत्यू झाला आहे. खालच्या भागांत पुराचे पाणी भरले आहे. तसेच अनेक ठिकाणी गळ्यापर्यंत पाणी आले आहे.

रेल्वेंमध्ये पाणी -आज चीनमध्ये पुराची जी स्थिती निर्माण झाली आहे. तशी स्थिती गेल्या एक हजार वर्षांत कधीही पाहिली गेली नाही. चीनमधून समोर आलेल्या काही फोटोंमध्ये तेथील पॅसेंजर ट्रेन्समध्ये गळ्यापर्यंत पाणी भरल्याचे दिसते. अनेक जण पावसात अडकले आहेत. या लोकांना काढण्यासाठी सैन्याला बोलावण्यात आले आहे. रस्त्यांवरही गाड्या पाण्यात बुडाल्या आहेत. याचे फोटोही व्हायरल होत आहेत.

सरकारची चिंता वाढली - येते शनिवारपासूनच सातत्याने पाऊस होत आहे. आतापर्यंत चीनच्या झेंगझोऊमध्ये विक्रमी 617 मिमी पावसाची नोंद झाली आहे. हा आकडा तीन दिवसांचा आहे. तर येथे वर्षभरात 640 मिली मीटर पावसाची नोंद होते. पावसाची स्थिती पाहता येथे अनेक ठिकाणी रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. 

चीनमधील पावसाच्या थैमानाचे फोटो सोशल मिडियावरही व्हायरल होत आहेत. यावर अनेक लोकांनी चिंता व्यक्त केली आहे. तर काहींनी ही चीनच्या दुष्कृत्यांची शिक्षा असल्याचे म्हटले आहे. तसेच अनेकांनी म्हटले आहे, की जगाचा विनाश करून चीन शांततेत होता. ही चीनवर पडलेली देवाची काठी आहे.

टॅग्स :chinaचीनfloodपूरRainपाऊस