तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अफगाणिस्तानचे 18 सैनिक ठार
By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2018 14:10 IST2018-02-24T14:10:45+5:302018-02-24T14:10:45+5:30
फाराह प्रांतातील अफगाणिस्तानच्या लष्करी तळावर शुक्रवारी रात्री उशिरा तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला.

तालिबानी दहशतवाद्यांच्या हल्ल्यात अफगाणिस्तानचे 18 सैनिक ठार
काबूल - फाराह प्रांतातील अफगाणिस्तानच्या लष्करी तळावर शुक्रवारी रात्री उशिरा तालिबानी दहशतवाद्यांनी हल्ला केला. या हल्ल्यात 18 सैनिक ठार झाल्याची माहिती अफगाणिस्तानच्या लष्करी अधिकाऱ्यांनी दिली.
फाराहच्या बाला बुलुक जिल्ह्यातील लष्करी तळावर दहशतवाद्यांच्या मोठया गटाने हल्ला चढवला. 18 सैनिक या हल्ल्यात ठार झाले असून दोन सैनिक जखमी झाले आहेत. आम्ही त्याभागात आणखी सैन्य पाठवले आहे अशी माहिती संरक्षण दलाचे प्रवक्ते दौलत वझीर यांनी दिली. तालिबानने या हल्ल्याची जबाबदारी स्वीकारली आहे.