शहरं
Join us  
Trending Stories
1
"विरोधकांची मोगलाई संपली, आता भगवे राज्य येणार; ३ डिसेंबरला दिवाळीपेक्षा मोठे फटाके फुटणार"
2
राहुल गांधींनी बांगलादेशात अन् असदुद्दीन ओवेसींनी पाकिस्तानात निघून जाव! हिमंता बिस्वा सरमा असं का म्हणाले?
3
राहुल गांधी यांनी उल्लेख केलेली 'ती' ब्राझिलियन मॉडेल कोण? मतदार यादीत छापला गेला फोटो; तुम्हीही डोक्याला हात लावाल!
4
मतदानापूर्वीच प्रशांत किशोर यांना मोठा झटका, जन सूराजचे उमेदवार भाजपमध्ये!
5
'हे लोक चुकून आले तर बिहारमध्ये दहशत माजवतील', चिराग पासवान यांचा निशाणा कुणावर?
6
देशभरात एअर इंडियाचा सर्व्हर डाउन, दिल्ली विमानतळावर प्रवाशांच्या लांबच लांब रांगा; मॅन्युअली पद्धतीने चेक-इन
7
दुबई-अबुधाबी फिरण्याचा विचार करताय? आयआरसीटीसीने आणलंय धमाल पैसा वसूल पॅकेज!
8
India’s Squad vs SA Test : पंत इज बॅक! दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटीसाठी कुणाला मिळाली संधी?
9
ISI नं का घडवला मुंबईवर हल्ला?; पाकिस्तानी राष्ट्रपती जरदारीच्या प्रवक्त्याचा मोठा दावा
10
IND A vs SA A : रोहित-विराट दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या 'या' वनडे मालिकेपासून दूरच
11
"...तोपर्यंत सरकार तुमच्यासमोर गुडघ्यावर येणार नाही"; कर्जमाफी घेण्यासाठी उद्धव ठाकरेंचा शेतकऱ्यांना सल्ला
12
मारुतीने आज जो इतिहास घडवला, टाटालाही झेपणार नाही; ४२ वर्षांत ३ कोटी कार विकल्या...
13
फक्त २९ पैशांचा शेअर थेट १०० रुपयांवर! १ लाखाच्या गुंतवणुकीतून झाला '३.४४ कोटींचा' नफा
14
UP: बेकायदेशीर औषधाविरुद्ध योगी सरकारची कडक कारवाई; ४ दिवसांत १६ गुन्हे दाखल, २५ दुकानांवर बंदी!
15
जगातील अवघ्या ३ लोकांकडे आहे 'ही' कार! डिझाईन पाहून प्रेमात पडाल अन् किंमत ऐकून हैराण व्हाल!
16
१७ वर्षे एकाच कंपनीत काम केले, अचानक काढून टाकले, कर्मचाऱ्याने लाखमोलाचा दिला सल्ला, पोस्ट व्हायरल
17
मोदी सरकारचा मोठा निर्णय; ऑपरेशन सिंदूरनंतर पहिल्यांदाच पाकिस्तानात गेले 2100 भारतीय, कारण काय?
18
भाजी विक्रेत्याने जिंकली तब्बल ११ कोटींची लॉटरी; टॅक्स भरून हातात किती पैसे येणार?
19
चेज मास्टर विराट कोहलीचे व्यवसायिक साम्राज्य माहितीये का? क्रिकेटपेक्षा इथून करतो सर्वाधिक कमाई
20
गुगल क्रोम वापरणाऱ्यांना मोठा धोका; हॅकर्सचं लक्ष तुमच्यावरच! सुरक्षित राहण्यासाठी 'ही' गोष्ट आताच करा

तालिबानच्या राज्यात जीव धोक्यात घालून महिलांचं आंदोलन; केली मोठी मागणी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 2, 2021 20:08 IST

"आमची आंदोलनं अशीच सुरू राहतील. तालिबानची इच्छा आहे, की आम्ही शांतपणे घरातच बसून रहावं, पण..."

काबूल - अफगाणिस्तानाततालिबानचे राज्य आले आहे. यामुळे सर्वात मोठे संकट महिलांच्या अधिकारांवर आले आहे. अशा स्थितीत आणि नव्या सरकारच्या स्थापनेपूर्वीच, हेरात येथे मोठ्या प्रमाणावर महिला आपला जीव धोक्यात घालून रस्त्यावर उतरल्या होत्या. त्यांनी राज्यपाल कार्यालयासमोर निदर्शन करत सरकारमध्ये महिलांचाही पुरेसा राजकीय सहभाग असावा आणि महिलांना मंत्रिमंडळ आणि ज्येष्ठ समित्यांमध्ये स्थान मिळावे, अशी मागणी केली आहे.  (Afghanistan women demonstrated in herat and raised demand for its participation in the new government)

रॅलीचे आयोजन करणाऱ्या फ्रिबा काबरजानी यांनी सांगितले, की अफगाण महिलांनी गेल्या वीस वर्षांत जे काही मिळविले आहे, त्यासाठी त्यांनी प्रचंड त्याग केला आहे. या विस वर्षांच्या काळात महिलांनी अनेक क्षेत्रांत प्रगती केली आहे. अशा स्थितीत तालिबानने महिला अधिकारांच्या सुरक्षिततेची हमी देऊन सत्तेतही वाटा द्यायला हवा. संपूर्ण जगाने आमचा आवाज ऐकावा आणि आमचे अधिकारांचे संरक्षणम करावे, अशी आमची इच्छा आहे.

तालिबान उद्या नमाजनंतर करणार सरकारची घोषणा; जाणून घ्या, कोण होणार सुप्रीम लिडर...?

आंदोलक महिला म्हणाल्या, की अफगाणिस्तानच्या सर्व महिलांच्या वतीने आम्ही आमचे म्हणणे तालिबानपर्यंत पोहोचवत आहोत. अनेक महिलांना या मोर्चात सहभागी व्हायचे होते. पण त्यांच्या कुटुंबीयांनी यासाठी परवानगी दिली नाही. तथापि, सुरक्षिततेची पर्वा न करता या मोर्चात सहभागी होण्याचीही या महिलांची इच्छा होती.

आणखी एक आंदोलक महिला मरियम अब्राम म्हणाली, तालिबानने सत्ता ताब्यात घेतल्यानंतर, त्यांचे नेते टीव्हीवरून चांगली भाषणे देत आहेत. मात्र, त्यांचे लोक सार्वजनिक ठिकाणी सत्तेचा गैरवापर करत आहेत. आम्ही त्यांना पुन्हा महिलांना मारहाण करताना पाहिले आहे. एवढेच नाही, तर आमची आंदोलने अशीच सुरू राहील. तालिबानची इच्छा आहे, की आम्ही शांतपणे घरातच बसावे, पण तसे होणार नाही, असेही मरियमने म्हटले आहे. 

टॅग्स :TalibanतालिबानWomenमहिलाAfghanistanअफगाणिस्तानterroristदहशतवादी