अफगाणिस्तानात महिलेला दगडांनी ठेचून ठार मारले

By Admin | Updated: November 4, 2015 02:01 IST2015-11-04T02:01:20+5:302015-11-04T02:01:20+5:30

आपल्या प्रियकरासोबत पळून जाणाऱ्या अफगाण महिलेला (वय १९ ते २१ दरम्यान) लोकांनी दगड मारून-मारून ठार मारले. तिचा निकाह तिच्या इच्छेविरुद्ध करण्यात आला होता; परंतु ती दुसऱ्याच

In Afghanistan, the woman stoned the stones | अफगाणिस्तानात महिलेला दगडांनी ठेचून ठार मारले

अफगाणिस्तानात महिलेला दगडांनी ठेचून ठार मारले

काबूल : आपल्या प्रियकरासोबत पळून जाणाऱ्या अफगाण महिलेला (वय १९ ते २१ दरम्यान) लोकांनी दगड मारून-मारून ठार मारले. तिचा निकाह तिच्या इच्छेविरुद्ध करण्यात आला होता; परंतु ती दुसऱ्याच व्यक्तिसोबत पळून गेली होती. या भयानक घटनेचा रेकॉर्डेड व्हिडिओ सगळीकडे फिरतो आहे.
स्थानिक अधिकाऱ्यांनी मंगळवारी सांगितले की, व्हिडिओमध्ये जमिनीत खड्डा करून रुखसाना नावाच्या या महिलेला गळ्यापर्यंत पुरण्यात येऊन तिला दगड मारले जात असल्याचे व लोक अत्यंत वाईट भाषा वापरून तिला दगड मारत आहेत, असे दिसते. ही हत्या आठवडाभरापूर्वी फिरोजकोहची राजधानी घोर येथून ४० किलोमीटरवरील घालमीन भागात घडली, असे गव्हर्नर सीमा जोवेन्दा यांनी सांगितले. रुखसानाला तालिबान आणि स्थानिक धार्मिक नेते आणि हत्यारी कबिलार्इंनी दगड मारून ठार मारले, असे त्या म्हणाल्या. दगड मारले जात असताना रुखसाना कलमा पढताना व शेवटच्या ३० सेकंदांत तिचा आवाज खूप वेगात ऐकायला येतो.

Web Title: In Afghanistan, the woman stoned the stones