शहरं
Join us  
Trending Stories
1
देशभरातील घरे होणार स्वस्त; ग्राहकांना थेट लाभ देण्याची क्रेडाईची मोठी घोषणा
2
नेपाळची संसद भंग, निवडणुकीच्या तारखांची घोषणा; शुक्रवारी रात्री शेजारील देशात काय काय घडलं?
3
पोस्टाची जबरदस्त स्कीम; महिन्याला करा 'इतकी' गुंतवणूक देईल ₹४० लाखांचा रिटर्न, जाणून घ्या संपूर्ण गणित
4
आजचे राशीभविष्य- १३ सप्टेंबर २०२५: आर्थिक लाभाचा दिवस, पण वाणीवर संयम ठेवा
5
मराठा समाजाला अगोदर मिळालेले आरक्षण नकोय का? रद्द करायचे का?; ओबीसी नेते छगन भुजबळांचा सवाल
6
महाराष्ट्राविना देशाचा गाडा न चाले! देशात सर्वाधिक रोजगार, कंपन्या अन् पेन्शनधारक राज्यात
7
स्पाईसजेट विमानाचे चाक टेकऑफ घेताना निखळले; एकाच चाकावर मुंबईत लँडिंग, मोठी दुर्घटना टळली 
8
'महादेवी'चा निर्णय उच्चस्तरीय समितीने घ्यावा, सर्वोच्च न्यायालय; हत्तीण मठाकडे पाठविण्यास ‘पेटा’चा विरोध
9
विशेष लेख: ‘जेन झी’च्या डोक्यात ही खदखद कुणी भरली आहे? 
10
पतीचे भाकीत ठरले खरे ; डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्यावरून ठेवले नाव
11
जेन झीने महिलेच्या हाती सोपविली नेपाळची धुरा, एकमताने सुशीला कार्की नव्या पंतप्रधान
12
अग्रलेख: मान्सून तिबेटात, धस्स भारतात! मानवी उपद्व्यापच कारणीभूत
13
कुर्डूतील मुरुम उत्खनन बेकायदेशीरच आहे; पालकमंत्री जयकुमार गोरेंचा खुलासा
14
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपुरला भेट देणार; पाच राज्यांचा दौरा 
15
चॅटजीपीटीनं त्याला पाठवलं मृत्यूच्या दारात; घशातील त्रास, AI ने काय दिला सल्ला?
16
‘भारत मोठा झाल्याची भीती वाटते म्हणून टॅरिफ लावला’; सरसंघचालक मोहन भागवतांचे मोठे विधान
17
लेख: वीस हजार बेवारस चपलांना नव्या झिंगाट नशेचं व्यसन !
18
केवळ शब्दांनी नव्हे, तर आपल्या मुलांना महात्मा गांधीजींप्रमाणे वर्तनातून शिकवा -मोरारीबापू
19
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
20
'हे फक्त ट्रेलर...'; दिशा पाटनीच्या घराबाहेर फायरिंग! गोल्डी बरार अन् रोहित गोदारानं घेतली जबाबदारी, सांगितलं कारण? 

अफगाणिस्तान प्रकरणी UNSC मध्ये आपात्कालिन बैठक; महासचिव गुटेरेस म्हणाले, "आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र यावं"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 22:33 IST

Afghanistan Taliban Crisis : अफगाणिस्तानमधील तालिबानच्या ताब्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीबद्दल UNSC मध्ये सोमवारी पार पडली आपात्कालिन बैठक.

ठळक मुद्देअफगाणिस्तानमधील तालिबानच्या ताब्यानंतर निर्माण झालेल्या स्थितीबद्दल UNSC मध्ये सोमवारी पार पडली आपात्कालिन बैठक.

अफगाणिस्तानवरतालिबाननं मिळवलेल्या ताब्यानंतर निर्माण झालेल्या परिस्थितीवरून संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेनं (UNSC) सोमवारी आपात्कालिन बैठक बोलावली होती. यामध्ये संयुक्त राष्ट्राचे महासचिव अँटनियो गुटेरेस यांनी आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र येण्याचं आवाहन केलं. अफगाणिस्तानला पुन्हा कधी दहशतवादी संघटनांसाठी पएक सुरक्षित स्थान म्हणून वापरता येऊ नये यासाठी आंतरराष्ट्रीय समुदायानं एकत्र यावं, असं गुटेरेस म्हणाले होते. 

"अफगाणिस्तानमध्ये जागतिक दहशतवादी धोक्याच्या विरोधात युएनएससी आणि आंतरराष्ट्रीय समुदायाला एकत्र येऊन काम करण्याचं मी आवाहन करतो. आम्हाला संपूर्ण देशातून मानवाधिकारावर निर्बंधांची आश्चर्यचकीत करणारे अहवाल मिळत आहेत. मी विशेषत: अफगाणिस्तानमधील महिला आणि मुलींच्या विरोधात वाढत असलेल्या मानवाधिकाऱ्यांच्या उल्लंघनाबाबत चिंतीत आहे, ज्यांना पुन्हा जुने काळे दिवस परत येण्याची भीती वाटत आहे," असं गुटेरेस म्हणाले. 

"अफगाणिस्तानमध्ये मानवाधिकारांच्या संरक्षणासाठी एकत्र आवाज उठवला पाहिजे. मी तालिबान आणि सर्व पक्षांकडे आंतरराष्ट्रीय कायदे आणि सर्व व्यक्तींच्या अधिकार आणि स्वातंत्र्याचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांचं रक्षण करण्याचं आवाहन करतोय," असंही त्यांनी नमूद केलं.तालिबाननं संयम बाळगावालोकांच्या आय़ुष्याच्या सुरक्षेसाठी अधिक संयम राखावा आणि लोकांच्या गरजा पूर्ण केल्या जाव्या हे याची काळजी घ्यावी असं तालिबानला सांगत असल्याचंही गुटेरस म्हणाले. संघर्षामुळे हजारो लोकांना आपलं घर सोडावं लागलं आहे. सर्व देशांनी आपल्याकडे येणाऱ्या निर्वासितांना आश्रय द्यावा अशी विनंतीही मी करत आहे. असं त्यांनी सांगितलं. 

काबुलवरही प्रतिक्रियागुटेरस यांनी अफगाणिस्तानची राजधानी काबुलच्या सध्याच्या परिस्थितीवरही प्रतिक्रिया दिली. "काबुलमध्ये देशातील अनेक प्रातांमधून लोक आले आहेत. सर्वांच्या रक्षासाठी असलेल्या कर्तव्यांची मी आठवण करून देत आहे," असंही गुटेरेस यांनी नमूद केलं. "आज मी अफगाणिस्तानच्या लाखो लोकांच्यावतीनं बोलत आहे. मी त्या लाखो अफगाण मुली आणि महिलांच्या बाजूनं बोलत आहे, ज्या शाळेत जाण्याची, आर्थिक आणि सामाजिक जीवनात भाग घेण्याचं स्वातंत्र्य गमावणार आहेत," असं अफगाणिस्तानच्या प्रतिनिधीनं सांगितलं.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानunited nationsसंयुक्त राष्ट्र संघSchoolशाळाEconomyअर्थव्यवस्था