शहरं
Join us  
Trending Stories
1
वऱ्हाडाचा टेम्पो उलटला, एक ठार, २५ जखमी; अहमदपूर तालुक्यातील घटना
2
भारतानं PoK ताब्यात घ्यावा, तेथील जनतेचीच इच्छा; आता केव्हाही आत घुसू शकतो 'हिंदुस्तान', शाहबाज यांचा खेळ फसला!
3
भिवंडीत खासगी बसला अपघात; आठ वर्षांच्या मुलीचा मृत्यू, १० ते १२ जण जखमी
4
सुरक्षेत त्रुटी, गृहमंत्री राजीनामा देणार का? पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेसचे सरकारला 6 प्रश्न...
5
भारताच्या कारवाईनं पाकिस्तान घाबरला; मित्र देशांकडे मदत मागायला गेला, मिळाला मोठा झटका!
6
पत्नीला प्रियकरासोबत नको त्या अवस्थेत बघितलं, पतीनं १० दिवसांनंतर टोकाचं पाऊल उचललं; मग मेहुणीला केला फोन अन्... 
7
"काश्मीर सुरक्षित नाही हे पहलगाम हल्ल्यानंतर समोर आलं"; जयंत पाटलांचा केंद्र सरकारवर निशाणा
8
२०८० पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री राहिले तरीही आम्हाला अडचण नाही- रामदास कदम
9
अखेर निर्णय झाला! सिंधू पाणी करार स्थगित, पाकिस्तानला एक थेंबही पाणी मिळणार नाही...
10
CSK च्या बालेकिल्ल्यात १७ वर्षांनी 'सूर्योदय'! SRH नं 'करो वा मरो' प्रवासातील पहिली लढाई जिंकली
11
'हिंसाचार पसरवण्यासाठी वारंवार धर्माचा वापर…'; पहलगाम हल्ल्यानं व्यथित बंगाली शिक्षकानं इस्लाम सोडला
12
वैष्णवीदेवीचे तिकीट न मिळाल्याने काही तास अधीच पहलगाम साेडले, पुण्यात पोहोचल्यावर हल्ल्याचे वृत्त धडकले...!
13
“२०३४ पर्यंत देवेंद्र फडणवीसच मुख्यमंत्री असतील”; चंद्रशेखर बावनकुळे यांचे मोठे भाकित
14
पहलगाम हल्ला: २३२ प्रवाशांना घेऊन तिसरे विमान महाराष्ट्रात! आतापर्यंत ८०० प्रवासी सुखरूप परत
15
पहलगाम हल्ल्याचा राग काढला; लातूरची लेक ज्योती पवारने पाकिस्तानचा धुव्वा उडवला..!!
16
अमरावती: १५ वर्षीय मुलीची किडनी 'फेल', वडिलांनी लेकीसाठी केली किडनी दान; शस्त्रक्रिया यशस्वी!
17
देश दु:खात असताना सत्कार करून घ्यायला भाजप नेत्यांना लाज कशी वाटत नाही?- अतुल लोंढे
18
मासेमारीला कृषीचा दर्जा देण्याचा फार काही फायदा नाही, योजना फसवीच- काँग्रेसची टीका
19
पहलगाम हल्ला: अमेरिकेचा मोठा निर्णय, गुप्तचर यंत्रणेने दिली गॅरंटी; भारताला खंबीर समर्थन
20
पहलगाम हल्ल्यातील संशयित खेचरवाला ताब्यात; याने विचारलेला धर्म, महिला पर्यटकाचा दावा

Afghanistan Taliban Crisis: अमेरिकेनं आम्हाला धोका दिला; व्हाईट हाऊस बाहेर अफगाणी लोकांची निदर्शनं

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 15:36 IST

रविवारी तालिबाननं मिळवला होता अफगाणिस्तानवर कब्जा. अनेकांनी हा अमेरिकेचाही पराभव असल्याची दिली प्रतिक्रिया.

ठळक मुद्देरविवारी तालिबाननं मिळवला होता अफगाणिस्तानवर कब्जा.अनेकांनी हा अमेरिकेचाही पराभव असल्याची दिली प्रतिक्रिया.

तालिबाननंअफगाणिस्तानवर रविवारी कब्जा मिळवला. त्यानंतर अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली होती. तसंच हत्यारं असलेले तालिबानी राष्ट्रध्यक्षांच्या भवनातही वावरत असल्याचं समोर आलं होतं. दरम्यान, तालिबान आणि अफगाणिस्तानच्या चर्चेनं आता जोर पकडला आहे. काही लोकांनी हा अमेरिकेचा पराभव असल्याचंही म्हटलं आहे. याचदरम्यान, सोमवारी काही अफगाणी नागरिकांनी अमेरिकेतील व्हाईट हाऊसच्या बाहेर निदर्शने केली. तसंच त्यांनी बायडेन प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही केली. अफगाणिस्तानमधील परिस्थितीला बायडेन प्रशासन जबाबदार असल्याचा आरोपही नागरिकांनी यावेळी केला. 

दरम्यान, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी अमेरिकेच्या सैन्याला माघारी बोलावणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर तालिबाननंही पुन्हा सक्रिय होण्यास सुरूवात केली होती. अमेरिकन लष्कर जसं मागे परतू लागलं तसं अवघ्या काही कालावधीत तालिबाननं अफगाणिस्तानवर पुन्हा कब्जा केला. रविवारी तालिबाननं अफगाणिस्तानची राजधानी काबुलमध्ये प्रवेश केला. तसंच आपल्याला रक्तपात टाळायचा असल्याची प्रतिक्रिया तालिबाननं दिली. तसंच हे युद्ध संपलं असून अफगाण लोकांना लवकरच हे सरकार कसं असेल हे समजणार असल्याचंही तालिबानच्या प्रवक्त्यानं सांगितलं होतं.  या संपूर्ण घटनेनंतर अमेरिकेतील वॉशिंग्टन येथे राहणाऱ्या अफगाणी लोकांनी व्हाईट हाऊसच्या बाहेर जाऊन निदर्शने केली. तसंच सोमवारी व्हाईट हाऊस बाहेर जमलेल्या नागरिकांनी बायडेन प्रशासनाविरोधात घोषणाबाजीही केली. "जवळपास २० वर्षांनंतर आम्ही पुन्हा एकदा २००० मध्ये असलेल्या स्थितीवर आलो आहोत. त्यांचं म्हणणं आहे की आम्हाला शांतता हवी आहे. जर तालिबाननं सत्ता घेतली तर तर हजारो ओसामा बिन लादेन जन्माला येतील. तालिबानी लोक पाकिस्तानसोबत एकत्र येतील आणि मोठ्या प्रमाणात समस्या निर्माण करतील," अशी प्रतिक्रिया एका व्यक्तीनं दिली. तालिबानी लोकं महिलांवर निशाणा साधत आहेत. प्रत्येक जण त्यांच्या निशाण्यावर आहे, असंही एका व्यक्तीनं सांगितलं. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानAmericaअमेरिकाJoe Bidenज्यो बायडन