शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
4
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
5
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
6
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
7
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
8
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
9
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
10
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
11
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
12
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
13
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
14
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
15
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
16
मेल, एक्स्प्रेस तक्रारी ‘कमी’ दाखवण्यासाठी १३९ हेल्पलाईन ऐवजी व्हॉट्सॲपचा वापर
17
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
18
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
19
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
20
जागतिक संकेतांमुळे शेअर बाजारात घसरण; सेन्सेक्स ३८४ अंकांनी तर निफ्टी ११६ अंकांनी कोसळला
Daily Top 2Weekly Top 5

BIG BREAKING Taliban Kidnapping Indians: काबुल विमानतळावर तालिबानकडून १५० भारतीय नागरिकांचं अपहरण?; तालिबाननं दावा फेटाळला

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 13:01 IST

Taliban Kidnapping Indians: काबुल विमानतळावर मायदेशात परतण्यासाठी वाट पाहत असलेल्या शेकडो भारतीय नागरिकांचं तालिबानकडून अपहरण करण्यात आल्याची माहिती

Taliban Kidnapping Indians: अफगाणिस्तानाततालिबान्यांनी कब्जा केल्यानंतर भारतासाठी मोठी धक्कादायक बातमी समोर आली आहे. काबुल विमानतळावर मायदेशात परतण्यासाठी वाट पाहत असलेल्या शेकडो भारतीय नागरिकांचं तालिबानकडून अपहरण करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. अफागाणिस्तानच्या माध्यमांमध्ये याबाबतचं वृत्त प्रसारित केलं जात असल्याची माहिती एएनआय या वृत्त संस्थेनं दिलं आहे. भारताकडून मात्र याबाबत अद्याप कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. तर तालिबानी नेत्यांनीही या वृत्ताचं खंडन केलं असून भारतीय नागरिकांना सुखरूपरित्या काबुल विमानतळाच्या आत सोडल्याचा दावा केला आहे. Afghanistan Taliban have taken more than 150 people most of them Indians from Kabul airport

अफगाणिस्तानातून मायदेशी परतण्यासाठी अनेक भारतीय नागरिक काबुल विमानतळावर वाट पाहात आहेत. यात आज भारतीय वायूसेनेचं एक विमान काबुल विमानतळावरुन ८५ नागरिकांना घेऊन येण्यासाठी रवाना झालं आहे. पण त्याआधीच काबुल विमानतळावरुन भारतीय नागरिकांना तालिबान्यांनी बाहेर काढल्याचं वृत्त अफगाणिस्तानतील माध्यमांमध्ये असल्याचं एएनआयनं म्हटलं आहे. भारत सरकार याबाबतची माहिती अद्याप घेत असून अपहरण झाल्याची कोणतीही अधिकृत माहिती समोर आलेली नाही. 

दुसरीकडे तालिबानचा प्रवक्ता अहमदुल्ला वसेकनं भारतीय नागरिकांचं वृत्त पूर्णपणे फेटाळून लावलं आहे. अहमदुल्ला वसेकनं तालिबानकडून एक अधिकृत स्टेटमेंट जारी केलं आहे. भारतीय नागरिकांचं काबुल विमानतळावरुन अपहरण झाल्याचं वृत्त पूर्णपणे निराधार आहे. याउलट तालिबानकडून भारतीय नागरिकांना सुरक्षितरित्या विमानतळाच्या आत सोडण्यात आलं आहे, अशी माहिती अहमदुल्ला वसेकनं दिली आहे. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान