शहरं
Join us  
Trending Stories
1
“बारामती पोटनिवडणुकीत पाठिंबा द्या”; सुनेत्रा पवार यांचा उद्धव ठाकरेंना फोन, घडामोडींना वेग
2
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
3
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
4
लखनौमध्ये रेल्वे सिग्नल बॉक्स उडवण्याचा मोठा कट उधळला; ISI च्या ४ संशयितांना अटक
5
हजारो भारतीयांसह ३० हजार जणांना कामावरून काढणाऱ्या कंपनीच्या ऑफिसवर इराणने केला हल्ला 
6
रात्रीस खेळ चाले! झोपेतच घात, सौदी दूतावास बेचिराक; इराणचा प्रहार, अमेरिकेने विचारही केला नाही
7
Mithun Chakraborty : "मी पश्चिम बंगालचा बांगलादेश होऊ देणार नाही, ओवैसी रिअल लीडर"; मिथुन चक्रवर्ती यांचं मोठं विधान
8
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
9
संकष्ट चतुर्थी २०२६: संकष्टीला करा राशीनुसार दिलेले उपाय; 'ही' गणेशसेवा पालटून टाकेल तुमचं आयुष्य!
10
IPL 2026: मराठमोळ्या आयुष म्हात्रेबद्दल अंपायरने केली मोठ्ठी चूक! सारेच हैराण; काय घडलं?
11
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
12
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
13
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
14
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
15
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
16
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
17
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
18
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
19
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
20
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Taliban Crisis : तालिबानचा क्रूर चेहरा उघड! गरिबी आणि बेरोजगारीचं वृत्तांकन केलं म्हणून पत्रकाराला बेदम मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 13:56 IST

Afghanistan Taliban Crisis : तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे.

अफगाणिस्तानची राजधानी काबुलवर तालिबानींनी कब्जा केल्याने जगभरात चिंतेचे वातावरण आहे. राष्ट्राध्यक्ष अश्रफ घनी देशाबाहेर पळून गेले असून, त्यामुळे अफगाण सैनिक आणि पोलिसांनीही आपली शस्त्रे टाकून दिली आहेत. ते तालिबानींना शरण जात आहेत. तालिबानच्या जुलमी राजवटीची दहशत अफगाणी जनतेच्या मनात असल्याने मिळेल त्या मार्गाने देशाबाहेर पडण्यासाठी त्यांची पळापळ सुरू आहे. व्हिसा, पासपोर्ट नसूनही ते  विमानतळाच्या दिशेने पळत आहेत. याच दरम्यान पुन्हा एकदा तालिबानचा क्रूर चेहरा समोर आला आहे. गरिबी आणि बेरोजगारीचं वृत्तांकन केलं म्हणून एका पत्रकाराला बेदम मारहाण केल्याची भयंकर घटना समोर आली आहे. 

अफगाणिस्तानमधील टोलो न्यूजच्या पत्रकाराला बेदम मारहाण करण्यात आली आहे. जिआर खान याद असं मारहाण करण्यात आलेल्या पत्रकाराचं नाव आहे. जिआर हे काबूलमधील बेरोजगारी, गरीबी आणि दारिद्र्य या विषयावर वृत्तांकन करत होते. त्यावेळी तालिबान्यांनी त्यांना पकडलं आणि बेदम मारहाण केली. याआधी टोलो न्यूजच्या पत्रकाराची तालिबानने हत्या केल्याची बातमी कंपनीने दिली. मात्र थोड्याच वेळात या पत्रकाराने ट्विटरवरुन खुलासा करत आपल्याला बेदम मारहाण करण्यात आल्याचं म्हटलं आहे. तसेच आपण जीवंत असल्याचं सांगितलं आहे. ट्विटर अकाऊंटवरून जिआर यांनी नेमकं काय घडलं याबाबत माहिती दिली आहे. 

"काबुलमध्ये रिपोर्टींग करताना तालिबान्यांनी मला बेदम मारहाण केली होती. कॅमेरा, तांत्रिक उपकरणे आणि माझा मोबाईल देखील हायजॅक करण्यात आला आहे. काही लोकांनी माझ्या मृत्यूची बातमी पसरवली मात्र ती खोटी आहे" असं जिआर खान याद यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. तालिबानने आता अफगाणिस्तानमध्ये आपले नवीन सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने पाऊलं उचलली जात आहेत. तालिबान नेत्यांकडून देशाच्या धोरणांबाबत निर्णय घेतले जात आहेत. याच दरम्यान तालिबानने अफगाणिस्तानच्या मध्यवर्ती बँकेच्या नव्या कार्यकारी गर्व्हनरच्या नावाची घोषणा केली आहे. 

ना उच्च शिक्षण, ना कोणतंही ट्रेनिंग; तरीही तालिबानने 'या' व्यक्तीला केलं अफगाण बँकेचं हेड

तालिबानने हाजी मोहम्मद इदरीस (Haji Mohammad Idris ) याला बँकेच्या गर्व्हरनरपदी नियुक्त केले आहे. हाजी मोहम्मद इदरीस याच्याकडे ना उच्च शिक्षण, ना कोणतंही ट्रेनिंग तरीही तालिबानने त्याला अफगाण बँकेचं हेड केलं आहे. इदरीस हा तालिबानी नेता मुल्ला अख्तर मन्सूरच्या आर्थिक बाबी सांभाळत होता. मुल्ला अख्तर मन्सूर हा 2016 मध्ये झालेल्या एअरस्ट्राईकमध्ये मारला गेला होता. इदरीसने कोणतेही उच्च शिक्षण घेतलेले नाही. त्याशिवाय तो आर्थिक विषयातील जाणकार, तज्ज्ञदेखील नाही. मात्र, तो तालिबानचा आर्थिक व्यवहार मागील काही काळापासून सांभाळत आहे. त्यामुळे त्याच्यावर विश्वास ठेवत त्याला ही जबाबदारी देण्यात आली आहे.

 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तानreporterवार्ताहर