शहरं
Join us  
Trending Stories
1
अबब! मंदिराला मिळालेलं दान पाहून डोळे दीपतील; २८ कोटींची रोकड, सोने-चांदीचीही कमी नाही
2
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
3
LIC च्या 'या' स्कीममध्ये केवळ ४ वर्षांपर्यंत भरा प्रीमिअम; १ कोटींच्या सम अश्योर्डची गॅरेंटी, सोबत मिळतील अनेक बेनिफिट्स
4
पत्नीला संपवलं अन् हॉस्पिटलमध्ये जाऊन म्हणाला साप चावला; दिव्यांग मुलींनी केली पित्याची पोलखोल 
5
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
6
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
7
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
8
"हा पुरस्कार मी...", राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्यानंतर शाहरुख खानची पोस्ट, पण फ्रॅक्चर हात पाहून चाहते चिंतेत
9
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
10
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
11
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
12
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
13
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
14
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
15
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
16
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
17
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
18
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
19
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
20
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक

Afghanistan Taliban Crisis:”मला अश्रू पुसावे लागतील, आमची कुणालाही पर्वा नाही”: धाय मोकळून रडतेय अफगाणिस्तानची मुलगी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 16, 2021 15:40 IST

रविवारी अफगाणिस्तानावर तालिबानने कब्जा मिळवला आहे. प्रत्येक ठिकाणी दहशतीचं वातावरण आहे.

ठळक मुद्देआमचं असणं कुणासाठीही फरक पडत नाही कारण आम्ही अफगाणिस्तानात जन्मलो.अफगाणिस्तान नियंत्रणाच्या बाहेर गेले आहे. येथील संघर्षात महिला आणि लहान मुलांवर परिणाम होत आहे.अफगाणी मुलींनी आणि महिलांनी प्रचंड मेहनती जिंकलेले अधिकार त्यांच्याकडून हिसकावून घेतले जात आहे हे चित्र भयानक आणि ह्दयद्रावक

अफगाणिस्तानची अवस्था खूप बिकट होत चालली आहे. अफगाणची सत्ता तालिबानच्या हाती गेली आहे. त्यानंतर सगळीकडे दहशतीचं वातावरण पसरलं आहे. लोकं आपला जीव वाचवण्यासाठी देश सोडून पळत आहेत. या पळापळीत आणि दहशतीच्या वातावरणात अफगाणिस्तानच्या एका मुलीने रडत रडत एक व्हिडीओ बनवला आहे. जो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या व्हिडीओत अफगाणिस्तानी मुलीनं देशाच्या होणाऱ्या अवस्थेकडे जगाने घेतलेल्या भूमिकेवर प्रश्न निर्माण केले आहेत.

रविवारी अफगाणिस्तानावर तालिबानने कब्जा मिळवला आहे. प्रत्येक ठिकाणी दहशतीचं वातावरण आहे. यावेळी इंटरनेटवर अफगानी मुलीचा व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओत ती मुलगी धाय मोकळून रडत आहे. कदाचित तिनं विचारलेल्या प्रश्नांची उत्तरं कुणाकडेच नसतील. हा व्हिडीओ खूप व्हायरल होत आहे. आतापर्यंत १६ लाखांहून अधिक जणांना हा व्हिडीओ पाहिला आहे. हा व्हिडीओ मानवाधिकार कार्यकर्ता मसीह अली नेजाद यांनी ट्विटरवर पोस्ट केला आहे.

४५ सेकंदाच्या या व्हिडीओ क्लिपमध्ये रडत असलेली मुलगी म्हणते की, आमचं असणं कुणासाठीही फरक पडत नाही कारण आम्ही अफगाणिस्तानात जन्मलो. मला अश्रू पुसावे लागतील. कुणालाही आमची पर्वा नाही. इतिहासात आम्ही हळूहळू नष्ट होणार आहोत असं तिनं म्हटलं आहे. मिररच्या वेबसाईटनुसार, ज्या दिवशी व्हिडीओ पोस्ट केला तेव्हा संयुक्त राष्ट्राचे महासचिव एंटोनियो गुटेरेस यांनी एका निवेदनात म्हटलंय की, अफगाणिस्तान नियंत्रणाच्या बाहेर गेले आहे. येथील संघर्षात महिला आणि लहान मुलांवर परिणाम होत आहे.

गुटेरेस पुढे म्हणाले की, सुरुवातीच्या संकेतानुसार तालिबान त्यांच्या नियंत्रणात असलेल्या क्षेत्रात मानवाधिकारांवर गंभीर हल्ला करत आहे. विशेषत: महिला आणि पत्रकारांना टार्गेट केले जात आहे. अफगाणी मुलींनी आणि महिलांनी प्रचंड मेहनती जिंकलेले अधिकार त्यांच्याकडून हिसकावून घेतले जात आहे हे चित्र भयानक आणि ह्दयद्रावक आहे. अफगाणिस्तानात महिलांना अधिकार मिळावा यासाठी जागतिक प्रयत्न झाले. २००१ नंतर तालिबान सत्तेतून बाहेर पडल्यानंतर महिलांना पुन्हा कामावर परतण्याची परवानगी देण्यात आली होती. आतापर्यंत तालिबानने अफगाणिस्तानमध्ये ३४ प्रांतीय राजधानीतील १८ वर कब्जा मिळवला आहे. देशात दोन तृतीयांश नियंत्रण मिळवलं आहे. त्यामुळे अफगाणिस्तानातील महिलांच्या जगण्यावर पुन्हा दहशतीचं सावट आले आहे. तालिबान सत्तेत परतणं हे संयुक्त राष्ट्र अमेरिकेद्वारा अफगाणिस्तान सरकार आणि त्यांच्या सुरक्षा दलांच्या निर्माणासाठी शेकडो अरबो डॉलर खर्च करण्यानंतर आलं आहे.

मागील २० वर्षापासून तालिबानचा अफगाणिस्तानशी संघर्ष

२००१ पासून तालिबान अमेरिका पुरस्कृत अफगाणिस्तानशी लढाई करतोय. अफगाणिस्तानात तालिबानचा उदयही अमेरिकेच्या प्रभावामुळे झाला. आता तालिबान अमेरिकेसाठी मोठे डोकेदुखी बनला आहे. १९८० च्या दशकात जेव्हा सोव्हियत संघाने अफगाणिस्तानात फौज उतरवली होती. तेव्हा अमेरिकेने स्थानिक मुजाहिद्दीनला हत्यारं आणि ट्रेनिंग देऊन प्रोत्साहन दिले होते. सोव्हियत संघाने हार पत्करली परंतु अफगाणिस्तानात एका कट्टर दहशतवादी संघटना तालिबानचा उदय झाला.  

सोव्हिएत संघाच्या फौजा अफगाणिस्तानमधून माघारी गेल्यानंतर तालिबानने अफगाणिस्तानच्या कंदहार शहराला आपले पहिले केंद्र बनवले. तालिबानने २० वर्षानंतर पुन्हा एकदा कंदहार शहराचा ताबा घेतला आहे. अफगाणिस्तानमध्ये कधीकाळी सोव्हिएत संघाच्या फौजा होत्या. यांविरोधात लढणाऱ्या कट्टरतावाद्यांचा कंमाडर मुल्ला मोहम्मद उमर यांने पुढे तालिबानची स्थापना केली.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान