शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक!!! २०० किलो बनावट पद्धतीने पिकवलेले आंबे जप्त; श्वसनाच्या आजारांचा होता धोका
2
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अधीर रंजन चौधरी यांच्यावर हल्ला, बंगालमध्ये काँग्रेस-तृणमूलचे कार्यकर्ते भिडले  
3
Gold-Silver Price Fall: खुशखबर! सोनं-चांदी झाली स्वस्त; खरेदी करणाऱ्यांसाठी 'गोल्डन चान्स'
4
दोन लढाऊ विमाने पाडली, २ चॉपर उद्ध्वस्त, पायलट बेपत्ता, २४ तासांत इराणचा अमेरिकेला जबर दणका
5
जर Iran युद्ध ४० दिवस चाललं तर खाद्यपदार्थांवर येऊ शकतं मोठं संकट; कोणी दिला इशारा?
6
IPL 2026: श्रेयस अय्यरने पुन्हा केली तीच चूक! दुसऱ्यांदा 'असं' घडल्याने बंदीची टांगती तलवार
7
Tarot Card: अंकशास्त्र अन् टॅरोची युती: एप्रिलचा दुसरा आठवडा तुमच्या मुलांकासाठी काय घेऊन येतोय? वाचा!
8
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
9
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
10
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
11
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
12
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
13
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
14
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
15
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
16
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
17
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
18
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
19
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
20
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan: तालिबानने गुडघे टेकले! पंजशीरमध्ये घुसणार नाही; अहमद मसूदसोबत शस्त्रसंधीवर चर्चा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 26, 2021 13:28 IST

Taliban and Panjashir ceasefire: पंजशीरने तालिबानसमोर सरेंडर केले असते तर ती एक मोठी घटना असली असती. तालिबानने तसा प्रयत्नही केला. पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबानने दहशतवादी देखील पाठविले. परंतू, एकाच झटक्यात 300 हून अधिक दहशतवाद्यांना पंजशीरच्या लढवय्यांनी मारले. यामुळे तालिबान आता नमला आहे.

अफगाणिस्तानची (Afghanistan) राजधानी काबुल ताब्यात घेऊन राजवट स्थापन करण्याच्या तयारीत तालिबान (Taliban) आहे. परंतू अफगानिस्तानच्या 34 प्रांतापैकी एक असलेला हा पंजशीर (Panjshir) प्रांत ना कधी सोव्हिएत रशियाच्या ताब्यात आला ना आधीच्या तालिबान राजवटीच्या. पंजशीरने तालिबानसमोर सरेंडर केले असते तर ती एक मोठी घटना असली असती. तालिबानने तसा प्रयत्नही केला. पंजशीर ताब्यात घेण्यासाठी तालिबानने दहशतवादी देखील पाठविले. परंतू, एकाच झटक्यात 300 हून अधिक दहशतवाद्यांना पंजशीरच्या लढवय्यांनी मारले. यामुळे तालिबान आता नमला आहे. (Talks between the Taliban and the Northern Alliance have resumed in Panjsheer, Afghanistan.)

Afghanistan: हिम्मत लागते! अफगानिस्तान अजून पडलेले नाही; एक प्रांत अजूनही लढतोय

Afghanistan: पंजशीरमध्ये अफगाण योद्ध्यांनी केलेले स्वागत पाहून तालिबानी हादरले; Video व्हायरल

 तालिबानने पंजशीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न करणार नसल्याचे जाहीर करून टाकले आहे. दोन्ही गटांमध्ये जोरदार लढाई सुरु होती. मात्र, तालिबानने सीझफायर करार करण्याचा निर्णय घेतला आहे. पंजशीरचा नेता अहमद मसूरने तालिबानला लढण्याची इच्छा नाही, परंतू जबरदस्ती केली तर युद्ध करण्याचा इशारा दिला होता. तरीही तालिबानने तिकडे ताकद पाठविली होती. पंजशीर काही ताब्यात येत नाही, हे पाहून तालिबानने अहमदच्या नेतृत्वातील नॉर्दन अलायन्ससोबत चर्चा सुरु केली आहे. तालिबानकडून मौलाना अमीर खान मुक्तई चर्चा करत आहे. तालिबानने या चर्चेला अमन जिरगा असे नाव दिले आहे. ही बैठक परवान जिल्ह्यातील चारिकर भागात होत आहे. 

Vida Samadzai: मिस अफगानी! बिकिनी घालून रँम्प वॉक, बिग बॉसमध्ये रोमान्स; देशात उडवलेली खळबळ

तालिबानने सांगितले की, दोन्ही बाजुंनी शस्त्रसंधीवर सहमती झाली आहे. पंजशीरमध्ये दोन्ही बाजुंनी कोणीही आता गोळीबार करणार नाही, तसेच तणावही उत्पन्न करण्याचा प्रयत्न केला जाणार नाही. महत्वाचे म्हणजे अफगाणिस्तानचे कार्यकारी राष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह देखील या भागात आहेत. त्यांनी म्हटले होते की, तालिबानला युद्ध हवे असेल तर युद्ध लढू. 

Afghanistan: अफगानिस्तान एकेकाळी भारताचा भाग होता; महाराजा चंद्रगुप्त मौर्य यांनी 500 हत्तींच्या मदतीने जिंकलेला

नॉर्दर्न अलायंसने तालिबानसमोर काही अटी ठेवल्या आहेत. त्यावर तालिबानला निर्णय घ्यायचा आहे. दुसरीकडे तालिबान पंजशीरचा प्रश्न लवकरात लवकर सोडविण्याचा दावा करत आहे. 

तालिबान आणि अल कायदाने मिळून 9/11 च्या हल्ल्याच्या दोन दिवस आधीच अहमद मसूद यांचे वडील अहमद शाह मसूद (Ahmad Shah Massoud) यांची हत्या केली होती. अफगानिस्तानचे माजी राष्ट्राध्यक्ष हामिद करजई (Hamid Karzai) यांनी अहमद शाह मसूद यांना राष्ट्राचे नायक असा खिताब दिला होता. त्यांना पंजशीरचा वाघही म्हटले जात होते. मसूद आणि त्यांच्य़ा साथीदारांनीच मिळून तालिबान राज संपविण्यात मोठी भूमिका निभावली होती. अहमद शाह मसूद यांनी सोव्हिएत रशियाला देखील पंजशीरची एक इंचही जागा घेऊ दिली नव्हती. त्यानंतर आलेल्या तालिबानलाही हा प्रांत कब्ज्यात घेता आला नव्हता. त्यांचा मुलगा पंजशीरचा नेता अहमद मसूद (Ahmad Massoud) तालिबानला शरण जाण्यास नकार दिला आहे. 

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान