शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
4
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
5
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
6
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
7
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
8
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
9
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
10
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
11
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
12
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
13
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
14
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
15
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
16
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
17
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
18
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
19
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड; काबुलमध्ये दहशतवादी तळांच्या नावाखाली ४०० जणांचा घेतला बळी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 17, 2026 10:38 IST

अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका रुग्णालयावर पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राईकमधील मृतांची संख्या वाढून ४०० झाल्याचं म्हटलं आहे.

अफगाणिस्तानच्या सरकारी प्रवक्त्यांनी मंगळवारी महत्त्वाची माहिती दिली आहे. अफगाणिस्तानची राजधानी काबुलमधील एका रुग्णालयावर पाकिस्तानने केलेल्या एअर स्ट्राईकमधील मृतांची संख्या वाढून ४०० झाल्याचं म्हटलं आहे.

हमदुल्ला फितरत यांनी सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितलं की, सोमवारी रात्री झालेल्या या हल्ल्यात रुग्णालयाचा मोठा भाग उद्ध्वस्त झाला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत ४०० लोकांचा मृत्यू झाला असून सुमारे २५० जण जखमी झाले आहेत. बचाव पथकं इमारतीला लागलेली आग विझवण्याचं आणि ढिगाऱ्याखालून मृतदेह बाहेर काढण्याचं काम करत आहेत.

पाकिस्तानने अफगाणिस्तानचा हा दावा खोटा ठरवला असून जनमताची दिशाभूल करण्यासाठी असे आरोप केले जात असल्याचं म्हटलं आहे. सोमवारी काबुल आणि नंगरहार प्रांतात केवळ लष्करी तळांनाच टार्गेट केल्याचं पाकिस्तानने स्पष्ट केलं.

अफगाणिस्तानच्या तालिबान सरकारचे उप-प्रवक्ते हमदुल्ला फितरत यांनी दिलेल्या माहितीनुसार, काबुलमधील 'उमर अडिक्शन ट्रीटमेंट हॉस्पिटल'वर स्थानिक वेळेनुसार रात्री ९ च्या सुमारास हा भीषण हल्ला झाला. हे रुग्णालय २,००० बेडचं असून या हल्ल्यात इमारतीचं प्रचंड नुकसान झालं आहे. पाकिस्तानचा खोटारडेपणा उघड झाला आहे. 

अफगाणिस्तानचा क्रिकेटपटू राशिद खान याने आपल्या पोस्टमध्ये लिहिलं की, "काबुलमध्ये पाकिस्तानच्या एअर स्ट्राईकमुळे सामान्य नागरिकांचा बळी गेल्याच्या वृत्ताने मला प्रचंड दुःख झालं आहे. घरं, शैक्षणिक संस्था किंवा वैद्यकीय सुविधांना टार्गेट करणं हा गुन्हा आहे. विशेषतः रमजानच्या पवित्र महिन्यात, अत्यंत घृणास्पद आणि चिंतेचा विषय आहे. यामुळे केवळ द्वेष आणि फूट पडेल."

English
हिंदी सारांश
Web Title : Pakistan's Lie Exposed: Kabul Strike Kills 400 Civilians

Web Summary : Afghanistan alleges Pakistan's airstrike on a Kabul hospital killed 400. Pakistan denies targeting civilians, claiming strikes hit only militant bases. The hospital, treating addiction, was severely damaged. Rashid Khan condemned the attack.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानWarयुद्धhospitalहॉस्पिटलDeathमृत्यू