शहरं
Join us  
Trending Stories
1
'पाकिस्तानचे दोन तुकडे करा, पाकव्याप्त काश्मीर भारतात घ्या', काँग्रेसच्या मुख्यमंत्र्याची PM मोदींकडे मागणी
2
पहलगाम हल्ल्यात हिंदूच टार्गेट! आधी पॅन्ट काढल्या अन् 'खतना' न केलेल्यांचीच हत्या; तपास पथकाकडून मोठा खुलासा
3
Pahalgam Terror Attack: लष्कराची मोठी कारवाई! आणखी दोन दहशतवाद्यांची घरे स्फोटके लावून पाडली
4
पाकिस्तानच्या नापाक कारवाया थांबत नाहीत, २४ तासांत दुसऱ्यांदा नियंत्रण रेषेवर गोळीबार, भारतीय सैन्याने दिले चोख प्रत्युत्तर
5
"विकी कौशलमुळे 'छावा' चालला असं नाही, तर...", महेश मांजरेकर स्पष्टच बोलले
6
"हे काही टीव्ही शोज नाहीयेत...", अभिनेत्री शिवानी सुर्वेनं प्रसारमाध्यमांना फटकारलं
7
EPFO नं केला मोठा बदल, जॉब बदल्यावर PF ट्रान्सफर करणं होणार सोपं; १.२५ कोटी लोकांना फायदा
8
अक्षय शिंदे प्रकरणी आदेश देऊनही पोलिसांविरोधात गुन्हा दाखल न केल्याने हायकोर्टाचा संताप
9
PPF ची 'ही' ट्रिक अनेकांना माहीत नाही, बनेल १ कोटींचा फंड, वर्षाला मिळू शकतं ७ लाखांपेक्षा अधिक व्याज
10
भारताची धास्ती घेत पाक लष्कराची सीमेवर मोठ्या प्रमाणात जमवाजमव; सैनिकांची संख्या वाढवली
11
मोठी बातमी: एल्फिन्स्टन ब्रिज सोमवारपर्यंत बंद होणार नाही; नागरिकांच्या आंदोलनाची थेट मुख्यमंत्र्यांनी घेतली दखल!
12
भारत-पाकमध्ये पाण्यावरून युद्ध होईल? तणाव वाढला; पाकिस्तानात हाहाकार, कारण...
13
भारताकडून पाकिस्तानला पाण्याचा थेंबही मिळणार नाही; केंद्र सरकारनं आखली रणनीती
14
अजित पवार यांचा अधिकाऱ्यांना सज्जड दम; सांगितलेली कामे केली नाहीत, तर पुढच्या बैठकीला..
15
आजचे राशीभविष्य, २६ एप्रिल २०२५: शक्यतो आज आर्थिक देवाण-घेवाण करू नका
16
अखेर पाक म्हणाला, होय, आम्ही दहशतवाद्यांना पोसले; संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांची कबुली
17
एकही पाकिस्तानी भारतात राहणार नाही याची खात्री करा; शाहांचा सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना फोन
18
पाकिस्तानी नागरिकांवर महाराष्ट्रात वॉच; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना आदेश
19
राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने फटकारले; "स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल..."
20
संसदेने मंजूर केलेला कायदा संवैधानिक, स्थगिती देऊ नका; केंद्र सरकारची मागणी

Afghanistan Taliban Crisis: तालिबानच्या हाती लागली गुप्तचर माहिती, अमेरिकेचं टेन्शन वाढलं; पाकिस्तान घेणार फायदा?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 20, 2021 15:38 IST

तालिबाननं काबुलवर कब्जा मिळवत संसद आणि राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले. आता अफगाणिस्तानात अमेरिकेसाठी तालिबानकडून आणखी एक धोका निर्माण झाला आहे.

ठळक मुद्देहँडहेल्ड इंट्रोएजेंसी आयडेंटिटी डिटेक्शन इक्विपमेंट असं या डिवाइसचं नाव आहेलादेनच्या पाकिस्तानी अड्ड्याची ओळख पटवण्यासाठी या बायोमेट्रिक्सचा वापर करण्यात आला होतातालिबानींनी अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर त्याचा फटका अनेक देशांना बसला आहे.

काबुल – अफगाणिस्तानवरतालिबाननं कब्जा मिळवल्यानंतर संपूर्ण जग चिंतेत आहे. चीन, पाकिस्तान, बांगलादेश वगळता अद्यापही इतर देशांनी तालिबानी सत्तेला मान्यता दिली नाही. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ज्यो बायडन यांनी अमेरिकेचे सैन्य परत बोलवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर अवघ्या २ आठवड्यात तालिबानींनी अफगाणिस्तानवर कब्जा मिळवला. अफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ घनी देश सोडून पळून गेले. अफगाणी सैन्यांनी शरणागती पत्करली.

तालिबाननं काबुलवर कब्जा मिळवत संसद आणि राष्ट्रपती भवन ताब्यात घेतले. आता अफगाणिस्तानात अमेरिकेसाठी तालिबानकडून आणखी एक धोका निर्माण झाला आहे. तालिबानला गुप्तपणे अमेरिकन मिलिट्रीची बायोमेट्रीक डिवाइसेस ताब्यात घेतली आहे. या डिवाइसमध्ये अमेरिकन सेना आणि त्या अफगाणी लोकांची माहिती आहे.ज्यांनी युद्धावेळी महत्त्वाची भूमिका निभावली होती. तालिबानच्या हाती कोणकोणती डिवाईस लागली आहे. यावरुन अमेरिका चिंतेत आहे. त्यामुळे तालिबानकडे अमेरिकेचे अनेक रहस्य उलगडू शकतात. या डिवाइसमध्ये अमेरिकन सैनिक आणि अफगाणी लोकांच्या डोळ्यांचे स्कॅनिंग, फिंगर प्रिंट आणि बायोलॉजिकल माहिती आहे. या डेटाचा वापर मोठ्या डेटाबेससाठी केला जाऊ शकतो. परंतु डेटाला धोका आहे की नाही हे स्पष्ट नाही.

हँडहेल्ड इंट्रोएजेंसी आयडेंटिटी डिटेक्शन इक्विपमेंट असं या डिवाइसचं नाव आहे. अफगाणिस्तानात अमेरिका या बायोमेक्ट्रिसचा वापर दहशतवाद्यांवर नजर ठेवण्यासाठी करत होती. अमेरिकन राजदूत आणि आघाडी सरकारसाठी काम करणाऱ्या अफगाणी नागरिकांचा या डेटाबेसमध्ये समावेश आहे. अमेरिकेने २०११ मध्ये ओसामा बिन लादेनच्या ठिकाणावर छापेमारी केली होती. त्यावेळी लादेनच्या पाकिस्तानी अड्ड्याची ओळख पटवण्यासाठी या बायोमेट्रिक्सचा वापर करण्यात आला होता. तालिबानकडे सध्या या डिवाईसमधून डेटाबेस आणि माहिती मिळवू शकेत असं तंत्रज्ञान नाही परंतु तालिबानला समोर ठेऊन पाकिस्तान आणि त्यांची गुप्तचर यंत्रणा ISI यामध्ये तालिबानींची मदत करू शकतील.

अफगाणिस्तानशी तूर्तास आयात-निर्यात व्यवहार बंद

तालिबानींनी अफगाणिस्तानची सत्ता काबीज केल्यानंतर त्याचा फटका अनेक देशांना बसला आहे. त्यात भारताचाही समावेश आहे. पाकिस्तानमार्गे भारतात होणाऱ्या व्यापारावर तालिबानींनी खडा पहारा ठेवला असल्याने व्यापाराची कोंडी झाली असून आयात-निर्यात तूर्तास बंद झाली आहे. अफगाणिस्तानातून मोठ्या प्रमाणावर सुकामेवा भारतात आयात होत असतो. अफगाणमधील परिस्थितीसंदर्भात भारतीय निर्यात महासंघाने (एफआयईओ) चिंता व्यक्त केली आहे. महासंघाचे महासंचालक अजय सहाय म्हणाले की, ‘अफगाणिस्तानच्या सीमारेषा चारही बाजूंनी जमिनीने वेढल्या आहेत. अशा स्थितीत पाकिस्तानमार्गे आयात वा निर्यात करणे अधिक सोयीस्कर ठरत असते. मात्र, अफगाणिस्तानातील सद्य:स्थिती पाहता व्यापारावर त्याचा मोठा परिणाम होणार आहे. अफगाणिस्तानात सध्या सर्वच स्तरांवर अनिश्चितता आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानAmericaअमेरिकाPakistanपाकिस्तान