शहरं
Join us  
Trending Stories
1
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
2
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
3
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
4
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
5
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
6
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
7
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
8
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
9
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
10
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
11
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
12
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
13
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
14
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
15
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
16
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
17
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
18
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
19
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
20
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Crisis: तालिबानी आहेत तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 06:02 IST

Afghanistan Crisis: सत्तेत आल्यानंतर शरियतची अंमलबजावणी, शांतता आणि सुरक्षा पुरवू याची हमी त्या काळात तालिबानी देत होते. मात्र, त्या नावाखाली लुटमार आणि महिलांवर आतोनात अत्याचार सुरू झाले.

नवी दिल्ली : अफगाणिस्तानवर २० वर्षांनी तालिबानने पुन्हा ताबा मिळविला. हे तालिबानी म्हणजे नेमके कोण आणि त्यांचा इतिहास काय, हे अगदी थोडक्यात जाणून घेऊ या...

तालिबानची स्थापना कशी झाली? पश्तू भाषेत तालिबानचा अर्थ विद्यार्थी असा होतो.  सोव्ह‍ियत रशियाचा पाडाव झाल्यानंतर रशियन सैन्याने अफगाणिस्तानातून माघार घेतली. त्यानंतर उत्तर पाकिस्तानात तालिबानचा उदय झाल्याचे बोलले जाते. तालिबान हा अफगाणिस्तानात नागरी युद्ध लढणारा एक लहान गट होता. त्याचे मूळ कंदहार शहरामध्ये होते. मुल्ला मोहम्मद ओमर याने तालिबानची स्थापना केली होती. तो कंदहारमध्ये एका मशिदीत इमाम होता. २०१३  मध्ये त्याला अमेरिकेने ठार मारले. तोपर्यंत त्याच्याकडेच नेतृत्व होते. 

कशावर विश्वास आहे? सत्तेत आल्यानंतर शरियतची अंमलबजावणी, शांतता आणि सुरक्षा पुरवू याची हमी त्या काळात तालिबानी देत होते. मात्र, त्या नावाखाली लुटमार आणि महिलांवर आतोनात अत्याचार सुरू झाले. १९९८ पर्यंत जवळपास ९० टक्के अफगाणिस्तान तालिबानच्या हातात गेला. तालिबानने पुरुषांना दाढी ठेवणे,  महिलांना बुरखासक्ती, टीव्ही, संगीत, सिनेमा, १० वर्षांवरील मुलींच्या शिक्षणाला बंदी, असे बरेच कायदे केले. महिलांवर बुरखा घालण्याची सक्ती केली. मध्य अफगाणिस्तानातील बमियान बुद्धाच्या प्राचीन मूर्ती पाडण्यात आल्याने त्याचा जगभरात निषेध झाला होता. 

तालिबान आणि अल-कायदाचा काय संबंध? तालिबानने अल-कायदा आणि ओसामा बिन लादेन यांना आश्रय दिला. अल-कायदाने अफगाणिस्तानात दहशतवादी तळ उभारले. तेथे तयार झालेल्या दहशतवाद्यांनी जगभरात दहशतवादी हल्ले केले.  

अमेरिकन कनेक्शन काय? अमेरिका आणि रशिया यांच्यात अनेक दशकांपासून शीतयुद्ध सुरू आहे. ९० च्या दशकात अमेरिकेने तालिबानला पाठिंबा दिला. सोव्हियत रशियाविरोधात अमेरिकेने हे छुपे पाऊल उचलले होते. मात्र, यात अमेरिकेचाच पुढे घात झाला आणि त्यातून अफगाणिस्तानात २० वर्षे अमेरिकेने  नागरी युद्ध लढले.

टॅग्स :TalibanतालिबानAfghanistanअफगाणिस्तान