शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात अमेरिकेला २० वर्षांत किती मोठं नुकसान? आकडा पाहून चक्रावून जाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 13:22 IST

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानात २० वर्षांपासून अमेरिका आणि तालिबानमध्ये संघर्ष

नवी दिल्ली: अफगाणिस्तानात २० वर्षांनंतर तालिबानची सत्ता आली आहे. २००१ ते २०२१ या कालावधीत अमेरिकन फौजा अफगाणिस्तानात तैनात होत्या. या कालावधीत अमेरिकन सैन्य आणि तालिबान यांच्यात युद्ध सुरू होतं. या कालावधीत अमेरिकेनं प्रचंड मोठी रक्कम खर्च केली. मात्र अफगाणिस्तानमधील सध्याची परिस्थिती पाहता अमेरिकेनं केलेला खर्च वाया गेल्याचं दिसत आहे. अमेरिकन सरकारनं केलेल्या खर्चामुळे शस्त्रास्त्रांची निर्मिती करणाऱ्या अमेरिकेच्या कंपन्यांचा प्रचंड फायदा झाला. गेल्या २० वर्षांत या कंपन्यांच्या किमती जवळपास १२ पटींनी वधारले.

अमेरिकेनं अफगाणिस्तानात गेल्या २० वर्षांत केलेल्या खर्चाबद्दलचा एक अहवाल ब्राऊन विद्यापीठानं प्रसिद्ध केला आहे. '२००१ पासून अमेरिकेनं अफगाणिस्तानातील युद्धावर एकूण २.२६ ट्रिलियन (२२६० अब्ज) डॉलर खर्च केले. म्हणजेच या युद्दामुळे २० वर्षे अमेरिकेला दररोज ३० कोटी अमेरिकन डॉलरचं नुकसान झालं,' अशी आकडेवारी अहवालात आहे. 'द इंटरसेप्ट'च्या अहवालानुसार, ५ संरक्षण कंपन्यांनी युद्धादरम्यान बक्कळ नफा कमावला. यामध्ये बोईंग पहिल्या क्रमांकावर आहे. त्यानंतर रेथेऑन, लॉकहिड मार्टिन, जीडी, नॉर्थरोप ग्रुमॅनच्या क्रमांक लागतो.'एखाद्या व्यक्तीनं १८ सप्टेंबर २००१ रोजी या कंपन्यांमध्ये १० हजार डॉलरची गुंतवणूक केली असेल, तर आता त्याचं मूल्य जवळपास १ लाख डॉलर असू शकेल. १८ सप्टेंबर २००१ रोजीच अमेरिकेचे तत्कालीन अध्यक्ष जॉर्ज बुश यांनी अफगाणिस्तानात सैन्य कारवाई करण्याच्या कागदपत्रांवर स्वाक्षरी केली होती. त्यानंतर अमेरिकेनं अफगाणिस्तानातील आपल्या सैन्यावर एकूण ८३ अब्ज डॉलर खर्च केले. म्हणजेच दरवर्षी ४ अब्ज डॉलरपेक्षा अधिक रक्कम खर्च झाली,' अशी आकडेवारी इंटरसेप्टच्या अहवालात आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान