शहरं
Join us  
Trending Stories
1
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
2
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
3
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
4
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
5
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
6
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
7
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
8
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
9
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
10
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
11
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
12
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
13
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
14
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
15
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
16
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
17
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
18
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
19
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
20
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Crisis: तालिबानला मोठा दणका! पंजशीरवरील हल्ला महागात पडला; ३५० दहशतवादी ठार, ४० कैदेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2021 13:23 IST

Afghanistan Crisis: तालिबानला पंजशीरमध्ये पुन्हा दणका; नॉर्दर्न अलायन्सच्या योद्धांची कडवी झुंज

काबूल: अफगाणिस्तानवर कब्जा करणाऱ्या तालिबानला अद्याप पंजशीरवर कब्जा करता आलेला नाही. अफगाणिस्तानात शांतता प्रस्थापित करण्याचे दावे करणारा तालिबान पंजशीरवर हल्ले करत आहे. पंजशीर काबीज करण्यासाठी तालिबानकडून हरतऱ्हेचे प्रयत्न सुरू आहेत. पंजशीर प्रांतात घुसखोरीचे प्रयत्न सातत्यानं केले जात आहेत. तालिबाननं काल रात्रीदेखील पंजशीरमध्ये घुसखोरीचे प्रयत्न केले. पंजशीरचं संरक्षण करणाऱ्या नॉर्दर्न अलायन्सनं याबद्दलची माहिती दिली आहे.

काल रात्री हल्ला करणाऱ्या जवळपास ३५० तालिबानी दहशतवाद्यांना कंठस्नान घालून ४० पेक्षा अधिक दहशतवाद्यांना कैद केल्याची माहिती नॉर्दर्न अलायन्सनं दिली आहे. ही कारवाई करताना नॉदर्न अलायन्सच्या हाती अमेरिकन वाहनं आणि हत्यारं लागली आहेत. सोमवारी रात्रीदेखील तालिबानी दहशतवाद्यांनी पंजशीरमध्ये घुसण्याचा प्रयत्न केला. त्यावेळीही नॉर्दर्न अलायन्सनं त्यांना चोख प्रत्युत्तर दिलं. पंजशीरमध्ये युद्धसंग्राम! तालिबाननं पूल उडवला, नॉदर्न अलायन्सच्या सैनिकांना मारल्याचा दावा

स्थानिक पत्रकार नातिक मालिकजादा यांनी दिलेल्या माहितीनुसार, पंजशीरमध्ये प्रवेश करताना लागणाऱ्या गोलबहार प्रांतात तालिबानी दहशतवादी आणि नॉर्दर्न अलायन्सच्या योद्धांमध्ये संघर्ष झाला. या भागातला एक पूलदेखील तालिबान्यांनी उडवला. हा पूल गोलबहार आणि पंजशीरला जोडतो. 

सोमवारी रात्री तालिबानी आणि नॉर्दर्न अलायन्सच्या योद्धांमध्ये चकमक झाली. दोन्ही बाजूंनी गोळीबार झाला. त्यात ७-८ तालिबानी मारले गेले. पंजशीर काबीज करण्यासाठी तालिबानचे प्रयत्न सुरू आहेत. मात्र अहमद मसूद यांच्या नेतृत्त्वाखाली नॉर्दर्न अलायन्स अतिशय धीरोदात्तपणे तालिबानी संकटाचा सामना करत आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबान