शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Crisis: तालिबानचे अफगाणी नागरिकांना नवे फर्मान, “एक आठवड्याच्या आत सरकारी मालमत्ता, वाहन, हत्यारे जमा करा, अन्यथा कठोर कारावाईला सामोरे जा”

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 28, 2021 16:21 IST

Afghanistan Crisis: अफगाणिस्तानच्या सत्तेवक कब्जा केल्यानंतर तालिबाबने हळुहळू आपले क्रूर फर्मान काढण्यास सुरुवात केले आहे.

काबूल -  अफगाणिस्तानच्या सत्तेवक कब्जा केल्यानंतर तालिबाबने हळुहळू आपले क्रूर फर्मान काढण्यास सुरुवात केले आहे. शनिवारी तालिबानींनी अफगाणी नागरिकांना त्यांच्याकडील सरकारी मालमत्ता, वाहने आणि हत्यारे एका आठवड्याच्या आत जमा करण्याचे आदेश दिले आहे. (Afghanistan Crisis)टोलो न्यूजने दिलेल्या वृत्तानुसार तालिबानचे प्रवक्ते जबिहुल्लाह मुजाहिद यांनी एक वक्तव्य प्रसिद्ध करत लोकांना सरकारी मालमत्ता, हत्यारे, दारूगोळा आणि वाहने सोपवण्यास सांगितले आहे. तसेच जे अफगाणी नागरिक सरकारी मालमत्ता, हत्यारे आणि दारू-गोळा तालिबानी दहशतवाद्यांकडो सोपवणार नाहीत, त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. (Taliban issues new order to Afghan citizens, "Seize government property, vehicles, weapons within a week, otherwise face harsh action")

याबाबत तालिबानने सांगितले की, काबुलमध्ये ज्यांच्याजवळ साधनसंपत्ती, हत्यारे, दारूगोळा आणि अन्य सामान आहे, त्यांनी एका आठवड्याच्या आत हे सामान इस्लामिक अमिराती्या संबंधित विभागांना सोपवावे, अशी सूचना देण्यात येत आहे. असे न करणाऱ्यांविरोधात कारवाई केली जाईल. तत्पूर्वी तालिबाबने इमामांना शुक्रवारच्या नमाजच्या दिवशी विशेष उपदेश देण्याचा सल्ला दिला होता. सत्तेने दिलेल्या आदेशांचे पालन करण्याची सूचना त्यांनी करावी, असे या सल्ल्यात म्हटले होते.

दरम्यान, तालिबानच्या कब्जानंतर अफगाणिस्तानमध्ये भीतीचे वातावरण आहे. लोग देश सोडून पळून जाण्याच्या प्रयत्नात आहेत. मात्र तालिबानी त्यांना रोखून ठेवत आहेत. विमानतळावर जाणाऱ्या सर्व रस्त्यांवर तालिबानी दहशतवादी तैनात आहेत. अफगाण नागरिकांना विमानतळावर पोहोचून दिले जात नाही आहे. कुठल्याही अफगाणी नागरिकांना देश सोडू देणार नाही, असे तालिबानने स्पष्ट केले आहे. तालिबानने विमानतळावर जाणारे सारे सत्ये बंद केले आहेत. तसेच केवळ परदेशी नागरिकांनाच विमानतळावर जाण्याची परवानगी दिली जात आहे.  

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानInternationalआंतरराष्ट्रीय