शहरं
Join us  
Trending Stories
1
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
2
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
3
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
4
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
5
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
6
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
7
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
8
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
9
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
10
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
11
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
12
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
13
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
14
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
15
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
16
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
17
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
18
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
19
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
20
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
Daily Top 2Weekly Top 5

Afghanistan Crisis: तालिबानला जबर दणका, तीन जिल्हे दहशतवाद्यांच्या ताब्यातून मुक्त 

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 08:06 IST

Afghanistan Crisis Update: अफगाणिस्तानमधील काही गटांनी त्यांचे भाग तालिबानच्या ताब्यातून हिसकावण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान, तालिबानच्या ताब्यातून तीन जिल्हे मुक्त करण्यात आल्याचा दावा अफगाण न्यूजने केला आहे.

काबुल - अफगाणिस्तानच्या सत्तेवर कब्जा करून एक आठवडा होत नाही तोच तालिबानला आव्हान मिळण्यास सुरुवात झाली आहे. (Afghanistan Crisis) अफगाणिस्तानमधील काही गटांनी त्यांचे भाग तालिबानच्या (Taliban) ताब्यातून हिसकावण्यास सुरुवात केली आहे. यादरम्यान, तालिबानच्या ताब्यातून तीन जिल्हे मुक्त करण्यात आल्याचा दावा अफगाण न्यूजने केला आहे. मात्र तालिबानने यावर काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. ( Three districts liberated from terrorists Taliban in Afghanistan)

अब्दुल हामिद दादगर यांनी तालिबानच्या ताब्यात असलेल्या अंद्राब बघलान प्रांतातली तीन जिल्ह्यांना मुक्त केले आहे, असा दावा अफगाण न्यूजने केला आहे. मात्र तालिबान यावर काहीही बोललेले नाही. दुसरीकडे अफगाणिस्तानमधील पंजशीर भागात तालिबान विरोधात लढण्यासाठी माजी सैनिकांनी आघाडी उघडली आहे. या सर्वांचे नेतृत्व अहमद मसूद करत आहे.  अहमद मसूद हे तालिबानला पराभवाची धूळ चारणारे अहमद शाह मसूद यांचे पुत्र आहेत.

अहमद मसूद यांनी वॉशिंग्टन पोस्टमधील एका लेखाच्या माध्यमातून तालिबानविरोधातील लढाईला अधिकाधिक बळ देण्याचे संकेत दिले आहे. तसेच पंजशीर भागात त्यांच्यासोबत मुजाहिद्दीनचे हजारो योद्धे आहेत. ते तालिबानविरोधात लढण्यासाठी तयार आहेत, असे सांगितले. अमेरिका अफगाणिस्तानमधून निघून गेली असली तरी ते आम्हाला हत्यारे आणि इतर मदत करू शकतात. त्यामाध्यमातून आम्ही तालिबानला मात देऊ शकतो, असेही ते म्हणाले. दरम्यान, अफगाणिस्तानच्या सैन्यातील अनेक आजी-माजी सैनिक पंजशीरमध्ये अहमद शाह मसूदसोबत असल्याचे सांगण्यात येत आहे.

स्वत:ला अफगाणिस्तानचे काळजीवाहू राष्ट्रपती घोषित करणाऱ्या अमरुल्लाह सालेह यांनीही तालिबानविरोधात आघाडी उघडली आहे. तसेच ते तालिबानविरोधात सातत्याने रणनीती आखत आहेत. त्यासाठी माजी सैनिक, पोलीस आणि इतरांसोबत ते चर्चा करत आहे. अमरुल्लाह सालेह सध्या पंजशीर प्रांतात आहेत. त्यामुळे तालिबानला येथून कडवी टक्कर मिळण्याची शक्यता आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानInternationalआंतरराष्ट्रीय