शहरं
Join us  
Trending Stories
1
Video - अग्निकल्लोळ! गुजरातच्या संघवी ऑर्गेनिक्स फॅक्ट्रीमध्ये भीषण आग, धुराचं साम्राज्य
2
टीम इंडियाला धक्का! पाकिस्तानविरूद्धच्या सामन्याआधी शुबमन गिलच्या हाताला दुखापत, अपडेट काय?
3
निष्काळजीपणाचा कळस! सरकारी शाळेत मध्यान्ह भोजन खाल्ल्यानंतर ९० मुलं पडली आजारी
4
अलर्ट मोड ऑन! फेस्टिव्ह सेलच्या स्वस्ताईला भुलू नका; एक चूक अन् गमवाल आयुष्यभराची कमाई
5
शेतकऱ्यांनो, दिवाळीआधी PM किसानचा २१वा हप्ता येणार का? वाचा कधी जमा होणार पैसे?
6
Mumbai: विरार- दादर लोकलच्या दरवाज्यात मनोरूग्णाचा धुडगूस, महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्‍न ऐरणीवर
7
GST कपातीनंतर ५, १०, २० रुपयांच्या बिस्किट, चिप्सची किंमतही घटणार की…?, कंपन्यांनी दिली अशी माहिती  
8
लोकप्रिय 'दामिनी' मालिका पुन्हा येतेय प्रेक्षकांच्या भेटीला, ही अभिनेत्री मुख्य भूमिकेत, या चॅनेलवर होणार प्रसारण
9
चालकाचं नियंत्रण सुटलं अन् कार थेट उड्डाणपुलावरून खाली रेल्वे रुळावर पडली!
10
निम्न तेरणा प्रकल्पातून ७६३६ क्युसेक पाण्याचा विसर्ग, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा
11
'चुल्लूभर पानी में डूब मरो...' भारत-पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून ओवैसी भाजपवर संतापले!
12
नफा वाढूनही फ्लिपकार्टला ५,१८९ कोटी रुपयांचा तोटा! एक निर्णय कंपनीच्या अंगलट?
13
खूशखबर! Instagram ची मोठी घोषणा; आता पटापट वाढेल रीच, पोस्ट करा अनलिमिटेड स्टोरी
14
‘सॉरी... आम्ही हे जग सोडतोय’, CA च्या पत्नीनं मुलासह १३ व्या मजल्यावरून मारली उडी, समोर आलं धक्कादायक कारण
15
पंजाब की शेरनी! चालत्या ऑटोमध्ये चोरांशी लढली, जीव धोक्यात घालून मदत मागितली अन्...
16
Pakistan: पाकिस्तानात दहशतवाद्यांच्या हल्ल्यात १९ सैनिकांचा मृत्यू; ४५ दहशतवाद्यांचा खात्मा
17
सूर्या, पांड्या की आफ्रिदी... IND vs PAK सामन्यात 'हे' १० खेळाडू ठरू शकतात 'गेमचेंजर'
18
'दशावतार' सिनेमासाठी रजनीकांतचा झालेला विचार? दिग्दर्शक म्हणाले- "दिलीप प्रभावळकरांनी नकार दिला असता तर..."
19
युपीआय व्यवहारांच्या नियमांत मोठे बदल; विमा, गुंतवणूक, क्रेडिट कार्ड पेमेंटसाठी मर्यादा वाढली
20
Dashavtar: दिलीप प्रभावळकरांच्या 'दशावतार'ने मनं जिंकली; दुसऱ्या दिवशी कमावले तब्बल 'इतके' कोटी

Afghanistan crisis updates: राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला; अफगाणिस्तानवर तालिबानचा कब्जा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 15, 2021 19:32 IST

Afghanistan Crisis : अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती आली समोर. तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तानची सूत्रं.

ठळक मुद्देअशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती आली समोर.तालिबानच्या ताब्यात अफगाणिस्तानची सूत्रं.

अमेरिकन सैन्याने काढता पाय घेतल्यानंतर जवळपास संपूर्ण देश ताब्यात घेणाऱ्या तालिबाननंअफगाणिस्तानची राजधानी असलेल्या काबुलवरही आक्रमण केलं होतं. दरम्यान, तालिबानचे दहशतवादी काबुलच्या सीमेमध्ये घुसले आहेत. तसेच या दहशतवाद्यांनी सर्व बॉर्डर क्रॉसिंगवर कब्जा केला असल्याचं यापूर्वी एपीने प्रसारित एका अफगाण अधिकाऱ्याच्या हवाल्याने सांगितलं होतं. दरम्यान, आता अफगाणिस्तानचेराष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्याची माहिती समोर आली आहे. टोलो न्यूजनं सूत्रांच्या हवाल्यानं हे वृत्त दिलं आहे. दरम्यान, अशरफ गनी हे तझाकिस्तानला रवाना झाल्याची माहिती सरकारमधील एका मंत्र्यानं रॉयटर्स या वृत्तसंस्थेशी बोलताना दिली. 

दरम्यान, अशरफ गनी यांच्या व्यतिरिक्त अन्य कोणत्या नेत्यांनी देश सोडला आहे याची माहिती समोर आलेली नाही. राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देशाच्या राजकीय नेतृत्वाला सध्याचे संकट सोडवण्यासाठी अधिकृत केलं होतं. अशा परिस्थितीत, त्यांच्या देश सोडण्याबद्दल आधीच चर्चा सुरू होती, अशी माहिती कार्यवाहक संरक्षण मंत्री बिस्मिल्लाह अहमदी यांनी यापूर्वी दिली होती. तालिबाननं रविवारी काबुलवरही ताबा मिळवला होता. तालिबाननं तब्बल २० वर्षांनंतर पुन्हा एकदा काबुलवर आपली सत्ता प्रस्थापित केली. २००१ मध्ये अमेरिकेच्या हल्ल्यानंतर तालिबानला काबुल सोडून पळ ठोकावा लागला होता. तालिबानचा प्रमुख नेता काबुलमध्येरॉयटर्स या वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार तालिबानच्या राजनीतिक कार्यालयाचा प्रमुख मुल्ला अब्दुल गनी बरादर काबुलमध्ये पोहोचला आहे. तर दुसरीकडे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी हेदेखील काबुलमध्ये युद्ध लढण्याऐवजी तालिबानच्या हाती शांततेत सूत्र सोपवण्याच्या तयारीत होते अशी माहिती अफगाण सरकारमधील काही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली होती. अशातच अब्दुल गनी बरादर अफगाणिस्तानचा नवा राष्ट्राध्यक्ष बनू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. तसंच माजी अफगाण आंतरिक मंत्री अली अहमद जिलालीला अंतरिम प्रशासनाचा प्रमुख बनवलं जाऊ शकतं अशाही शक्यता वर्तवण्यात येत आहेत.

२० वर्षांपासून सरकारसोबत संघर्ष२००१ पासूनच तालिबान अमेरिका समर्थित सरकारशी संघर्ष करत आहे. अफगाणिस्तानमध्ये तालिबानचा उदयदेखील अमेरिकेच्या प्रभावामुळेच झाला होता. आता तोच तालिबान अमेरिकेसाठी डोकेदुखी ठरला आहे. १९८० च्या दशकात जेव्हा सोव्हियत संघानं अफगाणिस्तानमध्ये फौज उतरवली होती, तेव्हा अमेरिकेनंच त्या ठिकाणी असलेल्या मुजाहिद्दीनांना हत्यारं आणि प्रशिक्षण देत युद्धासाठी प्रवृत्त केलं होतं. परंतु त्यानंतरही ना सोव्हियत संघानं हार मानली आणि परत गेले, परंतु अफगाणिस्तानमध्ये एका कठ्ठरपंथी संघटनेचा जन्म झाला. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानwarयुद्धterroristदहशतवादीPresidentराष्ट्राध्यक्षTalibanतालिबान