शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

Afghanistan Crisis: पंजशीरमध्ये ३०० तालिबानी दहशतवाद्यांना ठार केल्यानंतर अहमद मसूद यांचे तालिबानला थेट आव्हान, म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 23, 2021 11:51 IST

Afghanistan Crisis: अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर संपूर्ण अफगाणिस्तान सहजपणे ताब्यात घेणाऱ्या तालिबानला पंजशीर प्रांतात मात्र कडवी टक्कर मिळत आहे.

ठळक मुद्देआम्ही युद्धाची तयारी केली आहेयामधून तोडगा काढण्यासाठी तालिबानसोबत चर्चा झाली तर आम्ही चर्चेसाठीही तयार आम्ही तालिबानला जाणीव करून देऊ इच्छा की, पुढे जाण्यासाठीचा एकमेव मार्ग हा चर्चा हा आहे. युद्ध सुरू व्हावे, अशी आमची इच्छा नाही

काबुल - अमेरिकन सैन्याच्या माघारीनंतर संपूर्ण अफगाणिस्तान सहजपणे ताब्यात घेणाऱ्या तालिबानला पंजशीर प्रांतात मात्र कडवी टक्कर मिळत आहे. (Afghanistan Crisis) पंजशीरमध्ये तालिबानविरोधातील योध्यांचे नेतृत्व करत असलेल्या अहमद मसूद यांचे योद्धे युद्धासाठी सज्ज आहेत. नँशनल रेजिस्टेंट फ्रंट म्हणजेच नॉर्दन अलायन्सचे नेतृत्व करत असलेल्या अहमद मसूद यांनी तालिबानला आव्हान दिले आहे. (Ahmed Masood's direct challenge to Taliban after killing 300 Talibani terrorists in Panjshir)

अहमद मसूद म्हणाले की, आम्ही युद्धाची तयारी केली आहे. मात्र यामधून तोडगा काढण्यासाठी तालिबानसोबत चर्चा झाली तर आम्ही चर्चेसाठीही तयार आहोत.   रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानुसार अफगाणिस्तानमध्ये तालिबानी दहशतवाद्यांना जोरदार टक्कर देत असलेल्या अहमद मसूद यांनी ही घोषणा अशावेळी केली आहे की, ज्यावेळी तालिबानने त्यांच्या हजारो दहशतवाद्यांना पंजशीरमध्ये पाठवले आहे. दरम्यान, मसूद यांनी ३०० तालिबानी दहशतवाद्यांना मारल्याचा तसेच अनेकांना बंदी बनवल्याचा दावा केला आहे.

पंजशीरचे सिंह म्हणून ओळखले जाणाऱ्या अहमद शाह मसूद यांचे पुत्र असलेल्या अहमद मसूद यांनी रॉयटर्ससोबत फोनवरून बोलताना सांगितले की, आम्ही तालिबानला जाणीव करून देऊ इच्छा की, पुढे जाण्यासाठीचा एकमेव मार्ग हा चर्चा हा आहे. युद्ध सुरू व्हावे, अशी आमची इच्छा नाही. तालिबानला आव्हान देण्यासाठी अहमद मसूद यांनी आपले सैन्य उभे केले आहे. हे सैन्य अफगाण सैन्य, स्पेशल फोर्सेस आणि स्थानिक योध्यांची मिळून बनली आहे.

दरम्यान, बंडखोरी मोडून काढण्यासाठी हजारो योध्यांना पंजशीरमध्ये पाठवण्यात आल्याचे तालिबानने सांगितले आहे. तालिबानने ट्विटर वरून सांगितले की, स्थानिक अधिकाऱ्यांनी शांततापूर्ण मार्गाने पंजशीर आमच्या ताब्यात देण्यास नकार दिला. त्यामुळे तेथील भागात नियंत्रण मिळवण्यासाठी आम्ही योद्धे पाठवले आहेत. तालिबानचे समर्थक असलेल्या एका अकाऊंटवरून या संदर्भातील एक व्हिडिओसुद्धा शेअर करण्यात आला आहे.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानwarयुद्ध