अफगाणिस्तानमध्ये रविवारी रात्री ६.३ रिश्टर स्केलचा भूकंप झाला आहे. यामध्ये सात जणांचा मृत्यू झाला असून १५० हून अधिक लोक जखमी झाले आहेत. मजार-ए-शरीफचंही नुकसान झालं. अफगाणिस्तानच्या बल्ख प्रांताचे प्रवक्ते हाजी झैद यांनी रॉयटर्सला सांगितलं की, भूकंपामुळे मजार-ए-शरीफच्या एका भागाचंही नुकसान झालं आहे.
आरोग्य विभागाचे प्रवक्ते समीम जोयांडा यांनी रॉयटर्सला दिलेल्या माहितीनुसार, आज सकाळपर्यंत सात जणांचा मृत्यू झाल्याची नोंद झाली आहे, तर १५० जण जखमी झाले आहेत. जखमींना आरोग्य केंद्रात हलवण्यात आलं आहे. मृतांची संख्या सोमवारी सकाळपर्यंत रुग्णालयांमधून मिळालेल्या रिपोर्टवर आधारित आहे.
यूएसजीएसने त्यांच्या पेजर सिस्टमवर ऑरेंज अलर्ट जारी केला आहे, ही एक स्वयंचलित प्रणाली आहे जी भूकंपाच्या परिणामाची माहिती देते. पेजरवरून असं दिसून येतं की, मोठ्या संख्येने जीवितहानी होण्याची शक्यता आहे आणि आपत्ती व्यापक असण्याची शक्यता आहे.
भारतीय एजन्सी नॅशनल सेंटर फॉर सीस्मोलॉजी (NCS) नुसार, पहिला भूकंप रविवारी (२ नोव्हेंबर २०२६) रात्री २०:४०:५२ वाजता झाला, ज्याची तीव्रता ३.९ रिश्टर स्केल होती. पाच तासांतच, हिंदूकुश प्रदेशात दुसरा भूकंप झाला, ज्याची तीव्रता ६.३ रिश्टर स्केल होती.
Web Summary : A 6.3 magnitude earthquake struck Afghanistan, killing seven and injuring over 150. Mazar-e-Sharif sustained damage. The USGS issued an orange alert, indicating significant casualties and widespread disaster potential. Two earthquakes hit the Hindu Kush region within five hours.
Web Summary : अफगानिस्तान में 6.3 तीव्रता के भूकंप से सात लोगों की मौत हो गई और 150 से अधिक घायल हो गए। मजार-ए-शरीफ को नुकसान हुआ। यूएसजीएस ने ऑरेंज अलर्ट जारी किया, जिसमें व्यापक आपदा की आशंका जताई गई। हिंदू कुश क्षेत्र में पांच घंटे में दो भूकंप आए।