शहरं
Join us  
Trending Stories
1
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
2
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
3
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
4
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
5
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
6
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
7
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
8
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
9
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
10
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
11
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
12
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
13
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
14
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
15
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
16
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
17
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
18
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
19
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
20
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

महिलांना बनवलं जातंय सेक्स स्लेव; जेवण आवडलं नाही म्हणून जिवंत जाळलं; माजी न्यायाधीशाचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2021 16:05 IST

Afghanistan Taliban Women : अफगाणिस्तानच्या माजी महिला न्यायधीशानं सांगितलं तालिबानींच्या वागणूकीची खरी कहाणी. अफगाणिस्तानातील महिलांशी संपर्कात असल्याचा त्यांचा दावा.

ठळक मुद्देअफगाणिस्तानच्या माजी महिला न्यायधीशानं सांगितलं तालिबानींच्या वागणूकीची खरी कहाणी.अफगाणिस्तानातील महिलांशी संपर्कात असल्याचा त्यांचा दावा.

अफगाणिस्तानाततालिबाननं कब्जा केल्यानंतर त्यांच्याकडून सुरू असलेल्या अत्याचाराच्या अनेक घटना समोर येताना दिसत आहे. महिलांना सोबत घेऊन चालणार असल्याचा दावा जरी तालिबाननं केला असला तरी त्यामागील चेहरा अनेक घटनांमधून उघडा पडताना दिसत आहे. अफगाणिस्तानच्या माजी न्यायाधीश नजला अयूबी यांनी एका मुलाखतीदरम्यान धक्कादायक घटनांचं कथन केलं आहे. "तालिबानद्वारे महिलांचा छळ करून त्यांना मारलं जात आहे. लोकांच्या अधिकारांचा सन्मान करू आणि इस्लामनुसार शिक्षण घेण्याचा अधिकार देऊ अशी खोटी आश्वासनं ते देत आहेत," असं त्या म्हणाल्या.

महिलांविरोधात तालिबानींनी केलेल्या हिंसाचाराचे आणि गैरवर्तनाचे अनेक प्रकार आपल्या कानी आल्याचे आयूबी यांनी सांगितलं. नजला अयूबी यांनी स्काय न्यूजला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्या ठिकाणची भयाण परिस्थिती कथन केली. "एका महिलेनं बनवलेलं जेवण तालिबांनींना आवडलं नाही म्हणून त्यांनी त्या महिलेला जिवंत जाळलं," असंही त्या म्हणाल्या. "लोकांना त्यांच्यासाठी जेवण तयार करण्यास जबरस्ती केली जात आहे. याशिवाय गेल्या काही आठवड्यांपासून अनेक तरूणींना शेजारी देशात पाठवलं जात आहे, जेणेकरून त्यांना सेक्स स्लेव बनवलं जावं," असंही अयूब म्हणाल्या.

अफगाणिस्तानातून आपला जीव वाचवून अयूब यांनी अमेरिकेत शरण घेतलं आहे. "ते कुटुंबातील लहान मुलींचं लग्न तालिबानींसोबत लावण्यासाठी जबरदस्ती करत आहे. त्यांनी महिलांना काम करण्याची परवानगी दिली आहे हे आश्वासन कुठे गेलं हे ठाऊक नाही. महिलांच्या अधिकारांबद्दल बोलण्यासाठी तालिबांनींपासून वाचण्याची गरज आहे. तालिबान एक वाईट स्वप्नाप्रमाणे आहे," असंही त्यांनी नमूद केलं. 

२० वर्षानंतर पुन्हा ताबाअफगाणिस्तानवर २० वर्षांनंतर तालिबाननं पुन्हा कब्जा मिळवला आहे. तालिबाननं राष्ट्रध्यक्ष भवनावरही ताबा मिळवला आहे. टोलो न्यूजनं दिलेल्या वृत्तानुसार त्या ठिकाणी सत्ता हस्तांतरणाची प्रक्रियाही पूर्ण करण्यात आली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार अंतरिम सरकारच्या प्रमुखाच्या रुपात अली अहमद जलाली याच्या नावाची चर्चा आगहे. अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनीदेखील देश सोडला आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानWomenमहिलाTalibanतालिबानAmericaअमेरिकाfoodअन्नEducationशिक्षण