शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
2
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
3
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
4
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
5
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
6
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
7
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
8
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
9
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
10
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
11
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
12
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
13
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
14
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
15
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
16
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
17
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
18
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
19
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
20
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले

देशाचा खजाना चोरून नेला; इटरपोलनं अशरफ गनींना अटक करावी; अफगाण दुतावासाची मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 18, 2021 17:54 IST

Afghanistan Taliban crisis : रविवारी अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर अशरफ गनी हे देश सोडून गेल्याची माहिती समोर आली होती. यावेळी त्यांनी आपल्यासह चार गाड्यांमध्ये पैसे भरून नेल्याचंही रशियन दुतावासानं म्हटलं होतं.

ठळक मुद्देरविवारी अफगाणिस्तानवर तालिबाननं ताबा मिळवल्यानंतर अशरफ गनी हे देश सोडून गेल्याची माहिती समोर आली होती. यावेळी त्यांनी आपल्यासह चार गाड्यांमध्ये पैसे भरून नेल्याचंही रशियन दुतावासानं म्हटलं होतं.

अफगाणिस्तानवरतालिबानचा वाढता प्रभाव पाहून अफगाणिस्तानचे राष्ट्राध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडला होता. तसंच जाताना त्यांनी आपल्यासोबत चार गाड्याभरून पैसे आणि चॉपर नेल्याचा दावा रशियन दुतावासानं प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्यानं केला होता. दरम्यान, सध्या अशरफ गनी हे कोणत्या देशात आहेत याची माहिती समोर आलेली नाही. परंत आता ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानच्या दुतावासानं इंटरपोलला अशरफ गनी यांना ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. दुतावासानं इंटरपोलकडे अशरफ गनी आणि हमदुल्लाह मोहिम, तसंच फजल अहमद फाजली यांना सार्वजनिक संपत्ती चोरण्याच्या आरोपाखाली ताब्यात घेण्याची मागणी केली आहे. तसंच ती संपत्ती अफगाणिस्तानला परत करण्यात यावी असंही म्हटलंय. टोलो न्यूजनं सूत्रांच्या हवाल्यानं यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.

रॉयटर्स या वृत्तसंस्थेनं अशरफ गनी यांनी पैशांनी भरलेल्या कार आणि चॉपर घेऊन पलायन केल्याचा दावा केला होता. तसंच रशियाची वृत्तसंस्था RIA आणि काही प्रत्यक्षदर्शींच्या हवाल्यानं हे वृत्त देण्यात आलं होतं. अशरफ गनी यांना काही पैसे या ठिकाणीच सोडून जावे लागले कारण ते त्यात ठेवू शकत नव्हते, असंही यावेळी सांगण्यात आलं.  "चार कार्स या रोख रकमेनं भरलेल्या होत्या. त्यानंतर गनी यांनी काही रक्कम चॉपरमध्ये ठेवली. यानंतरही ते आपले पूर्ण पैसे त्यात ठेवू शकले नाहीत. त्यामुळे त्यांना काही पैस इकडेच ठेवून निघावं लागलं," अशी माहिती रशियाच्या दुतावासाच्या प्रवक्त्या निकिता इंशचेन्को यांनी दिली होती. प्रत्यक्षदर्शींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे आपण हे वक्तव्य करत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं.

गनींचा फोटोही काढलाअफगाणिस्तानचे राष्ट्रपती अशरफ गनी यांनी देश सोडून पलायन केलं. त्यानंतर, उपराष्ट्राध्यक्ष अमरुल्ला सालेह यांनी स्वत:ला अफगाणिस्तानचं काळजीवाहू राष्ट्राध्यक्ष घोषित केलं. सालेह यांनी केलेल्या घोषणेचा परिणाम दिसायला सुरुवात झाली आहे. ताजिकिस्तानमधील अफगाणिस्तानच्या दुतावासातून अशरफ गनी यांना फोटो काढून टाकण्यात आला आहे. त्याऐवजी आता अमरुल्ला सालेह यांचा फोटो लावण्यात आला आहे. तसेच, पंचशीरचा वाघ म्हटलं जाणाऱ्या अहमद शाह मसूद यांचाही फोटो दुतावासात लावण्यात आला आहे. 

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानTalibanतालिबानrussiaरशियाMONEYपैसाInternationalआंतरराष्ट्रीय