शहरं
Join us  
Trending Stories
1
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
2
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
3
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
4
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
5
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
6
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
7
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
8
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
9
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
10
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
11
सोने दीड लाखावर, तरी खरेदी जोरात; आयात तुफान वाढली, भारताला स्वित्झर्लंडच्या सोन्याचा मोह
12
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
13
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
14
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
15
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
16
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
17
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
18
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
19
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
20
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
Daily Top 2Weekly Top 5

अफगाण लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून २५ ठार

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 1, 2018 04:13 IST

अफगाण लष्कराचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे कोसळून लष्कराच्या पश्चिम विभागाच्या उपप्रमुखांसह २५ जण ठार झाले.

काबूल : अफगाण लष्कराचे हेलिकॉप्टर खराब हवामानामुळे कोसळून लष्कराच्या पश्चिम विभागाच्या उपप्रमुखांसह २५ जण ठार झाले. पश्चिमेकडील फराह प्रांतात बुधवारी सकाळी ही दुर्घटना घडली.फराह प्रांत राज्यपालांचे प्रवक्ते मोहंमद नासेर मेहरी यांनी सांगितले की, अनार दार जिल्ह्यानजीकच्या डोंगराळ भागातून हेरात प्रांताकडे रवाना झाल्यानंतर लागलीच हेलिकॉप्टर स्थानिक वेळेनुसार सकाळी ९.१० वाजता कोसळले. हेलिकॉप्टरमध्ये लष्करी दलाचे कमांडर जन. नैमुदुल्लाह खलील, फराह प्रांत परिषदेचे चेअरमन फरीद बख्तावर आणि सदस्या जमिला अमिनी यांचाही समावेश होता. फराह प्रांतात लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळण्याची ही दुसरी घटना होय. सप्टेंबरमध्ये लष्कराचे हेलिकॉप्टर कोसळून पाच जण ठार झाले होते.दरम्यान, काबूलच्या पूर्वेकडील अफगाणमधील सर्वांत मोठ्या तुरुंगाबाहेर झालेल्या आत्मघाती हल्ल्यात तुरुंग आणि सुरक्षा कर्मचाऱ्यांसह सात जण ठार झाले. तुरुंग कर्मचाºयांना घेऊन जाणाºया वाहनाला हल्लेखोरांनी लक्ष्य केले. पूल-ए-चरखी कारागृहात तालिबानांसह शेकडो कैदी आहेत. या हल्ल्याची अद्याप कोणीही जबाबदारी स्वीकारलेली नाही, असे गृहमंत्रालयाचे प्रवक्ते नजीब दानिश यांनी सांगितले.

टॅग्स :Afghanistanअफगाणिस्तानAccidentअपघातDeathमृत्यू