शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
3
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
4
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
5
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
6
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
7
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
8
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
9
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
10
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
11
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
12
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
13
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
14
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
15
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
16
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
17
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
18
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
19
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
20
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
Daily Top 2Weekly Top 5

अफगाण हवाई दलाचा पाकिस्तानवर मोठा प्रहार, लष्करी तळावर जबरदस्त ड्रोन हल्ला! 'हमजा' उद्ध्वस्त केल्याचा दावा

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2026 11:22 IST

या भीषण हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे कमांड सेंटर, डेपो आणि सैनिकांच्या निवास स्थाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून पाकिस्तानचे मोठे मानवी आणि आर्थिक नुकसान झाले आहे, असा दावा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे.

मध्यपूर्वेत अमेरिका-इस्रायल आणि इराण संघर्ष पेटलेला असतानाच, दुसरीकडे पाकिस्तान आणि अफगाणिस्तान यांच्यातील तणावही शिगेला पोहोचला आहे. आता अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी संयंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास अफगाण हवाई दलाच्या ड्रोनने इस्लामाबादेतील फैजाबाद येथील 'हमजा' या धोरणात्मक लष्करी तळावर जबरदस्त ड्रोन हल्ला केला. 'ड्युरंड रेषे'वरून सुरू असलेल्या या 'खुल्या युद्धात' आतापर्यंतची ही सर्वात मोठी लष्करी कारवाई मानली जात आहे.

या भीषण हल्ल्यात पाकिस्तानी लष्कराचे कमांड सेंटर, डेपो आणि सैनिकांच्या निवास स्थाने पूर्णपणे उद्ध्वस्त झाले असून पाकिस्तानचे मोठे मानवी आणि आर्थिक नुकसान झाले आहे, असा दावा अफगाणिस्तानच्या संरक्षण मंत्रालयाने केला आहे. खरेतर,  पाकिस्तानने अफगाणिस्तानमधील काबुल, पक्तिया आणि कंदहार येथे केलेल्या हवाई हल्ल्यांचा बदला म्हणून ही कारवाई करण्यात आली आहे.

पाकिस्तानचे 'ऑपरेशन गजब लिल हक' -तत्पूर्वी, पाकिस्तानने अफगाणिस्तानच्या शहरी भागांत केलेल्या बॉम्बिंगला 'ऑपरेशन गजब लिल हक' असे नाव दिले होते. याद्वारे दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्याचा दावा पाकिस्तानने केला असला तरी, संयुक्त राष्ट्रांच्या मते यामध्ये महिला आणि मुलांसह अनेक निष्पाप नागरिकांचा मृत्यू झाला. 

चीनकडून दोन्ही देशांना शांततेचे आवाहन -या हल्ल्यानंतर इस्लामाबादमध्ये हाय-अलर्ट जारी करण्यात आला असून शहराचे प्रवेशद्वार मर्यादित करून तपासणी वाढवण्यात आली आहे. दरम्यान, वाढता तणाव पाहता चीनने दोन्ही देशांना शांततेचे आवाहन केले आहे. एवढेच नाही तर, चीनचे परराष्ट्र मंत्री वांग यी यांनी अफगाण नेत्यांशी संवाद साधून सैन्य माघारी घेण्याचा आग्रहही धरला आहे.

का पेटलं पाकिस्तान आणि अफगाणिस्तान युद्धखरेतर, २६०० किलोमीटर लांबीच्या 'ड्युरंड रेषे'वरून दोन्ही देशांमध्ये वाद पेटला आहे. या रेषेला अफगाणिस्तान मान्यता देत नाही. याशिवाय, अफगाणिस्तान 'TTP' (तहरीक-ए-तालिबान पाकिस्तान) सारख्या दहशतवादी संघटनेला आश्रय देत असल्याच आरोपही पाकिस्तानकडून केला जात आहे. तर अफगाणिस्तान याला आपल्या सार्वभौमत्वाचे उल्लंघन असल्याचे म्हणत आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Afghan Forces Strike Pakistani Military Base in Retaliatory Drone Attack

Web Summary : Afghanistan claims a drone strike on a Pakistani military base, a response to Pakistan's strikes within Afghanistan. Tensions escalate over border disputes and alleged support for terrorist groups. China urges peace.
टॅग्स :Pakistanपाकिस्तानAfghanistanअफगाणिस्तानWarयुद्ध