शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिका-इराण यांच्यात 45 दिवसांचा युद्धविराम? ट्रम्प यांच्या धमकीनंतर आलेल्या वृत्ताने सर्वच चकित; पडद्यामागे नेमकं घडतंय काय? 
2
इराणने अमेरिकेची एका दिवसात १० विमाने कशी पाडली? माजी CIA अधिकाऱ्याचा खळबळजनक दावा!
3
नोटांच्या बंडलवर लोळतोय डॉक्टर अफजल; किडनी रॅकेटमधील आरोपीचा Video व्हायरल
4
रणबीर कपूरच्या 'रामायण'ची निर्मिती करणाऱ्या कंपनीच्या शेअर सुसाट! एका वर्षात २६२% परतावा
5
"बिनविरोध निवडणुकांना विरोध करणं काँग्रेसची भूमिका"; बारामतीत उमेदवार दिल्याने राऊतांनी व्यक्त केली नाराजी
6
Param Ashawar : ग्रामीण भागातील मुलींना नॅशनल फुटबॉल लीगमध्ये पोहोचवण्यासाठी कोचने घेतलं १० लाखांचं कर्ज
7
रिटायरमेंटनंतर दर महिना ५०००० रुपयांची पक्की व्यवस्था! सुरक्षित भविष्यासाठी अशा पद्धतीने करा 'स्मार्ट' गुंतवणूक
8
"होर्मुझच्या चाव्या हरवल्यात!" इराणचा ट्रम्प यांना खोचक टोला; अमेरिकेच्या अल्टिमेटमनंतर जागतिक व्यापारावर टांगती तलवार!
9
३५ दिवसांनी मुलाचे अवशेष मुंबईत आणले; अंत्यसंस्कारापूर्वी कुटुंबाची हायकोर्टात धाव, कारण काय?
10
इस्रायलच्या हायफावर इराणचा भीषण मिसाइल हल्ला! बिल्डिंग जमीनदोस्त; युद्धाचा भडका उडाला
11
लग्नानंतर १२ वर्षांनी शेजाऱ्याच्या प्रेमात पडली पत्नी; पती अडसर ठरत होता म्हणून रचला खळबळजनक कट!
12
इराणविरुद्धच्या युद्धादरम्यान व्हाईट हाऊस जवळ गोळीबार, ट्रम्पसुद्धा जवळच होते उपस्थित
13
कंपनी असावी तर अशी! कर्मचाऱ्याच्या निधनानंतरही १० वर्षांपर्यंत कुटुंबाला देते ५० टक्के सॅलरी, जाणून घ्या
14
Abhishek Banerjee : "बंगालच्या जनतेला उपाशी मारण्यासाठी मोदी सरकारने ५ वर्षांपासून..."; अभिषेक बॅनर्जींचा आरोप
15
"होर्मुझ' उघडणार पण...!"; ट्रम्प यांची महाविनाशक धमकी आणि इराणची मोठी अट; वाढणार भारताच टेन्शन!
16
गुंतवणूक ५ लाखांची, परतावा ७ लाखांचा! ज्येष्ठ नागरिकांसाठी बँक ऑफ बडोदाची एफडी ठरतेय 'सुपरहिट'
17
ना DMK, ना AIDMK, ना भाजपा..., तामिळनाडूत एकाही पक्षाने ब्राह्मण व्यक्तीला दिली नाही उमेदवारी, कारण काय?  
18
Vastu Tips: घराचा मुख्य दरवाजा दक्षिण दिशेला आहे? करा 'हा' बिनखर्चिक उपाय; मिळेल अभेद्य सुरक्षा कवच! 
19
होर्मुजच्या सामुद्रधुनीत इराणनं रस्ता रोखला? केवळ १५ जहाजांनाच एन्ट्री; ट्रम्प यांचा अल्टीमेटम! म्हणाले..
20
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीच्या किमतीत मोठी घसरण; मोठ्या चढ-उतारादरम्यान पाहा दिल्ली, मुंबई, चेन्नईतील नवे दर
Daily Top 2Weekly Top 5

Corona Virus : कोरोना व्हायरस रोखण्यासाठी 'ही' भारतीय पद्धत वापरा; इस्त्रायलच्या पंतप्रधानांनी सांगितले कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 5, 2020 11:08 IST

Corona Virus : कोरोनापासून बचाव करण्यासाठी जगभरातील देश अनेक खबरदारी घेत आहेत, कोरोनाग्रस्त पीडित लोकांच्या संपर्कात आल्याने हा व्हायरस वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे लोकांना सतर्क करण्यात येत आहे.

ठळक मुद्देकोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या जात आहेत आतापर्यंत जगात सुमारे 3000 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यूविविध देशाकडून नागरिकांना केलं जातंय सतर्क

नवी दिल्ली - सध्या जगभरात कोरोना व्हायरसची दहशत पसरली असून आतापर्यंत ३ हजारांहून अधिक लोकांचा जीव गेला आहे. चीनच्या वुहान शहरातून पसरलेला हा व्हायरस हळूहळू जगातील अन्य शहरांमध्ये पोहचला आहे. भारतातहीकोरोना व्हायरसचे २९ रुग्ण आढळून आल्यामुळे सरकारने सर्व नागरिकांना सतर्क केलं आहे. 

जगभरात अनेक ठिकाणी कोरोना व्हायरसच्या बचावासाठी विविध पाऊलं उचलली जात आहेत. अमेरिका, इराक, दक्षिण कोरिया यांनी नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन केले आहे. यातच इस्त्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांनी आपल्या लोकांना जगातील कोरोना व्हायरसचा धोका टाळण्यासाठी भारतीय पद्धतीचा अवलंब करण्याचा सल्ला दिला आहे. 

पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू म्हणाले की, इस्त्रायलच्या लोकांनी एकमेकांना अभिवादन करण्यासाठी भारतीय पद्धतीने नमस्कार करा. त्यामुळे कोरोना विषाणूचा प्रसार होण्यापासून रोखण्यात मदत करेल. जगातील सर्व मोठे देश कोरोना व्हायरसच्या संकटाचा सामना करत आहेत. आतापर्यंत जगात सुमारे 3000 लोकांचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला आहे.

भारत, इंडोनेशिया आणि थायलंडमध्ये कोरोना व्हायरसचे रुग्ण आढळल्यानंतर जागतिक आरोग्य संघटनेने सर्व दक्षिण-पूर्व आशियाई देशांना या परिस्थितीचा सामना करण्यास आणि प्रतिबंधात्मक उपाययोजना सुनिश्चित करण्यास तयार राहण्यास सांगितले आहे. आतापर्यंत भारतात कोरोनाची 29 रुग्ण आढळली आहेत.

'भारतीय पद्धत' स्वीकारापत्रकार परिषदेत बेंजामिन नेतान्याहू म्हणाले की, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी अनेक उपाययोजना जाहीर केल्या जातील. परंतु काही सोप्पे उपाय आहेत. जसे की हस्तांदोलन सोडून भारतीय शैलीमध्ये नमस्ते करता येईल. 

पत्रकार परिषदेदरम्यान त्यांनी आपले हातही जोडले आणि भारतीय लोकांना कसे भेटतात, त्यांचे स्वागत कसे करतात हे लोकांना समजावले. 

इटलीमध्ये 100 हून अधिक मृत्यू कोरोना व्हायरसमुळे इटलीमध्ये मृतांचा आकडा बुधवारी शंभरच्या वर पोहचला आहे. या व्हायरसची लागण झालेल्या पीडित लोकांची संख्या तीन हजारांच्या वर गेली आहे. गेल्या चोवीस तासांत 28 जणांचा मृत्यू झाला, मृतांचा आकडा 107 वर आला. चीनबाहेर कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूची ही संख्या सर्वाधिक आहे. अधिकृत आकडेवारीनुसार इटलीमध्ये आतापर्यंत ३ हजार ८९ जणांना कोरोना व्हायरसची लागण झाली आहे.  

टॅग्स :Israelइस्रायलcorona virusकोरोनाchinaचीनIndiaभारतHealthआरोग्य