शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
5
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
6
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
7
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
8
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
9
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
10
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
11
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
12
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
13
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
14
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
15
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
16
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
17
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
18
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
19
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
20
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
Daily Top 2Weekly Top 5

"विमानातून खाली क्षेपणास्त्रे उध्वस्त होताना पाहत होतो"; अबु धाबीहून पहिले विमान भारतात पोहोचले, प्रवाशांनी सांगितला अनुभव 

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 3, 2026 04:03 IST

Abu Dhabi to Delhi Mumbai flights started: मध्य-पूर्वेतील युद्धात विस्कळीत झालेली अबु धाबी-भारत विमानसेवा पुन्हा सुरू. प्रवाशांनी आकाशातील क्षेपणास्त्र युद्धाचा थरार सांगितला. एतिहाद एअरवेजच्या विमानांनी मुंबई आणि दिल्ली गाठले. वाचा प्रत्यक्षदर्शींचे अनुभव.

पश्चिम आशियातील वाढत्या तणावामुळे आणि इराणने केलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे विस्कळीत झालेली हवाई वाहतूक आता काही अंशी पूर्वपदावर येत आहे. अबु धाबी ते दिल्ली आणि मुंबई या मार्गावरील विमानसेवा पुन्हा सुरू करण्यात आली आहे. सध्या ही सेवा 'मर्यादित' स्वरूपात सुरू असली तरी, यामुळे आखाती देशांत अडकलेल्या हजारो भारतीय प्रवाशांना मोठा दिलासा मिळाला आहे.

मध्य-पूर्वेतील रणसंग्राम सुरू असतानाच, अबु धाबीहून दिल्ली आणि मुंबईसाठी काही विमानांनी उड्डाण केले आहे. या विमानप्रवासात प्रवाशांनी जे पाहिले, ते ऐकून कोणाचेही हृदय धडधडेल. 'एतिहाद एअरवेज' आणि इतर विमानांतून मायदेशी पोहोचलेल्या भारतीयांनी आकाशातील क्षेपणास्त्र युद्धाचा जिवंत अनुभव कथन केला आहे. अबु धाबीहून दिल्लीच्या आयजीआय विमानतळावर पोहोचलेल्या शिव नावाच्या प्रवाशाने सांगितले की, "विमानातून खाली पाहताना आकाशात क्षेपणास्त्रांची मोठी हालचाल दिसत होती. अनेक क्षेपणास्त्रे हवेतच नष्ट होताना आम्ही डोळ्यांनी पाहिले,".

सुरक्षेच्या कारणास्तव सध्या सर्वच विमानांना परवानगी देण्यात आलेली नाही. केवळ काही निवडक विमान कंपन्यांना ठराविक वेळेत उड्डाण करण्याची मुभा देण्यात आली आहे. इराण आणि इराकमधील हवाई क्षेत्र अत्यंत धोकादायक असल्याने, विमाने आता लांबच्या आणि सुरक्षित मार्गाने वळवण्यात आली आहेत. यामुळे प्रवासाचा वेळ वाढण्याची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून विमानतळावर अडकून पडलेल्या प्रवाशांना प्राधान्याने भारतात आणले जात आहे.  दोहा येथून गो इंडिगोची विमानसेवा सुरु होणार आहे. 

इतर शहरांचे काय? दुबई आणि इतर संवेदनशील भागांतील विमानसेवा अद्याप पूर्णपणे सुरू झालेली नाही. तिथल्या परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील निर्णय घेतला जाईल.

प्रवाशांसाठी मार्गदर्शक सूचना:१. विमानतळावर निघण्यापूर्वी आपल्या फ्लाईटचे स्टेटस ऑनलाइन तपासावे.२. तिकीट बुक करण्यापूर्वी ट्रॅव्हल ॲडव्हायझरी नक्की वाचावी.३. विमान कंपन्यांकडून मिळणाऱ्या अधिकृत मेसेज किंवा ईमेलवरच विश्वास ठेवावा.

English
हिंदी सारांश
Web Title : Passengers Witnessed Missiles; First Abu Dhabi Flight Lands in India

Web Summary : Flights resume from Abu Dhabi to India amidst Middle East tensions. Passengers recount witnessing missile activity during the flight. Limited services operate with rerouted flights. Passengers stuck at airports are being prioritized.
टॅग्स :Iranइराणwarयुद्धDubaiदुबईIsraelइस्रायल