शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातच्या गांधीनगर येथील मतदान केंद्रात PM नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क
2
बारामतीत अजित पवार गटावर पैसे वाटल्याचा आरोप; रोहित पवारांचा दावा, Video दाखवले
3
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : लोकसभा निवडणुकीच्या तिसऱ्या टप्प्यातील मतदानाला सुरुवात
4
संपादकीय: सगळ्याच जिभा घसरल्या !
5
सुनीता विल्यम्स यांची अवकाश भरारी स्थगित; टेक ऑफच्या आधी अंतराळयानात तांत्रिक बिघाड
6
कांदा निर्यातबंदीची मोठी किंमत मोजावी लागली; राज्यातील शेतकऱ्यांना एकरी तीन लाखांचा फटका
7
किम जोंगच्या ‘प्लेझर स्क्वॉड’साठी २५ तरुणी; तिची दोनदा निवड झाली, पण...
8
‘घर की बिटीया’ राजकीय आखाड्यात; अखिलेश यादवांची मुलगी प्रचाराच्या मैदानात... वेधतेय लक्ष...
9
निवडणूक आयोगाचा कणा थोडा ताठ राहील? एकाएकी मतदान वाढले, कुठे तरी पाणी मुरतेय...
10
आजचे राशीभविष्य - ७ मे २०२४; आर्थिक लाभाची शक्यता, विवाहेच्छुकांना योग्य जोडीदार मिळण्याची संभावना
11
भाजपचे २० ते २५ आमदार फोडण्याचे उद्धव ठाकरे यांचे कारस्थान होते; एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट
12
भारत-पाकिस्तान करायला ही काय क्रिकेटची मॅच आहे का? रमेश चेन्निथलांचा भाजपला सवाल
13
गुजराती सोसायटीत मराठी कार्यकर्त्यांना प्रचारास मज्जाव; 'आम्ही भाजपलाच मतदान करणार'
14
कितीही असाे तापमानाचा पारा; गाजवा तुमच्या मतदानाचा तोरा
15
याला म्हणतात घबाड! मंत्र्याच्या पीएचा नोकर, पगार फक्त १५ हजार; घरात ३० कोटींचा ढीग
16
काहीही करा, पण मतदानाची टक्केवारी वाढवा; अन्यथा कारवाईस तयार रहा, भाजपश्रेष्ठी धास्तावले
17
दहशतवाद्यांवर २० लाखांचे बक्षीस, दोन संशयित दहशतवाद्यांची रेखाचित्रे जारी; शेकडो जवानांकडून शोधमोहीम
18
ठाकरे गट व महायुती कार्यकर्त्यांत वाद; उज्वल निकमांचा प्रचार करतानाचा प्रसंग
19
साधनसंपत्ती तरीही लोक राहिले गरिब; ओडिशात पंतप्रधान माेदींचा हल्लाबाेल
20
कोणत्या भागातून किती लीड मिळते, त्यावर महापालिकेसाठी उमेदवार ठरविले जातील

अबब..! 21 वर्षीय तरुणाला उबरने दिले एक लाखाचे बिल

By ऑनलाइन लोकमत | Published: March 08, 2018 6:14 PM

आपण अनेकवेळा टॅक्सीतून प्रवास करतो. परंतु त्याचे भाडे जवळपास 100 ते 5000 रुपयांपर्यंत येते. मात्र...

वेस्ट वर्जिनिया : आपण अनेकवेळा टॅक्सीतून प्रवास करतो. परंतु त्याचे भाडे जवळपास 100 ते 5000 रुपयांपर्यंत येते. मात्र अमेरिकामध्ये एखा उबरच्या टॅक्सीतून  482 किलोमीटर प्रवासाचे भाडे तब्बल एक लाख रुपये आल्याने एका प्रवाशाला आश्चर्याचा झटकाच बसला. मिळालेल्या वृत्तानुसार, अमेरिकेत न्यूजर्सीमध्ये राहणाऱ्या केनी बॅकमैन या 21 वर्षीय तरुणाला एक लाख रुपयांचे बिल उबरने दिले. केनी कॅबमध्ये झोपला होता. 500 किमी दूर गेल्यानंतर त्याला जाग आली.  मिळालेल्या वृत्तानुसार, केनी कॅबमध्ये बसला त्यावेळी नशेत होता. 

केनी शुक्रवारी आपल्या मित्रांसोबत वेस्ट वर्जिनियामध्ये पार्टीमध्ये गेला होता. त्यानंतर त्याने दारुच्या नशेतच वेस्ट वर्जिनिया यूनिवर्सिटी कँपसमध्ये जाण्यासाठी कॅबला बोलवले.  कॅबमध्ये बसून वेस्ट वर्जिनिया यूनिवर्सिटी कँपसमध्ये जाताना त्याला डुलकी लागली. 500 किमीचा प्रवास झाल्यानंतर त्याचा डोळा उघडला तर तो  न्यू जर्सीत पोहचला होता. तिथेच उबरने त्याला एक लाखाचे बिल हातात दिले. हे बिल देण्यासाठी त्यानं 'गो फंड मी' या वेबसाईटची मदत घेतली. 

माध्यमांच्या वृत्तानुसार, केनी म्हणाला की,  ज्यावेळी मी झोपेतून उठलो त्यावेळी माझ्या बाजूला अनोळखी लोक बसले होता. त्यावेळी मला मी कुठे आलो हे मला काही समजले नाही. दरम्यान, कॅब कंपनीने केनीच्या या घटनेला दुजोरा दिला. ते म्हणाले की, केनीने ड्रायव्हरला जेथे सोडलायला सांगितले तिथेच त्याला सोडण्यात आलं. प्रावस संपल्यानंतर केनीनं चालकाला पाच रेटींग पॉईंट दिले आहेत. 

टॅग्स :Uberउबर