शहरं
Join us  
Trending Stories
1
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
2
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
3
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
4
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
5
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
6
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
7
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
8
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
9
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
10
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
11
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
14
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
15
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
16
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
17
अमेरिका-इराण युद्धविरामानंतर केंद्र सरकारचा मोठा निर्णय; LPG पुरवठ्याबाबत नवा फॉर्म्युला तयार
18
ही कसली सीझफायर? लावन रिफायनरीनंतर सिर्री बेटही स्फोटांनी हादरले; तेलाच्या साठ्यांवर हल्ले?
19
आगीतून फुफाट्यात! बाईक चोरली अन् ट्रॅफिक नियमही मोडला; चोराचा फोटो पोहोचला मालकाच्या मोबाईलवर
20
Tech Tips: कोणालाही न कळता कॉल रेकॉर्डिंग कसे करावे? ९९% लोकांना माहित नाही ही सोपी ट्रिक!
Daily Top 2Weekly Top 5

अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 8, 2026 17:03 IST

Indians in Tehran Safety: भारतात इराणचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी युद्धविरामानंतर अमेरिकेवर टीका केली आहे. इराणमधील भारतीयांची सुरक्षा ही आमची प्राथमिकता असल्याचे त्यांनी म्हटले. वाचा सविस्तर वृत्त.

इराण आणि अमेरिका यांच्यातील युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर, भारतातइराणचे दिवंगत सर्वोच्च नेते आयतुल्ला खोमेनी यांचे प्रतिनिधी डॉ. अब्दुल माजिद हकीम इलाही यांनी इराणमध्ये राहणाऱ्या भारतीयांच्या सुरक्षेबाबत मोठी माहिती दिली आहे. "इराणमधील भारतीय बंधू-भगिनींची काळजी घेणे ही केवळ आमची प्राथमिकता नाही, तर ते माझे कर्तव्य आणि जबाबदारी आहे," असे भावूक उद्गार त्यांनी काढले आहेत.

डॉ. इलाही यांनी एका प्रसंगाचा उल्लेख करत भारतीयांप्रति असलेल्या आदराची भावना व्यक्त केली. "चाळीस दिवसांपूर्वी जेव्हा युद्ध सुरू झाले, तेव्हा मी इराणमधील माझ्या पाहुण्यांना, सहकाऱ्यांना तातडीने संदेश पाठवला होता. तेहरानसह विविध शहरांमधील विद्यापीठांत शिकणाऱ्या सुमारे ३,००० भारतीय विद्यार्थ्यांना (ज्यामध्ये बहुतांश वैद्यकीय क्षेत्रातील होते) सुरक्षित स्थळी हलवण्याची विनंती मी केली होती," असे त्यांनी सांगितले.

हॉटेल आणि निवासाची सोयभारतीय विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी इराण सरकारने स्वतः पुढाकार घेऊन त्यांच्यासाठी हॉस्टेल, हॉटेल्स आणि इतर निवासस्थाने भाड्याने घेतली होती. "आम्ही आमच्या लोकांना स्पष्ट आदेश दिले होते की, भारतीय विद्यार्थ्यांना कोणत्याही परिस्थितीत सुरक्षित जागी पोहोचवा. तेहरानमधील भारतीय दूतावासानेही त्यावेळी मोलाचे सहकार्य केले होते आणि सर्व विद्यार्थी सुखरूप होते," अशी आठवण डॉ. इलाही यांनी सांगितली.

युद्ध इराणवर लादले गेले

डॉ. इलाही यांनी स्पष्ट केले की, इराणला हे युद्ध नको होते. "हे युद्ध आमच्यावर लादण्यात आले आहे. अमेरिका आणि इस्रायलनेच इराणच्या नागरिक आणि घरांवर हल्ले करून या संघर्षाची सुरुवात केली. पण जेव्हा त्यांना समजले की ते इराणची 'सभ्यता' नष्ट करू शकत नाहीत, तेव्हा त्यांना आपली चूक उमजली," असे त्यांनी म्हटले.

होर्मुझ सामुद्रधुनी आणि लेबनॉनचा पेचहोर्मुझच्या सामुद्रधुनीबाबत बोलताना डॉ. इलाही म्हणाले की, "हे इराणच्या हातात आहे की तिथे काय करायचे. युद्धापूर्वी हा मार्ग सर्वांसाठी खुला होता. आम्हाला आशा आहे की हा युद्धविराम कायम राहील आणि अमेरिका पुन्हा युद्ध सुरू करण्याची चूक करणार नाही." तसेच, इस्रायलने लेबनॉनवरील हल्ले सुरूच ठेवण्याच्या विधानावर त्यांनी सावध प्रतिक्रिया देत, इराणच्या १० अटींवर चर्चा सुरू असल्याचे सांगितले.

English
हिंदी सारांश
Web Title : Iran War: Indians' Safety Prioritized; 3000 Students Evacuated Amidst Attacks

Web Summary : Amidst Iran-America tensions, Iran prioritized Indian citizens' safety. 3000 Indian students, mostly medical, were evacuated from Iranian universities and provided safe accommodation. Iran blames America and Israel for initiating the conflict, hoping ceasefire holds and peace prevails in the region.
टॅग्स :US Israel Iran Warअमेरिका-इस्रायल-इराण वॉरIranइराणWarयुद्धIndiaभारत