शहरं
Join us  
Trending Stories
1
आयकर विभागाची मोठी कारवाई! १०५० पोलिसांना नोटीस; महाराष्ट्र पोलिस दलात खळबळ
2
काँग्रेस प्रशिक्षण शिबिरात राहुल गांधी उशिरा पोहोचले, शिक्षा म्हणून त्यांना पुश-अप्स काढायला लावले
3
तीन दिवस झाले, लिंगनिहाय आकडेवारी कुठे आहे? तेजस्वी यादव यांनी निवडणूक आयोगावर डेटा लपवल्याचा आरोप केला
4
विखे पाटलांनी उद्धव ठाकरेंना डिवचले, आजारी संजय राऊत संतापले; म्हणाले, 'तुम्ही...'
5
मावळतीच्या सुवर्णकिरणांनी अंबाबाईच्या कानांना केले स्पर्श, पारंपरिक दक्षिणायन किरणोत्सवाचे हजारो भाविक ठरले साक्षीदार
6
Gold-Silver Rate : सोन्या-चांदीचे दर आणखी कमी होणार? जाणून घ्या पुढचा अंदाज
7
पुण्यात बिबट्याची दहशत, स्वरक्षणासाठी गळ्यात टोकदार खिळ्यांचा पट्टा घालण्याची वेळ, ग्रामस्थांची नवी शक्कल
8
बिहारमध्ये शेवटच्या क्षणी NDA चा मास्टर स्ट्रोक...! नीतीश फ्रंटफुटवर, पंतप्रधान सोबत, महिलांच्या 10 हजारी स्कीमसंदर्भात मोठी घोषणा
9
Photo: कोण होणार मिस युनिव्हर्स? मनिका विश्वकर्माचा 'अनारकली' लूक व्हायरल...
10
लहान बहिणीसोबत अनेकवेळा जबरदस्ती शरीरसंबंध, कुटुंबीयांना सांगायला गेली, तर म्हणाला, 'मी जीव देईन'
11
रशिया शांतपणे कशाची तयारी करतंय? पाश्चात्य देशांनी इशारा दिला; जगासाठी धोक्याची घंटा
12
बिहार निवडणुकीचा प्रचार संपला; दुसऱ्या टप्प्यासाठी ३.७ कोटी मतदार, मतदान, मतमोजणी कधी?
13
Mhada: ९० लाखांचा फ्लॅट २८ लाखांमध्ये, खरं की खोटं? 'म्हाडा'ने लोकांना केलं सावध, काय म्हटलं आहे?
14
Mumbai Weather: शीत वाऱ्यांमुळे पारा घसरला! मुंबईकरांना थंडीचा फील घेता येणार; आठवडाभर कसे राहणार हवामान?
15
धक्कादायक! रुग्णालयात उपचारासाठी आला, अचानक धारदार शस्त्राने डॉक्टरांची हत्या केली, नेमकं काय घडलं?
16
अक्कलकुवाजवळ शालेय बस दरीत कोसळली; अमलीबारी येथे भीषण अपघात, एका विद्यार्थ्याचा मृत्यू, १५ गंभीर
17
मामाची पोरगी पटवली! सूरज चव्हाण कधी करणार लग्न? तारीख आणि ठिकाण आलं समोर
18
बारामतीच्या नगराध्यक्षपद निवडणुकीबाबतच्या जय पवारांच्या चर्चेला अजित पवारांकडून पुर्णविराम
19
रवींद्र चव्हाणांच्या खेळीनं शिंदेसेना संतापली; "भाजपाला युती नको तर स्पष्ट सांगावे, आम्हीही..."
20
RSS मध्ये मुस्लीम सहभागी होऊ शकतात का? मोहन भागवतांनी दिलं असं उत्तर, सभागृहात टाळ्यांचा एकच कडकडाट झाला!

न दमणारा, न झोपणारा ‘ड्रायव्हरलेस’ ट्रक अमेरिका, चीन अन् युरोपच्या रस्त्यांवर धावतोय!

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 1, 2022 07:53 IST

सध्या अमेरिकेत आणि एकूणच जगभरात ट्रक ड्रायव्हर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे.

कोरोनाकाळानंतर जगभरात आजवर फार कधी समोर ना आलेले अनेक प्रश्न व्यवस्थांना सोडवावे लागत आहेत. महामारीच्या या काळाने लोकांच्या जगण्याची रीतच बदलून टाकली. कोविडोत्तर काळ अद्याप अधिकृतपणे आला नसला तरी निर्बंध शिथिल झाल्यानंतरही अनेक प्रश्न सुटलेले नाहीत किंबहुना अधिक जटील होऊन बसले आहेत.

सध्या अमेरिकेत आणि एकूणच जगभरात ट्रक ड्रायव्हर्सचा तुटवडा निर्माण झाला आहे. कोरोना काळात ऑनलाइन वस्तू मागवण्यात झालेल्या प्रचंड वाढीमुळे देशाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत वस्तूंची वाहतूक वाढली. बहुतेक सगळ्या देशांमध्ये देशांतर्गत वाहतूक ही रस्त्यांवरून केली जाते. त्यामुळे सगळीकडेच ट्रकच्या वाहतुकीत वाढ झाली. इतक्या मोठ्या प्रमाणात ट्रक्स चालवणाऱ्या लोकांची आजवर कधीच गरज पडलेली नसल्याने प्रशिक्षित ट्रक चालकांचा तुटवडा निर्माण झाला. त्याची सगळ्यात जास्त झळ अमेरिकेला बसली. याचं कारण अर्थातच अमेरिकेत जास्त प्रमाणात असलेली ऑनलाइन वस्तू मागवण्याची वृत्ती ! 

पण मग यावर उत्तर काय? एका कंपनीचा ड्रायव्हर जास्त पैसे देऊन दुसऱ्या कंपनीने पळवायचा, हे काही कायमचं उत्तर असू शकत नाही आणि त्यामुळेच जगातील अनेक कंपन्या ड्रायव्हरशिवाय चालणारे ट्रक्स बनवण्याच्या खटपटीत आहेत. त्यात सध्या तरी सॅन दिएगोमधील टुसिम्पल नावाच्या कंपनीने आघाडी घेतलेली दिसते आहे. टुसिम्पल ही कंपनी २०१५ मध्ये स्थापन झाली. आजघडीला या कंपनीचे ७० चालकविरहित ट्रक्स अमेरिका, चीन आणि युरोपच्या रस्त्यांवर धावत आहेत.

आजवर त्यांनी चालवलेल्या या सगळ्या ट्रक्सनी पार केलेलं अंतर मोजलं तर ते २० लाख मैल किंवा ३० लाख ६० हजार किलोमीटर्स इतकं भरतं. म्हणजेच त्यांनी इतका प्रचंड प्रवास चालकविरहित ट्रक्स वापरून आजवर केलेला आहे. त्यांचे आत्ताचे ट्रक्स हे नेहमीसारखेच ट्रक्स आहेत, त्यात फक्त टुसिम्पल कंपनीचं चालकविरहित ट्रक चालवण्याचं तंत्रज्ञान बसवलेलं आहे. मात्र, पूर्णपणे स्वयंचलित ट्रक्स बनवण्यासाठी टुसिम्पल कंपनीने जगातील दोन सगळ्यात मोठ्या ट्रक उत्पादकांशी करार केलेले आहेत. त्यापैकी एक म्हणजे अमेरिकेतील नेव्हीस्टार आणि युरोपमधील फोक्स  वॅगनची ट्रक व्यवसायाची शाखा असलेली ट्रॅटन. या दोन कंपन्यांच्या बरोबर काम करून २०२४ पर्यंत पूर्णपणे स्वयंचलित ट्रक्स तयार करता येतील, असा त्यांचा मानस आहे. 

टुसिम्पलच्या लेटेस्ट रोड टेस्टमध्ये ताजा भाजीपाला आणि फळं ऍरिझोना राज्यातील नोगालीसपासून ते ओक्लाहोमा शहरापर्यंत पोहोचवण्यात आलं. या चाचणीचं अंतर होतं तब्बल ९५१ मैल, म्हणजेच १५३० किलोमीटर! या चाचणीच्या वेळी ट्रकमध्ये सामान भरणं आणि उतरवून घेणं, हे काम माणसांनी केलं; पण या एकूण प्रवासातील टस्कन ते डॅलस हा खूप मोठा प्रवास ट्रकने एकट्याने केला.टुसिम्पलचे अध्यक्ष आणि सीईओ चेंग लू म्हणतात की, ‘अजूनही आमची यंत्रणा पूर्णपणे तयार नसल्यामुळे आम्ही ट्रकबरोबर पूर्ण वेळ एक सेफ्टी ड्रायव्हर आणि एक सेफ्टी इंजिनिअर ठेवतो. मात्र, असं असेल तरीही आम्ही हा प्रवास पूर्णपणे स्वयंचलित पद्धतीने पूर्ण केला. ड्रायव्हरने स्टिअरिंग व्हीलला हातसुद्धा लावला नाही.’

एरवी  हा प्रवास पूर्ण करायला ट्रकला २४ तास लागतात. स्वयंचलित ट्रकने हेच अंतर १४ तासांत पूर्ण केलं. त्यामागचं सगळ्यात मोठं कारण म्हणजे ट्रकला झोप येत नाही! शिवाय अमेरिकेत कायद्याने ट्रक ड्रायव्हरला एका दिवसात अकरा तासांपेक्षा जास्त काळ ड्रायव्हिंग करता येत नाही; पण ट्रकला मात्र ही कुठलीच अडचण येत नाही. ट्रक दमत नाही आणि ट्रकला झोपसुद्धा येत नाही. 

टॅग्स :Americaअमेरिकाchinaचीन