शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

नायजेरियन राष्ट्राध्यक्षांना चांदीच्या कोल्हापुरी पंचामृत कलशाची भुरळ, पंतप्रधान नरेंद्र मोदींकडून भेट 

By संदीप आडनाईक | Updated: November 19, 2024 12:47 IST

पारंपरिक सुबक कारागिरीचा नमुना

कोल्हापूर : पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी नायजेरियाच्या राष्ट्राध्यक्षांना कोल्हापूरच्या पारंपरिक कारागिरीचे अप्रतिम उदाहरण असलेला सिलोफर पंचामृत कलश भेट दिला आहे. हा सिलोफर पंचामृत कलश उच्च गुणवत्तेच्या चांदीपासून बनविला गेला असून, अतिशय कौशल्याने साकारला आहे.पंतप्रधाननरेंद्र मोदी १६ नोव्हेंबर ते २१ नोव्हेंबर दरम्यान होणाऱ्या जी-२० परिषदेत सहभागी होण्यासाठी रविवारी नायजेरियाहून ब्राझीलला रवाना झाले. नायजेरिया, ब्राझील आणि गुयाना या देशांना ते भेटी देत आहेत. तत्पूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अबुजा येथे नायजेरियाचे राष्ट्राध्यक्ष बोला अहमद टिनुबू यांची भेट घेतली आणि त्यांना कोल्हापुरात तयार झालेला 'सिलोफर पंचामृत कलश' भेट म्हणून दिला.नायजेरियाच्या निमंत्रणावरून पंतप्रधान मोदी पहिल्यांदाच नायजेरिया दौऱ्यावर गेले आहेत. तब्बल १७ वर्षांनंतर भारतीय पंतप्रधानांचा हा पहिलाच दौरा होता. यावेळी मोदी यांना भारत-नायजेरिया संबंधांना बळकट करण्यासाठी उत्कृष्ट योगदान दिल्याबद्दल स्टेट हाऊसमधील एका समारंभात ‘ग्रँड कमांडर ऑफ द ऑर्डर ऑफ द नायजर’ या नायजेरियाच्या सर्वोच्च पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.कोल्हापुरी कारागिरीचे उदाहरणहा कलश कोल्हापूरच्या पारंपरिक कारागिरीचे अप्रतिम उदाहरण आहे. हा सिलोफर पंचामृत कलश उच्च गुणवत्तेच्या चांदीपासून बनविला गेला असून, जो अतिशय कौशल्याने साकारला आहे. यावर कोल्हापूरच्या प्रसिद्ध धातूकामाचे वैशिष्ट्यपूर्ण नक्षीकाम कोरलेले असून, त्यात मुख्यत्वे फुलांचे नमुने, देवता आणि कोल्हापूरच्या पारंपरिक रचनांचा समावेश आहे. कलशाचा दांडा आणि झाकण धार्मिक समारंभांमध्ये वापरण्यासाठी सुलभ आहे. या कलशामधून दूध, दही, तूप, मध आणि साखरेपासून बनवलेले पवित्र पंचामृत दिले जाते.

टॅग्स :kolhapurकोल्हापूरprime ministerपंतप्रधानNarendra Modiनरेंद्र मोदी