बाप रे...! रशियात उत्तर कोरियाच्या सैनिकाने स्वतःलाच बॉम्बनं उडवलं, नेमकं काय घडलं? युक्रेनच्या सैन्यांत दहशत
By ऑनलाइन लोकमत | Updated: January 15, 2025 16:26 IST2025-01-15T16:26:09+5:302025-01-15T16:26:47+5:30
यावेळी त्यांना उत्तर कोरियाचा एक जिवंत सैनिकही सापडला. मात्र, युक्रेनियन सैनिक त्याच्याजवळ पोहोचताच, पकडले जाऊ नये, म्हणून त्याने स्वतःला उडवून दिले...

बाप रे...! रशियात उत्तर कोरियाच्या सैनिकाने स्वतःलाच बॉम्बनं उडवलं, नेमकं काय घडलं? युक्रेनच्या सैन्यांत दहशत
कीव - दुसऱ्या महायुद्धाच्या काळात जपानी हवाई दलाचे पायलट त्यांचे विमान थेट शत्रूच्या जहाजांवर क्रॅश कारायचे. या आत्मघाती वैमानिकांना 'कामिकाझे' म्हणून ओळखले जात होते. यानंतर आता काहीशी अशीच घटना रशियामध्ये घडताना दिसत आहे. येथे युक्रेनविरुद्ध लढणारे उत्तर कोरियाचे सैनिक कामिकाझेंप्रमाणेच वागताना दिसत आहेत. याच आठवड्यात रशियन सैन्यासोबत झालेल्या भीषण युद्धानंतर कुर्स्क प्रदेशातील बर्फाळ भागात युक्रेनियन विशेष दल मृतदेह शोधत होते. दरम्यान, त्यांना डझनावर उत्तर कोरियन सैनिकांचे मृतदेह सापडले. यावेळी त्यांना उत्तर कोरियाचा एक जिवंत सैनिकही सापडला. मात्र, युक्रेनियन सैनिक त्याच्याजवळ पोहोचताच, पकडले जाऊ नये, म्हणून त्याने स्वतःला उडवून दिले.
युक्रेनियन विशेष दलांनी X वर पोस्ट करत यासंदर्भात माहिती दिली आहे. या काळात त्यांनी कुर्स्क येथे झालेल्या भयंकर लढाईचे वर्णनही केले. या आत्मघातकी स्फोटात आपल्या सैनिकांना कसल्याही प्रकारची इजा झाली नसल्याचेही त्यांनी म्हटले आहे. महत्वाचे म्हणजे, या घटनेने, युद्धभूमीवरील जे गुप्तचर अहवाल होते, की उत्तर कोरियाचे सैनिक शत्रू सैन्याने पकडू नये, म्हणून अशा पद्धतीचे पाऊल उचलतात, ते खरे असल्याचे सिद्ध केले आहे.
Watch how Ukraine’s SOF repel North Korean troops assault in russia’s Kursk region.
— SPECIAL OPERATIONS FORCES OF UKRAINE (@SOF_UKR) January 13, 2025
The special forces eliminated 17 DPRK soldiers. One North Korean soldier had set an unsuccessful trap for the rangers of the 6th Regiment and blew himself up with a grenade. pic.twitter.com/nObBOMnusI
उत्तर कोरियाचे सैनिक स्वतःला कैद होण्यापासून वाचवण्यासाठी कोणत्या टोकाला जाऊ शकतात, हे या यह घटनेवरून दिसून येत आहे. महत्वाचे म्हणजे, युक्रेन विरोधात उत्तर कोरीयाचे सैनिकही लढत आहेत, याचे पुरावे मिळू नये म्हऊन, असे टोकाचे पाऊल उचलले जात आहे. महत्वाचे म्हणजे, युक्रेन आणि पाश्चात्य देशांच्या मते, उत्तर कोरियाचे ११,००० हून अधिक सैनिक युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी युक्रेनमध्ये पोहोचले आहेत.