इस्राइल-पॅलेस्टाइन संघर्षाला नवं वळण? रशियामध्ये पोहोचला हमासचा सर्वात मोठा दहशतवादी
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 26, 2023 23:52 IST2023-10-26T23:52:26+5:302023-10-26T23:52:42+5:30
Israel-Palestine conflict : इस्राइल आणि पॅलेस्टाइन संघर्षादरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जाखारोव्हा यांनी एका संक्षिप्त निवेदनामध्ये सांगितले की, गाझावर नियंत्रण ठेवणाऱ्या पॅलेस्टाइनी समूह हमासचं एक प्रतिनिधीमंडळ मॉस्कोच्या दौऱ्यावर आले आहे.

इस्राइल-पॅलेस्टाइन संघर्षाला नवं वळण? रशियामध्ये पोहोचला हमासचा सर्वात मोठा दहशतवादी
इस्राइल आणि पॅलेस्टाइन संघर्षादरम्यान, एक मोठी बातमी समोर आली आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया जाखारोव्हा यांनी एका संक्षिप्त निवेदनामध्ये सांगितले की, गाझावर नियंत्रण ठेवणाऱ्या पॅलेस्टाइनी समूह हमासचं एक प्रतिनिधीमंडळ मॉस्कोच्या दौऱ्यावर आले आहे. त्यानंतर या दौऱ्याबाबत एक माहिती समोर आली आहे. हमासच्या टॉपच्या दहशतवाद्यांपैकी एक मौसा मोहम्मद अबू मरजूक याच्या नेतृत्वाखाली हमासचं एक प्रतिनिधी मंडळ मॉस्कोमध्ये दाखल झालं आहे. रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयानेच याला दुजोरा दिला आहे.
रशियाच्या आरआयएने पॅलस्टाइनी शिष्टमंडळाच्या एका सूत्राने सांगितले की, मॉस्कोचा दौरा करणाऱ्यांमध्ये हमासचे वरिष्ठ सदस्य अबू मरजूक आहेत. रशियाचे मध्य पूर्वेतील सर्व प्रमुख सदस्यांचे संबंध आहेत. त्यांच्यामध्ये इस्राइल, इराण, पॅलेस्टाइन प्रशासन आणि हमास यांचा समावेश आहे. रशियाने या भागात सध्या निर्माण झालेल्या संकटासाठी अमेरिकेच्या फसलेल्या मुत्सद्देगिरीला जबाबदार धरले आहे. त्याबरोबरच इस्राइल आणि हमासमधील युद्धविराम आणि शांततेच्या मार्गाने तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू करण्याचे आवाहन रशियाने केले आहे.
सध्यातरी हमासच्या प्रतिनिधी मंडळाच्या रशियाच्या दौऱ्यावर संपूर्ण जगताचं लक्ष आहे. आता या दौऱ्यामुळे इस्राइल आणि हमासमध्ये सुरू असलेल्या संघर्षाला नेमकं कोणतं वळण लागणार, हे तर येणार काळच ठरवणार आहे. मात्र आंतरराष्ट्रीय घडामोडींच्या तज्ज्ञांच्या मते आता या युद्धामध्ये रशियाची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे.