शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

आकाशातून पृथ्वीवर आले गिफ्ट, दगडात दडलेय रहस्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 26, 2023 11:55 IST

२०२० मध्ये घेतलेला लघुग्रहाचा नमुना आला, लवकरच होणार विश्लेषण

वॉशिंग्टन : अमेरिकी अंतराळ संशोधन संस्था ‘नासा’ने सात वर्षांपूर्वी पाठवलेल्या अंतराळ यानाने बेन्नू लघुग्रहावरून घेतलेला नमुना रविवारी पृथ्वीवर पाठवला. साडेचार अब्ज वर्षांपूर्वी सूर्य व ग्रह कसे तयार झाले याची माहिती या नमुन्यातून मिळू शकते. 

n मोहिमेचे नाव : ‘ओसिरिस-रेक्स’ n यान प्रक्षेपित : ८ सप्टेंबर २०१६n खास गोष्ट : या यानाने पृथ्वीवर न उतरता नमुना पोहोचवला.     यानाने काय केले?n अंतराळ यानाने ४.१२ वाजता नमुना असलेले कॅप्सूल पृथ्वीपासून १ लाख किमी उंचावर सोडले. n हे कॅप्सूल पॅराशूटद्वारे युटा वाळवंटात रात्री ८:२३ वाजता उतरले. n ओसीरिक्सने २०२० मध्ये हा नमुना घेतला होता.     अंतराळ संशोधकांच्या मते     पुढील ३०० वर्षांत हा लघुग्रह पृथ्वीवर धडकण्याची शक्यता आहे.

२५० ग्रॅमचा नमुनाn पृथ्वीवर कॅप्सूल सोडल्यानंतर २० मिनिटांत ते ‘अपोफिस लघुग्रह’च्या नवीन प्रवासाला निघाले. हे यान २०२९ मध्ये अपोफिस लघुग्रहावर पोहोचेल. ‘ओसीरिस-रेक्स’ मोहिमेचे नाव देखील आता ‘ओसीरिस-अपेक्स’ झाले आहे.n या कॅप्सूलने २७ हजार किलोमीटर प्रतितास वेगाने पृथ्वीच्या वातावरणात प्रवेश केला. हे कॅप्सूल ताब्यात घेण्यासाठी ‘ओसीरिस-रेक्स’चे पथक आणि लष्करी अधिकारी चार हेलिकॉप्टर व दोन वाहने घेऊन वाळवंटात थांबले होते. कॅप्सूलच्या माध्यमातून उल्का पिंडाचा २५० ग्रॅम नमुना आणला आहे. कॅप्सूलमध्ये काय?या नमुन्यात बेन्नूवरील धूळ आणि छोटे दगड आहेत. हा नमुना छोटा असला तरी नासाच्या चाचणीसाठी तो पुरेसा आहे.

शास्त्रज्ञांनी नमुन्याची हीटशील्ड (उष्णतारोधक कवच) काढून टाकली आहे, परंतु नमुना अजूनही विशेष बॉक्समध्येच आहे. आज तो ह्युस्टन येथील जॉन्सन स्पेस सेंटरवर नेला जाणार असून, तेथे त्याचे विश्लेषण सुरू होईल.

टॅग्स :NASAनासाAmericaअमेरिका