सुनीता विल्यम्स यांच्या अवकाश मोहिमेला ब्रेक
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 3, 2024 06:30 IST2024-06-03T06:30:19+5:302024-06-03T06:30:50+5:30
यापूर्वी ६ मे राेजीदेखील उड्डाण रद्द करण्यात आले हाेते.

सुनीता विल्यम्स यांच्या अवकाश मोहिमेला ब्रेक
प्लोरिडा : भारतीय वंशाच्या अंतराळवीर सुनीता विल्यम्स व बुच विलमोर यांच्या अवकाश मोहिमेला पुन्हा एकदा ब्रेक लागला आहे. त्यांना अवकाशात घेऊन जाणारे बोइंगचे पहिले उड्डाण संगणक प्रणालीत बिघाड झाल्याने स्थगित केले.
बोइंगच्या स्टारलायनर कॅप्सूलमध्ये बसून अंतराळवीरांना अवकाशात नेले जाणार होते. मात्र, काऊंटडाऊन सुरू होऊन उड्डाणास ३ मिनिटे ५० सेकंद शिल्लक असताना बिघाड झाल्याने उड्डाण थांबविण्यात आले. त्यानंतर तंत्रज्ञांच्या मदतीने दोघांनाही कॅप्सूलमधून बाहेर काढले. यापूर्वी ६ मे राेजीदेखील उड्डाण रद्द करण्यात आले हाेते.