शहरं
Join us  
Trending Stories
1
दुसऱ्या पायलटबाबत इराणला माहितीच नव्हती, लीक करणाऱ्याला शोधणार ट्रम्प; रेस्क्यू मोहिमेवर मोठा गौप्यस्फोट
2
"किडनी दे, नाहीतर ३० लाख आण!"; थार गाडी अन् ८ लाख देऊनही छळ; लग्नानंतर उघड झालं पतीचं भयानक गुपित!
3
मध्यपूर्वेतील युद्धाचा परिणाम! एअर इंडियाचा प्रवास महागला; प्रवाशांच्या खिशाला कात्री...
4
इस्रायलचे पहिले टार्गेट ठरले! इराणच्या रेल्वे उडविणार, नागरिकांना रेल्वेमार्गांपासून दूर राहण्याचा इशारा...
5
किंमती गगनाला भिडल्या तरीही पायलटनं कोट्यवधीचं तेल समुद्रात ओतले; कारण ऐकून कराल कौतुक
6
सर्व नागरिकांनी ऊर्जा प्रकल्पांना घेराव घाला...! ट्रम्प यांच्या धमकीवर इराणची नवी चाल, वाटाघाटी नाजूक वळणावर...
7
दिल्ली विधानसभेत का घुसवली कार? पोलिसांच्या चौकशीत सरबजीतने केला धक्कादायक खुलासा! म्हणाला..
8
मरीन ड्राइव्ह अपघात निष्काळजीपणामुळेच, सदोष मनुष्यवधाचा गुन्हा वगळला: उच्च न्यायालय
9
भारतातील राजदूताला व्हाईट हाऊसमध्ये स्पेशल आमंत्रण; इराणची डेडलाइन तेव्हाच संपणार, योगायोग की...
10
Bonus Share News: पहिल्यांदाच मिळणार बोनस शेअर्सचं गिफ्ट; मिळणार ५ शेअर्स, २८५९% वाढलाय शेअर
11
Health Tips: कंबर, मान आणि खांदे दुखीने हैराण? उशीचा 'असा' वापर करा, वेदनांपासून कायमची सुटका मिळवा!
12
धक्कादायक! भावाच्या पत्नीवर अत्याचार; आईनेच दिली मुलाविरोधात साक्ष, न्यायालयाचा कठोर निर्णय
13
IPLमध्ये सर्व संघ कुणाविरोधात २ तर कुणाविरुद्ध एकच सामना का खेळतात? असं आहे यामागचं गुपित
14
तुफान राडा! भाजपातील वाद चव्हाट्यावर, नेते आपापसात भिडले; शिवीगाळ करत दिली धमकी
15
Crime: नाशिक, वसई पाठोपाठ नागपुरातही भोंदूबाबाचा मोठा कांड; तंत्र-मंत्राच्या नावाखाली महिलेवर बलात्कार
16
ट्रम्प यांची इराणला 'डेडलाईन'! रात्री ८ वाजेपर्यंत होर्मुज खुला करा, अन्यथा युद्ध अटळ; भारतासह आशियाई देश चिंतेत
17
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
18
इराणचा अमेरिकेला '१० कलमी' प्रतिप्रस्ताव! होर्मुजमधून जाणाऱ्या जहाजावर २० लाख डॉलर टॅक्स आकारणार? आता ट्रम्प काय करणार?
19
Mumbai Metro: मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
20
युद्ध इराणमध्ये, फटका पाकिस्तानात! रात्री ८ नंतर बाजारपेठा बंद; डिझेल ५२० तर महागाईने मोडले कंबरडे
Daily Top 2Weekly Top 5

धक्कादायक! 54 वर्षांच्या महिलेनं केली 114 वर्षांतील सर्वात मोठी मनी लाँड्रिंग, छाप्यात मिळालं कोट्यवधींचं घबाड!

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 01:59 IST

Housewife Arrest : यासंदर्भात पोलिसांचे म्हणणे आहे की, हे 114 वर्षांतील आतापर्यंतचे सर्वात मोठे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण असू शकते.

काळा पैसा पांढरा करणाऱ्या अनेक टोळ्यांबद्दल आपण ऐकले अथवा वाचले असेल. बेकायदेशीरपणे काळा पैसा पांढरा करण्याच्या प्रक्रियेला मनी लाँड्रिंग म्हटले जाते. नुकतेच मनी लाँड्रिंगशी संबंधित एक मोठे प्रकरण समोर आले आहे. यात स्वतःला गृहिणी म्हणून घेणाऱ्या एका महिलेच्या घरातून तब्बल 30 कोटी रुपये जप्त करण्यात आले आहेत. तर तिला 176 अब्ज रुपयांच्या मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात अटक करण्यात आली आहे. 

यासंदर्भात पोलिसांचे म्हणणे आहे की, हे 114 वर्षांतील आतापर्यंतचे सर्वात मोठे मनी लॉन्ड्रिंग प्रकरण असू शकते. ही घटना हाँगकाँगमध्ये घडली आहे. येथे एका घरात काळ्या पैशाचे रुपांत पांढर्‍या पैशांत करण्याचे काम सुरू होते. या टोळीतील एकूण 9 जणांना अटक करण्यात आली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण? -साऊथ चायना मॉर्निंग पोस्टने दिलेल्या वृत्तानुसार, एका 56 वर्षीय महिलेला आठवड्यापूर्वी ताब्यात घेण्यात आले होते. कस्टम अधिकाऱ्यांनी महिलेच्या फ्लॅटवर छापा टाकला, ती तेथे मनी लॉन्ड्रिंगचे रॅकेट चालवत होती. महिलेसह आणखी पाच जणांना अटक करण्यात आली. यानंतर आणखी चार जणांना ताब्यात घेण्यात आले. 

संबंधित महिलेवर 176 अब्ज रुपयांहूनही अधिक काळा पैसा पांढरा केरण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. हा काळा पैसा पांढरा करण्यासाठी त्यांच्याकडे डझनभरहून अधिक खाती आढळून आली आहेत. फ्लॅटवर असलेले पैसे मोजण्यासाठी मशिन्सचा वापर करावा लागला. यावरूनच या संपूर्णप्रकरणाचा अंदाज लावला जाऊ शकतो. या छाप्यादरम्यान पोलीस अधिकाऱ्यांनी 30 कोटी रुपयांची रोकडही जप्त केली आहे.

तपासात समोर आली धक्कादायक माहिती -संबंधित खात्यांवर जानेवारी 2020 ते डिसेंबर 2022 या कालावधीत तब्बल 7600 हून अधिक वेळा व्यवहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर तपास अधिकाऱ्यांना अक्षरशः धक्का बसला. या अंतर्गत 176 अब्ज रुपये इकडून तिकडे ट्रान्सफर करण्यात आले आहेत. सिंडिकेट चालवणाऱ्या कंपनीने 11 कंपन्या स्थापन केल्या होत्या. छाप्यादरम्यान पोलिसांना अनेक मशीन्स, बँक कार्ड आणि गोपनीय कागदपत्रेही सापडली आहेत.

टॅग्स :Crime Newsगुन्हेगारीMONEYपैसाchinaचीनPoliceपोलिस