CoronaVirus मी खूप जगले! व्हेंटिलेटर तरुण रुग्णांना द्या; 90 वर्षीय महिलेने प्राण सोडले

By ऑनलाइन लोकमत | Published: April 2, 2020 03:23 PM2020-04-02T15:23:19+5:302020-04-02T15:40:50+5:30

CoronaVirus सुजान यांनी व्हेंटीलेटरसाठी नकार दिला. मला व्हेंटीलेटर नको. मी खुप चांगल्या पद्धतीने जीवन जगले असं सांगत व्हेंटीलेटर तरुण रुग्णासाठी ठेवा, अशी विनंती त्यांनी डॉक्टरांना केली.

90 year old coronavirus victim dies after refusing ventilator | CoronaVirus मी खूप जगले! व्हेंटिलेटर तरुण रुग्णांना द्या; 90 वर्षीय महिलेने प्राण सोडले

CoronaVirus मी खूप जगले! व्हेंटिलेटर तरुण रुग्णांना द्या; 90 वर्षीय महिलेने प्राण सोडले

Next

नवी दिल्ली - चीनमध्ये एका ९० वर्षीय महिलेचा कोरोना व्हायरसमुळे मृत्यू झाला. मी उत्तम जीवन जगले आहे. त्यामुळे व्हेंटीलेटर तरुण रुग्णासाठीस ठेवा, अशी सूचना मृत महिलेने डॉक्टरांना केली होती, अशी माहिती समोर आली आहे. ९० वर्षीय सुजान होयलर्टस यांना श्वास घेण्यास अडचणी होती, म्हणून बेल्जियम येथील रुग्णालयात त्यांना भर्ती करण्यात आले होते.

सुजान यांनी व्हेंटीलेटर घेण्यास नकार दिल्यामुळे कोरोना व्हायरसमुळे दोन दिवसांनंतर त्यांचे निधन झाले. जगभरात कोरोना व्हायरस थैमान घालत आहे. अशा स्थितीत सगळीकडे कोरोनाचे रुग्ण वाढतच आहेत. त्यामुळे रुग्णालयात आरोग्य साहित्याची कमतरता भासत आहे. सहाजिकच व्हेंटीलेटर कमी पडत आहेत. अशा स्थितीत तरुण रुग्णासाठी व्हेंटीलेटर नाकारणाऱ्या महिलेचे कौतुक होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, लुबेक येथे बिनकोममध्ये राहणाऱ्या सुजान होयलर्ट्स यांना भूक लागत नसल्यामुळे आणि श्वास घेण्यास त्रास होत असल्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. तपासणी केल्यानंतर त्यांना कोरोनाची लागण झाल्याचे स्पष्ट झाले होते. त्यानंतर त्यांना आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आले. मात्र त्यांची तब्येत अधिकच बिघडत गेली. त्यामुळे  डॉक्टरांनी त्यांना कृत्रिम श्वासयंत्र अर्थात व्हेंटीलेटर बसविण्याची तयारी केली. मात्र सुजान यांनी व्हेंटीलेटरसाठी नकार दिला. मला व्हेंटीलेटर नको. मी खुप चांगल्या पद्धतीने जीवन जगले असं सांगत व्हेंटीलेटर तरुण रुग्णासाठी ठेवा, अशी विनंती त्यांनी डॉक्टरांना केली.

रुग्णालयात दाखल केल्यानंतर दोन दिवसांनी सुजान यांचे निधन झाले. त्यांची मुलगी जुडीथ यांनी एका वृत्तपत्राला सांगितले की, मी आईला शेवटच भेटू शकले नाही. तसेच अंत्यविधीला देखील मला सामील होता आले नाही. मात्र त्यांना कोरोनाची लागण झाली कशी हे आपल्याला अद्याप समजले नाही, असंही जुडीथ म्हणाल्या.

Web Title: 90 year old coronavirus victim dies after refusing ventilator

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.