शहरं
Join us  
Trending Stories
1
PM Modi vs Congress: "काँग्रेस म्हणजे भ्रष्टाचाराची जननी, त्यांना विकासाची ABCD माहिती नाही"; पंतप्रधान मोदी विरोधकांवर बरसले!
2
...तर पक्ष तेव्हाच फुटला असता; शरद पवारांच्या दाव्यावर छगन भुजबळांची पहिली प्रतिक्रिया
3
"प्रेक्षकांचा आवडता संघ नेहमी जिंकेलच असं नाही पण लोकशाहीत...", सचिनचं मतदारांना आवाहन
4
Video: धोनी मॅच संपल्यावर RCBच्या खेळाडूंशी जे वागला, त्यावर विश्वासच बसेना! नेटकऱ्यांनीही केली टीका
5
शेतातील ५० लाख झाडांवर कुऱ्हाड! अधिक पिकांसाठी जमीन हवी म्हणून तोडली झाडे - अहवाल 
6
यावेळीही ट्रॉफी जिंकण्याचे RCB चे स्वप्न भंगणार? एक योगायोग अन् चाहत्यांचे टेन्शन वाढले
7
तुमको मिरची लगी तो मैं क्या करू? ठाण्यासाठी ‘करो या मरो’च्या लढाईला सिद्ध व्हा - देवेंद्र फडणवीस 
8
१% ते १००% पर्यंतचा प्रवास! RCB ची गाडी सुस्साट; ५ खेळाडूंमुळे मिळाले प्ले ऑफचे तिकीट
9
नाशिकमध्ये निवडणुकीत कोणाला पाठिंबा देणार? मनोज जरांगे पाटलांनी स्पष्टच सांगितलं
10
नातू प्रज्वल रेवण्णावरील आरोपांवर माजी पंतप्रधान देवेगौडा यांनी मौन सोडले; म्हणाले, दोषी आढळला तर...
11
नॅचरल आईस्क्रीमचे संस्थापक रघुनंदन श्रीनिवास कामथ यांचे निधन; वयाच्या ७० व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास 
12
ते कुणालाच नको होते; एकनाथ शिंदेंच्या मुख्यमंत्रीपदाबाबत संजय राऊत यांचा नवा दावा
13
MS Dhoniचा मैदानाबाहेर मारलेला षटकार ठरला CSKच्या पराभवाचे कारण? RCBला मॅच जिंकण्यासाठी झाली मदत
14
पुण्यात आलिशान पोर्शे कारने दोघांना चिरडले; तरुण-तरुणी जागीच ठार
15
४० कोटींची रोकड सापडली, मोजणी अजूनही पूर्ण नाही... बुटांच्या व्यापाऱ्यांची अफाट संपत्ती
16
भाजप आरएसएसला संपवायला निघालाय, उद्धव ठाकरे यांचा मुंबईत संयुक्त पत्रकार परिषदेत आरोप
17
मतदानाची टक्केवारी अचानक कशी वाढते? निवडणूक आयोगाने स्पष्ट केली बाजू
18
'छगन भुजबळांना मुख्यमंत्रिपद दिले असते तर पक्ष...'; शरद पवारांचा मोठा गौप्यस्फोट
19
पतंजलीची सोन पापडी गुणवत्ता चाचणीत फेल, सहाय्यक व्यवस्थापकासह तिघांवर कारवाई
20
आनंदवार्ता : यंदा धो-धो बरसणार; मान्सून आज अंदमानात तर ३१ मे रोजी केरळात धडकणार

श्रीलंकेत ९ मुस्लिम मंत्र्यांचा राजीनामा

By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2019 4:46 AM

दहशतवाद्यांशी कथित संबंध : मुस्लिम काँग्रेसचे नेते म्हणाले, दोषी आढळल्यास शिक्षा करा

कोलंबो : गेल्या एप्रिल महिन्यात ईस्टर संडेच्या दिवशी चर्चेस् व हॉटेल्सवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यांनंतर मुस्लिम समुदाय राक्षस असल्याचे जे चित्र निर्माण केले जात आहे, त्याच्या निषेधार्थ सामूहिक भूमिका म्हणून श्रीलंका सरकारमधील नऊ मुस्लिम मंत्र्यांनी सोमवारी राजीनामे दिले. त्यात चार कॅबिनेट दर्जाचे आहेत.

चौकशी कशी हाताळली जाते आणि द्वेषपूर्वक केलेले भाषण, वांशिक हिंसाचार आणि काहीही केले तरी काही होत नाही, असा निर्माण झालेला समज कसा दूर करणार, यावर सरकारचे अस्तित्व अवलंबून आहे, असे श्रीलंका मुस्लिम काँग्रेसचे नेते रौफ हकीम म्हणाले.तत्पूर्वी, पूर्व आणि पश्चिम प्रांतांचे मुस्लिम राज्यपाल अनुक्रमे एम.एल.ए.एम. हिजबुल्लाह आणि अझाथ सॅल्ली यांनी प्रमुख बौद्ध भिक्खू अथुरालिये रथना थेरो यांनी या राज्यपालांनी २१ एप्रिल रोजी झालेल्या त्या हल्ल्यांसंबंधात राजीनामे द्यावेत या मागणीसाठी उपोषण सुरू केल्यानंतर राजीनामे दिले. थेरो हे सत्ताधारी युनायटेड नॅशनल पार्टीचे संसद सदस्य आहेत. या पक्षाचे नेतृत्व पंतप्रधान रानील विक्रमसिंघे यांच्याकडे आहे. थेरो यांनी पाच मागण्यांसाठी शुक्रवारपासून उपोषणाला कँडीतील दलादा मलिगावा या बुद्ध मंदिरासमोर सुरुवात केली. या मागण्यांत मंत्री रिशाद बथिउद्दीन आणि राज्यपाल हजिबुल्लाह आणि सॅली यांच्या राजीनाम्याचाही समावेश आहे. या सगळ्यांचा संबंध हा ईस्टर संडेच्या संशयित हल्लेखोरांशी असल्याचा थेरो यांचा आरोप आहे. या सगळ्यांनी थेरो यांचे हे आरोप नाकारले आहेत.

चौकशीसाठी ‘जागा आणि वेळ’ मिळेलसंशयित दहशतवाद्यांशी मुस्लिम राजकारण्यांचे संबंध असल्याच्या आरोपांची चौकशी करण्यासाठी आमच्या राजीनाम्यांमुळे अधिकाऱ्यांना ‘जागा आणि वेळ’ मिळेल, असे श्रीलंका मुस्लिम काँग्रेसचे नेते रौफ हकीम यांनी पत्रकारांना सांगितले. एक तर आमच्यापैकी जो कोणी दोषी आढळेल त्याला त्यांनी पकडून शिक्षा करावी नाही तर आम्ही निर्दोष असल्याचे सांगावे. या प्रकरणाकडे ते महिनाभरात लक्ष घालतील आणि याचा काही तरी शेवट घडवून आणतील, अशी आशा आहे, असे हकीम म्हणाले.